कल्की केकलाच्या pregnancyवर अनुराग कश्यपने दिली ही प्रतिक्रिया

कल्की केकलाच्या pregnancyवर अनुराग कश्यपने दिली ही प्रतिक्रिया

बॉलीवूड अभिनेत्री कल्की केकला आई होणार ही बातमी तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन कळाली. तिने दिलेल्या या गोड बातमीनंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावही होऊ लागला. कल्कीचा एक्स नवरा म्हणजे अनुराग कश्यप याने देखील तिच्या या गोड बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. अनुराग तिला काय म्हणाला हे कल्कीने एका मुलाखतीत सांगितले आहे. एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर अनुरागच्या मनात आजही कल्कीबद्दल प्रेम असल्याचे नक्की झाले आहे.

‘दहा बाय दहा'ने गाठला सुवर्ण महोत्सवी टप्पा

नेमका काय म्हणाला अनुराग

Instagram

कल्कीला एका मुलाखतीदरम्यान अनुराग या गोड बातमीवर काय म्हणाला असा जेव्हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ती म्हणाली की, अनुरागला ही बातमी कळाल्यानंतर त्याने लगेचच मला फोन केला. त्याने माझे पॅरेंट्स क्लबमध्ये स्वागत केले आणि काहीही गरज लागल्यास मला फोन कर असे देखील त्याने  सांगितले. 

कल्की सध्या करतेय याला डेट

Instagram

कल्की अनुरागपासून वेगळी झाल्यानंतर ती सध्या एका इस्रायली कंपोझर हशबर्ग याला सध्या डेट करत आहे. या दोघांचेच हे बाळ असून लवकरच ती बाळ होणार आहे. कल्की पहिल्यांदाच आई होणार असून तिने काहीच दिवसांपूर्वी हा फोटो शेअर करत ही बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे.

अनुरागसोबत केले होते लग्न

Instagram

कल्की केकलाने अनुराग कश्यपसोबत 2011 साली लग्न केलं. 2015 साली ते वेगळे झाले. त्यांच्यातील मतभेदामुळे ते वेगळे झाले. पण त्यानंतरही त्यांनी अनेक प्रोजेक्टमधून काम केल आहेत. सेक्रेड गेम्स 2 मध्येही कल्की एका वेगळ्या रुपात दिसली होती. त्यात तिची भूमिका वाखाणण्यासारखी होती. या वेबसिरीजचे दिग्दर्शन अनुरागनेच केलेले होते. त्यामुळे त्यांचे रिलेशनशीप जरी आटोक्यात आले असले तरी देखील ते प्रोफेशनलच वागतात.

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आहेत सध्या ‘हे’ हॉट मोस्ट एलिजिबल बॅचलर्स

अनुरागही सध्या रिलेशनशीपमध्ये

अनुराग आणि कल्की दोघेही आपआपल्या आयुष्यात move on  झाले आहेत. अनुराग सध्या एका तरुणीसोबत असून काही दिवसापूर्वी त्याने  तिच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. त्याची ही गर्लफ्रेंड त्याच्यापेक्षा वयानेही लहान आहे. त्याची ही नवीन गर्लफ्रेंड त्याच्यासोबत काम करत असल्याचे देखील म्हटले जात आहे. 

कल्कीचा करीअरग्राफ

Instagram

कल्की ही फ्रेंच अभिनेत्री असून तिचा बॉलीवूडमधील करीअरचा ग्राफ ही फारच चांगला आहे. Dev d मधील तिची भूमिका ही अनेकांना आवडली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. ये जवानी है दिवानी..,  जिंदगी ना मिलेगी दोबारा, रिबन, हॅपी एडिंग, मंत्रा हे तिचे काही गाजलेले चिपट आहे. 

सध्या तरी प्रतिक्षा आहे कल्कीच्या गोड बाळाची त्यामुळे सध्या तरी ती कोणत्याही चित्रपटात दिसणार नाही. पण तिच्या या एका बेबी बंपच्या फोटोनंतर आता तिच्या पुढील फोटची प्रतिक्षा अनेक जण करत आहेत. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.