कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका - दी क्वीन ऑफ झांसी’ चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटासाठी सर्वच कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका अभिनेत्री कंगना रणौत साकारत आहे. तर अभिनेत्री अंकिता लोखंडे या चित्रपटात 'झलकारी बाई' यांची भूमिका साकारत आहे. अंकिता या चित्रपटातून प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकतच अंकिताने चित्रपटासाठी केलेल्या तलवारबाजीच्या प्रशिक्षणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यासोबतच तिने "आता युद्धाला सुरुवात झाली" असंही शेअर केलं आहे.
View this post on Instagram
अंकिता लोखंडेचा 'खास' अंदाज
या चित्रपटासाठी सर्वच कलाकारांनी विशेष मेहनत घेतली आहे. कंगना आणि अंकिताने तर या चित्रपटासाठी खास घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतलं आहे. चित्रपटात या दोन्ही अभिनेत्रींची तलबाजी पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. झाशीच्या इतिहासामध्ये ‘झलकारी बाईं’ यांचे महत्वपूर्ण योगदान होते. झलकारी बाई राणी लक्ष्मीबाई यांच्या सैन्यातील खास व्यक्ती होत्या. राणी लक्ष्मीबाईंच्या त्या सल्लागार असून अगदी सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत असायच्या. अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या पहिल्याच चित्रपटात झलकारी बाईंची आव्हानात्मक भूमिका साकारत आहे.
View this post on Instagram
मणिकर्णिकाच्या माध्यमातून कंगनाचं 'दिग्दर्शन' क्षेत्रात पदार्पण
मणिकर्णिका चित्रपटातून कंगना पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश करत आहे. कंगनाने मणिकर्णिकाच्या प्रमोशनसाठी अक्षरशः कंबर कसली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना राजेशाही भरजरी साड्या आणि पारंपरिक आभूषणांच्या वेशभूषेमध्ये जात आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंचे निरनिराळ्या वयातील विविध लुक साकारण्यासाठी फारच मेहनत घेण्यात आली.
मणिकर्णिकामधील 'ऐतिहासिक' भूमिका
मणिकर्णिकामध्ये अनेक कलाकार ऐतिहासिक भूमिका साकारत आहेत. मराठी कलाकार वैभव तत्ववादी ‘पूरणसिंग’ यांची भूमिका साकारत आहे. अतुल कुलकर्णी ‘तात्या टोपे’ यांची भूमिका तर सुरेश ओबेरॉय ‘बाजीराव’, डॅनी ‘नानासाहेबां’ची भूमिका तर जिशू सेनगुप्ता ‘गंगाधररावां’ची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचं पोस्टर, ट्रेलर आणि गाणी असं सारं काही भव्य आणि दिव्य स्वरुपात प्रदर्शित करण्यात आलं. या चित्रपटाचे सेट्स आणि लोकेशनमधून 18 व्या शतकातील काळ उभा करण्यासाठी देखील प्रचंड मेहनत घेण्यात आली. विशेष म्हणजे प्रदर्शनाआधी या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग राष्ट्रपतीभवनात आयोजित करण्यात आलं होतं.
आणखी वाचा-
मणिकर्णिकामध्ये कंगना साकारतेय राणी लक्ष्मीबाईंची ‘ही’ विविध रुपं
राष्ट्रपतीभवनात मणिकर्णिकाचं ‘स्पेशल स्क्रिनिंग’
मणिकर्णिका चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला खास ऐतिहासिक टच
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम