तुम्हालाही नक्कीच आवडेल अंकिता लोखंडेचं हे साडी कलेक्शन

तुम्हालाही नक्कीच आवडेल अंकिता लोखंडेचं हे साडी कलेक्शन

अभिनेत्री अंकिता लोखंडे मुळातच इतकी सुंदर आहे की तिच्यावर कोणताही लुक नेहमीच छान दिसतो. पण  जेव्हा अंकिता साडी नेसते तेव्हा तिच्या सौंदर्यांत अधिकच भर पडते. अंकिताच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे अनेक साडीमधले फोटो तुम्हाला दिसू शकतात. तिला साड्यांचे प्रचंड वेड आहे त्यामुळे तिच्याकडे एकापेक्षा एक सुंदर साड्यांचे कलेक्शनच आहे. नुकतंच तिने साडी नेसत एका मस्त गाण्यावर डान्सही केला आहे. या गाण्यात तर निळ्या पारदर्शक साडीत अंकिता कमालच दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्याकडे अशा साडयांचे खास कलेक्शनच आहे. जर तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल तर या साड्या तुमचं मन नक्कीच वेधून घेतील. 

महाराष्ट्रीयन नऊवारीचा ठसका

अंकिता लोखंडेने हिंदी मालिका आणि बॉलीवूडमध्ये आपलं स्थान पक्कं केलं असलं तरी ती मुळची एक मराठी मुलगीच आहे. तिच्या करिअरची सुरूवात ज्या पवित्र रिश्ता या मालिकेतून झाली त्यातही तिने एका मराठी मुलीचीच भूमिका साकारली होती. त्यामुळे सणासुदीला आणि एखाद्या खास कार्यक्रमात अंकिता महाराष्ट्रीयन लुकमध्ये नक्कीच दिसून येते. काही दिवसांपूर्वी तर तिने मराठमोठ्या नऊवारी साडीत दिसली होती. हिरवीकंच नऊवारी आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये अंकिताचा महाराष्ट्रीन ठसका नक्कीच जाणवत आहे. 

Instagram

पांढऱ्या रंगाची पार्टी वेअर साडी -

पांढऱ्या रंगाची पारदर्शक साडी आणि पाऊस हे बॉलीवूडमध्ये अभिनेत्रीचं मोहक सौंदर्य दाखवण्याचं जणू शस्त्रचं आहे. मात्र अंकिताने बिनपावसातच या लुकने चाहत्यांना गार केलं आहे.कारण तिचा हा हॉट लुक तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडला असेल. अंकिताने नेसलेली ही सुंदर पांढरी साडी तुमच्याही कलेक्शनमध्ये असायला हवी. कारण  ती तुमच्या रोमॅंटिक क्षणांना अविस्मरणीय करेल.

Instagram

लाल बनारसी साडीचे पावित्र्य -

सण म्हटलं की लाल रंगाचं महत्त्व हे आलंच. लाल रंग पूजाविधीमध्ये शुभ मानला जातो. या वर्षी गौरीगणपतीला अंकिताने लाल रंगाची बनारसी पॅर्टनची साडी परिधान केली होती. तिच्याकडे दरवर्षी गौरीगणपतीचा  सण खास पद्धतीने साजरा केला जातो. यंदाआईसोबत घरातच हा सण साजरा करताना या साडीमध्ये अंकिताच्या चेहऱ्यावर अगदी पवित्र भाव दिसत आहेत. त्यामुळे फेस्टिव्ह सीझनमध्ये खास लुक करण्यासाठी तुमच्याकडेही अशी लाल बनारसी साडी नक्कीच असायला हवी. 

Instagram

पिवळ्या चंदेरीसाडीचा तोराच न्यारा -

चंदेरी साडी म्हटलं की अनेकींच्या समोर काळ्या चंद्रकलेचं  रूप प्रकट झालं असेल. पण पिवळ्या धम्मक रंगाची आणि हिरवा, सोनेरी काठ असलेली ही पिवळी चंदेरी साडीदेखील खूपच छान वाटत आहे. चंदेरी साड्या नाजूक असल्याने त्यांना थोडं जास्त जपावं लागतं. मात्र सणासुदीला या साड्या नेसण्यासाठी हलक्या आणि आरामदायक असतात. अंकिताचे रूप तर या चंदेरी साडीमध्ये अधिकच खुलून आलेलं आहे. 

Instagram

पोलका डिझाईन साडी -

सणासुदीला तयार होऊन तुम्हाला घरातच राहायचं असेल तर फार जड साडी नेसण्यापेक्षा एखादी हलकी साडी नेसून वावरणं जास्त सोपं जाईल. अंकिताने नेसलेली ही पोलका डिझाईन साडी तिच्या ऑफ शोल्डर ब्लाऊजमुळे नक्कीच खास वाटत आहे. 

Instagram

एव्हर ग्रीन साडी -

यंदा दिवाळी पार्टीसाठी मित्रमैत्रीणींच्या घरी भेटण्यासाठी हा लुक तुम्ही नक्कीच करू शकता. या साडीत अंकिता ग्लॅमरस आणि हॉट वाटत आहे. शिवाय हिरव्या रंगाची ही शेड तिच्यावर अगदी खुलून दिसत आहे. अशा साड्यांवर स्टायलिश ब्लाऊज आणि खास डायमंड कलेक्शन कॅरी करणं हाच बेस्ट पर्याय ठरेल. त्यामुळे या दिवाळी पार्टीसाठी असा काहीतरी खास लुक तुम्हीही करा आणि ग्लॅम दिसा..

Instagram

अंकिताने केलेले हे खास लुक ट्राय करताना मायग्लॅमचे मेकअप प्रॉडक्ट वापरण्यास मुळीच विसरू नका कारण त्यामुळे तुमच्या सौंदर्यात आणखी भरच पडेल. 

Beauty

CHISEL IT CONTOUR KIT - SHOW STOPPER

INR 1,250 AT MyGlamm