मणिकर्णिकानंतर अंकिता लोखंडे झळकणार ‘या’ चित्रपटात

मणिकर्णिकानंतर अंकिता लोखंडे झळकणार ‘या’ चित्रपटात

‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय हिंदी मालिकेमधून पदार्पण केलेली अंकिता लोखंडे आता आणखी एका बॉलीवूड चित्रपटात झळकणार आहे. अंकिताने कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’मधून बॉलीवूड डेब्यू केला होता. अंकिताने तिच्या आगामी चित्रपटाबाबत नुकताच खुलासा केला आहे. लवकरच अंकिता ‘बागी 3’ मधून प्रेक्षकांच्यासमोर येत आहे. या चित्रपटात अंकिताची नेमकी काय भूमिका असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. 

Instagram

'बागी 3' मध्ये अंकिताची काय आहे भूमिका

बॉलीवूडमध्ये सध्या सिक्वलचा ट्रेन्ड आहे. अनेक चित्रपटांचे सिक्वल तयार होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून साजिद नादीयाडवाला यांच्या बागी 3 ची देखील बरीच चर्चा सुरु आहे. निर्मात्यांनी बागीचा दुसरा भाग प्रदर्शित झाल्यावर लगेच तिसऱ्या भागाची देखील घोषणा केली होती. या तिसऱ्या भागात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असेल तर त्याच्यासोबत श्रद्धा कपूर स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे बागी 3 मध्ये अंकिता लोखंडे श्रद्धा कपूरच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून या दोन्ही बहिणीचे स्पेशल बॉंडिग प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

बागी 3 बाबत आणखी काही...

टायगर श्रॉफ बागीच्या पहिल्या दोन्ही भागात प्रमुख भूमिकेत दिसला होता. टायगरला बागीमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. दोन्ही भागातील अत्यंत थरारक अॅक्शनसीन मुळे टायगरला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. बागीच्या दुसऱ्या भागासाठी तर टाययगरने हॉंगकॉंग येथे जाऊन मार्शल आर्टचं खास प्रशिक्षण देखील घेतलं होतं. श्रद्धाने बागीच्या पहिल्या भागातदेखील टायगरसोबत काम केलं होतं. बागी 2 मध्ये मात्र दिशा पटानी टायगरसोबत प्रमुख भूमिकेत दिसली होती.आता बागीमध्ये टायगर, श्रद्धा आणि अंकीला एकत्र पाहण्यासाठी संधी मिळणार आहे. बागी 3 चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

View this post on Instagram

Cast of Baaghi 3 💕💕

A post shared by Baaghi 3 (@baaghi3_) on

मणिकर्णिकामध्ये अंकिताने साकारली होती ‘झलकारी बाई’

राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित मणिकर्णिका चित्रपटातून अंकिताने तिचा बॉलीवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात तिने 'झलकारी बाई' यांची भूमिका साकारली होती.  अंकिताने चित्रपटासाठी केलेल्या तलवारबाजीसह अनेक युद्धकौशल्याचं रितसर प्रशिक्षण घेतलं होतं. ज्यामुळे झलकारीबाईंची भूमिका साकारणं तिला नक्कीच सोपं गेलं.

अंकिता लवकरच अडकणार लग्नबंधात

बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर लगेचच अंकिताच्या अफेअरची चर्चा जोरदार सुरू झाली होती. सुशांतशी नातं तोडल्यावर अंकिता गेले कित्येक महिने विकी जैनला डेट करत आहे. मणिकर्णिकाच्या प्रमोशनच्या वेळी तिने हे मान्यही केलं होतं. अंकिताला नेहमीच कधी लग्न करणार? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. पण अंकिता आणि विकीने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. यावर्षी डिसेंबर अथवा पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये अंकिता आणि विकी लग्न करणार असल्याचं सध्या वृत्त आहे. अंकिता आणि विकी या दोघांच्याही घरच्यांची या लग्नाला परवानगी असून लग्नानंतर दोघेही त्यांच्या नवीन घरामध्ये शिफ्ट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

Good News: रवीना टंडनच्या घरी आला छोटा पाहुणा, रवीनाने दिली गोड बातमी

रितेश - जेनेलियामध्ये नक्की काय बिनसलं, रितेशला दिलं जेनेलियाने सडेतोड उत्तर

पाहा #mrsmukhyamantri ची जोडी सुमी-समरच्या लग्नाचा थाट