अनुप जलोटांनी धारण केला सत्य साईबाबाचा लुक, दिसणार बायोपिकमध्ये

अनुप जलोटांनी धारण केला सत्य साईबाबाचा लुक, दिसणार बायोपिकमध्ये

भजनसम्राट अनुप जलोटा काही ना काही कारणास्तव सतत चर्चेत असतात. बिग बॉसमधील एन्ट्री असू दे की, वयाने लहान असलेल्या जसलीन मथारुसोबत अफेअर्स असू दे. अनुप जलोटा काही ना काही कारणास्तव चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या या नव्या लुकमुळे. सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असलेल्या या भजनसम्राटांनी सोशल मीडियावर त्यांचा हा सत्य साईबाबा लुक टाकला आहे. हा फोटो टाकताच अनेकांना सत्य साईबाबांचा भास झाल्यावाचून राहणार नाही. अनुप जलोटा यांनी हा लुक उगाचच केलेला नाही. तर त्यांनी हा लुक बायोपिकसाठी केल्याचे कळत आहे. या बायोपिकची ही पूर्वतयारी असल्याचे देखील कळत आहे. जाणून घेऊया या विषयी विस्तृतपणे

प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई, फॅमिली प्लॅनिंगबाबत केला मोठा खुलासा

दिसतोय ना मी अगदी सत्य साईंसारखा?

अनुप जलोटा यांनी त्याच्या इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये मेकअप आर्टिस्ट त्यांना या लुकसाठी तयार करत आहे. सत्य साईंसारखा केसांवर कुरळ्या केसांचा टोप, अंगावर भगवी वस्त्र आणि मेकअपच्या साहाय्याने सत्य साईबाबांचा हा लुक साकारण्यात आला आहे. एक लाकडी खूर्चीवर बसून अगदी सत्य साईंची पोझ देत त्यांनी चाहत्यांनाच प्रश्न विचारला आहे की, दिसतोय ना मी सत्य साईबाबांची हुबेहूब कॉपी? त्यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्या फोटोला धडाधड लाईक्सही मिळायला सुरुवात झाली आहे. जर अनुप जलोटा यांनी हा फोटो त्यांच्या पेजवर शेअर केला नसता तर कदाचित पहिल्यांदा पटकन पाहिल्यानंतर कोणालाही विश्वास बसला नसता की, हे अनुप जलोटा आहेत. असे मेकअप कौशल्य यासाठी वापरण्यात आले आहे. त्यामुळेच अनुप जलोटा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

पुढच्या वर्षी येणार बायोपिक

Instagram

आता ज्यासाठी हा सगळा घाट घालण्यात आला आहे. ती गोष्ट म्हणजे अनुप जलोटा हे लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे.  त्यासाठीच त्यांनी हा बाबाचा लुक धारण केला आहे. 2022 मध्ये त्यांचा हा बायोपिक रिलीज होणार असून हा चित्रपट हिंदी, मराठी, तेलुगू आणि इंग्रजी या भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. अनुप जलोटा यांना या वयात मिळालेली ही सगळ्यात मोठी संधी आहे. त्यामुळे अनेकांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या शुटींग संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच या गोष्टीही स्पष्ट केल्या जातील. चित्रपटाची थोडी वाट पाहावी लागेल. दरम्यान, सत्य साईबाबा आहेत तरी कोण ? हे जाणून घेऊया. 

स्टँडअप कॉमेडियनने केली सुशांत सिंह राजपूतची अशी मस्करी, फॅन्सनी केलं ट्रोल

कोण आहेत सत्य साईबाबा?

Instagram

सत्य साईबाबा हे भारतीय अध्यात्मिक गुरु होते. साईबाबांचा अवतार अशी त्यांची प्रचिती होती. त्यांच्या सत्य साईबाबा बनवण्यामागे एक गोष्ट सांगितली जाते ती अशी की, एका तेलुगु कुुटंबात जन्माला आलेल्या सत्यनारायण राजू या मुलाला 14 वर्षांचा असताना दृष्टांत झाला की, तो साईबाबाचा अवतार आहे. त्यावेळी घर सोडून समाजसेवा करण्यासाठी ते बाहेर पडले. इतक्या लहानवयापासूनच त्यांनी त्यांच्या विचाराने लोकांना आकर्षित केले. त्यांचे लाखो अनुयायी असून त्यांच्याशी निगडीत अनेक कॉन्ट्राव्हर्सीज देखील आहेत. 2011 साली सत्य साईबाबा यांचे निधन झाले. पण आजही त्यांची संस्था ही सुरु आहे. 

 

आता या चित्रपटाच्या माध्यमातून सत्य साईबाबांविषयी नेमक्या कोणत्या गोष्टी दाखवण्यात येतील हे चित्रपटाच्या माध्यमातून कळेल.

जुनं ते सोनं' म्हणत भाग्यश्री मोटेने केले फोटो शेअर, सोशल मीडियावर व्हायरल