सध्या सगळीकडे सेलिब्रिटी लग्नांची लगबग सुरु आहे. वेगवेगळ्या भाषेतील प्रसिद्ध कलाकार लग्नगाठी बांधत आहेत. आता यामध्ये आणखी एका लव्हस्टोरीची भर पडणार आहे. ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे ही देखील लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. हातावर मेंदी लावलेले तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर इतके व्हायरल होऊ लागले आहेत की, तिने तिच्या लग्नाला सुरुवात केली असल्याची चर्चा होऊ लागली आहे. अत्यंत साधेपणाने तिने मेंदी सोहळा उरकल्याचे देखील म्हटले जात आहे. पण अंकिताने या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. पण तिच्या या फोटोनंतर तिच्या लग्नाची चर्चा ही जोर धरु लागली आहे.
पवित्रा रिश्तामधील या अभिनेत्यानेही उरकले लग्न, फोटो झाले व्हायरल
बहिणीने शेअर केला व्हिडिओ
झालं असं की, अंकिताची बहीण अशिता हिने अंकिताचा एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. यामध्ये अंकिताच्या हातावर मेंदी लावली जात आहे. अंकिताच्या हातावर मेंदी लावतानाचा हा व्हिडिओ इतका जास्त पाहिला गेला की, ही अंकिताची मेंदी सेरेमनी असल्याची चर्चा सुरु झाली. इतकेच नाही तर या व्हिडिओमध्ये अंकिताची बहीण इशिता अंकिताला फारच भावूक होत मिठी मारताना दिसत आहे. त्यामुळेच अंकिताच्या लग्नाची सुरुवात झाली आहे अशीच चर्चा सगळीकडे रंगली आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत नसला तरी देखील त्यांच्या फॅन्सना लग्नाचा अंदाज आला आहे. त्यामुळे अनेकांनी अंकिताला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
अत्यंत साधेपणाने करणार का लग्न
सेलिब्रिटी लग्न म्हणजे जंगी पार्टी आणि सेलिब्रेशन असतं. पण अंकिता अत्यंत साधेपणाने लग्न करणार का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अंकिता आणि विकी जैन गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असून त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली कधीच सोशल मीडियावर दिली आहे. पण अचानक सुशांत सिंह राजपूतचे जाणे या सगळ्यामुळे अंकिता आणि विकी दोघेही दु:खी होते. अंकिता, विकी आणि सुशांत हे चांगले मित्र होते. सुशांत गेल्यानंतर अंकिताने न्याय मिळवून देण्यासाठी बरीच मेहनत घेतली. त्यामुळेच या दु:खात असणारी अंकिता अत्यंत साधेपणाने लग्न करणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. जर अशिताने शेअर केलेला मेंदीचा व्हिडिओ खरंच अंकिताच्या मेंदी सेरेमनीचा असेल तर अंकिता अत्यंत साधेपणाने लग्न करणार असेच म्हणायला हवे.
चाहत्यांना धक्का, लवकरच बंद होणार ‘दी कपिल शर्मा शो’
विकी जैनने शेअर केली नाही पोस्ट
अंकिताचा बॉयफ्रेंड आणि होणारा नवरा विकी जैन हा सोशल मीडियावर फारसा दिसत नाही. त्याने कोणताही व्हिडिओ शेअर न केल्यामुळे अंकिताच्या लग्नावर शिक्कामोर्तब होत नाही. इतकेच नाही तर अंकिताने देखील या संदर्भातील कोणतेही फोटो शेअर केलेले नाहीत. पण सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या लग्नाला सुरुवात झाली असून त्यांच्या घरी लगबग सुरु झाली आहे. आता लग्नाचे फोटो आल्यानंतरच ही बातमी खरी की खोटी हे कळेल. पण विकी आणि अंकिता हे लग्न करणार आहेत हे मात्र नक्की!
आस्ताद काळे लवकरच अडकणार विवाहबंधनात, केळवणीचे धमाल फोटो
अंकिता लोखंडेच्या लग्नाची प्रतिक्षा तिचे फॅन्स कधीपासून पाहत आहेत. आता या दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटो टाकल्यानंतरच या अफवा किंवा फोटोवर विश्वास बसेल