अंकिता लोखंडेने केलं आपल्या बॉयफ्रेंडला किस, व्हिडिओ व्हायरल

अंकिता लोखंडेने केलं आपल्या बॉयफ्रेंडला किस, व्हिडिओ व्हायरल

सध्या बॉलीवूड आणि अगदी टेलिव्हिजन वर्ल्डमध्येही लग्नाचा हंगाम सुरु आहे. यामध्ये आता अजून एक व्यक्तीची भर पडणार अशी चर्चा रंगली आहे. ही चर्चा रंगायला कारणही तसंच आहे. आपल्या ‘मणिकर्णिका’ मधील दमदार भूमिकेनंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. टेलिव्हिजनवर एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ने अंकिताला घराघरात ओळख मिळवून दिली. पण त्यानंतर तिच्या नावाची चर्चा अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबरील नात्यामुळे जास्त झाली. पण ते दोघं वेगळे झाल्यानंतर आता पुन्हा एकदा अंकिताच्या आयुष्यात उद्योपती विकी जैन आला आहे. तिने काही दिवसांपूर्वीच विकीवर आपलं प्रेम असल्याचं जाहीर केलं आहे. दोघं हल्ली बऱ्याचदा एकत्र दिसतात. पण नुकताच या दोघांचा किस करताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


अंकिता विकीबरोबर आहे आनंदी


अंकिताने विकीबरोबर आपण आनंदी असल्याचं मान्य केलं आहे. तर दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. विकी आणि अंकिताने नुकतंच त्यांच्या एका मित्राच्या लग्नाला हजेरी लावली. या लग्नात मजा करत असताना अंकिता आणि विकीचा किसिंग व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या लग्नात अर्जुन बिजलानी आणि अन्य टेलिव्हिजन अभिनेता आणि अभिनेत्रीदेखील हजर होते. अर्जुनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या लग्नातील काही खास फोटोदेखील शेअर केले आहेत. या सर्व फोटो आणि व्हिडिओमध्ये अंकिता आणि विकी एकमेकांबरोबर खूपच आनंदी दिसून येत आहेत. डान्स करताना अंकिता आणि विकीने किस घेऊन सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. अंकिताने यावेळी अगदी पारंपरिक साडी नेसली होती. या साडीमध्ये खूपच सुंदर दिसणारी अंकिता आणि उद्योगपती विकी दोघेही एकत्र सुंदर दिसत होते. कारण विकीने अंकिताच्या कपड्याला साजेसे कपडे घातले होते. पाहा हा क्युट व्हिडिओ -

अंकिताने यापूर्वीच विकीवरील प्रेम केलं मान्य


अंकिताला मणिकर्णिकानंतरच मीडियाने विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना तिने आपलं विकीवर प्रेम असल्याचं मान्य केलं होतं. पण सध्या आपला लग्नाची कोणतीही योजना नसून करिअरवर लक्ष केंद्रित करत असल्याचंही तिने म्हटलं होतं. पण आता या व्हिडिओनंतर लवकरच हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकतील असंच सर्वांना वाटत आहे. अंकिताने सांगितलं की, ‘विकी खूपच चांगला माणूस आहे. विलासपूरमधील उद्योगपती असून मी त्याच्या प्रेमात आहे. माझ्या प्रेमावर आणि नात्यावर विश्वास आहे. आम्ही जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आमच्या लग्नाबद्दल तुम्हाला नक्की सांगू’


ankita 1


सुशांत सिंह राजपूतबरोबर काम करण्यास तयार


सुशांत सिंंह राजपूतबरोबर अंकिताचं नक्की काय बिनसलं आणि त्यांना का वेगळं व्हायचा निर्णय घेतला हे कधीही समोर आलं नाही. पण तिला विचारलेल्या प्रश्नावर तिने चांगली स्क्रिप्ट असल्यास आपण सुशांतबरोबर काम करण्यास तयार असल्याचं सांगितलं. कारण इंडस्ट्री खूप लहान आहे आणि आपण अतिशय प्रोफेशनल असल्याचंही अंकिताने सांगितलं आहे. त्यामुळे एखादी चांगली स्क्रिप्ट मिळाल्यास यांचे चाहते पुन्हा एकदा या जोडीला एकत्र पाहू शकतात. सध्या मणिकर्णिकाच्या यशामुळे अंकिता खूपच आनंदी आहे. शिवाय तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा विकीच्या रूपाने आनंद परत आला आहे. आता ही जोडी नक्की कधी लग्न करणार हे लवकरच कळेल.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली खिलाडी अक्षय कुमारची फिरकी


पाहा कोण दिसणार दयाबेनच्या भूमिकेत


या कारणामुळे तारा सुतारीयारीचे करिअर आले आहे धोक्यात