Good News : अनुष्का - विराटच्या घरी येणार नवा पाहुणा

Good News : अनुष्का - विराटच्या घरी येणार नवा पाहुणा

विराट आणि अनुष्का ही जगातील सर्वांची आवडती जोडी आहे. इटलीमध्ये अगदी कोणाच्याही नकळत या जोडीने 11 डिसेंबर 2017 मध्ये लग्न केलं. त्यानंतर बऱ्याच वेळा या दोघांचे अगदी प्रेमात ओथंबलले फोटोही व्हायरल झाले आहेत. ही जोडी कधी एकदा गुड न्यूज देणार याची त्यांच्या चाहत्यांना आशा होती. ती वेळ आता जवळ आली आहे. काही दिवसांपूर्वीच अनुष्काने म्हटलं होतं की, जेव्हा ते इटलीमध्ये लग्न करण्यासाठी गेले होते तेव्हा तिचा नवरा विराटने त्याचं नाव राहुल करून घेतलं होतं. जसं या दोघांनी आपलं लग्न आधी जगजाहीर होऊ दिलं नाही त्याचप्रमाणे सध्या अनुष्का आपण गरोदर असल्याचं लपवत असल्याचं एका वृत्तपत्रानं म्हटलं आहे.


virushka FI


अनुष्का होणार आई


विराट आणि अनुष्का नेहमीच एकमेकांबरोबर दिसतात. पण सध्या अनुष्काला विराटबरोबर जास्त राहण्याची गरज आहे. विराटबरोबरच तिला राहायचं आहे. कारण ती अशा नाजूक परिस्थितीमध्ये आहे की, तिला विराटने बरोबर असायला हवं असं वाटत आहे असं एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटलं आहे. त्यामुळे विराटही तिच्याबरोबर जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या विराट आयपीएलमध्ये खेळत आहे. त्यामुळे कदाचित अनुष्काला त्याला जास्त वेळ देता येत नाहीये. शिवाय अनुष्का नेहमी विराटला सपोर्ट करायला मॅचदरम्यान हजर असते. पण या आयपीएलच्या वेळी अनुष्काला पाहण्यात आलेलं नाही. त्यामुळे अनुष्का आई होणार असल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळत आहे.


virushka 1


अनुष्काने कोणत्याही नव्या चित्रपटाची घोषणा केली नाही


दरम्यान ‘सुई धागा’ आणि ‘झिरो’ नंतर अनुष्काने कोणत्याही चित्रपटाची घोषणाही केली नाही. त्यामुळे ही गोष्ट ती बऱ्याच काळापासून लपवत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अनुष्काने नुकतंच एका मॅगझिनसाठी शूट केल्याचं समोर आलं असलं तरीही हे शूट काही महिन्यांपूर्वी केल्याचं म्हटलं जात आहे.  त्यामुळे ती गरोदर असल्याच्या शंकेला वाव असल्याचंही म्हटलं जात आहे. शिवाय अनुष्का सध्या जास्त कुठे बाहेरही दिसत नाही. अनुष्काने नेहमीच आपलं आयुष्य खासगी ठेवलं आहे. 


लग्नाला झाली दोन वर्ष


virushka 2


विराट आणि अनुष्काच्या लग्नाला दोन वर्ष झाली असून कधी त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार याची सगळेच उत्सुकतेने वाट पाहात आहेत. ही पहिली जोडी होती ज्यांनी भारताबाहेर जाऊन अशा तऱ्हेने लग्न केलं होतं आणि त्याची सगळीकडेच चर्चा झाली होती. या जोडीने नेहमीच आपलं आयुष्य खासगी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे होणाऱ्या बाळाबाबत जास्त चर्चा होऊ नये असाच विचार या दोघांनी नक्की केला असणार. अनुष्का नेहमीच मीडियापासून आपल्या खासगी आयुष्याबाबत लांब राहिली आहे. केवळ चित्रपटाच्या वेळी चित्रपटाबाबत अनुष्का बोलते. कोणत्याही खासगी प्रश्नांवर अनुष्काला उत्तर देताना आतापर्यंत पाहण्यात आलेलं नाही. काही दिवसांपूर्वीहा अनुष्का विमानतळावर दिसली तेव्हा ती पटकन निघून गेली होती. त्यामुळे आता ही गुड न्यूज अनुष्का आणि विराट नक्की कधी घोषित करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शिवाय विराट आणि अनुष्काने याआधीच बाळाच्या जन्मानंतरही अनुष्का काम करणार असल्याचंदेखील स्पष्ट केलं आहे.


पण हे सगळं असलं तरी एप्रिल महिना चालू झाला आहे आणि ही एप्रिल फूल बनवणारी स्टोरी आहे. कोणालाही दुखवण्याचा हेतू नक्कीच नाही. 


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


अक्षय कुमारची मुलगी 'नितारा'चे जिमनॅस्टिक ट्रेनिंग सुरू


सोशल मीडियावर ‘छा गये छोटे नबाव’, पाहा फोटो


Good News: बॉलीवूड अभिनेत्री आहे गरोदर, फोटो केला शेअर