अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीच्या बातमीवर काय म्हणाली स्वत: अनुष्का

अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीच्या बातमीवर काय म्हणाली स्वत: अनुष्का

अरे देवा ! अभिनेत्री लग्न करत नाही तोच सगळ्यांच्या नजरा त्यांच्या प्रेग्नंसीच्या बातमीवर खिळलेल्या असतात. भारती सिंह, अनिता हसनंदानी, दीपिका पदुकोणनंतर आता पुन्हा एकदा अभिनेत्री अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांचा जणू पूरत आला आहे. ती गरोदर असल्याची बातमी सर्वदूर पसरली आहे. पण कोणतीही शहानिशा न करता ही बातमी पसरल्यामुळे अनुष्का मात्र चिंतेत आली आहे. या सगळ्या प्रकरणावर आता तिने स्वत:च खुलासा केला आहे.

अभिनेता गोविंदाचा दुसऱ्या लग्नाबद्दल खुलासा, पहिलं लग्नही लपवलं होतं

प्रेग्नंसीच्या चर्चांना का आलं उधाण

Instagram

2017 साली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधनात अडकली. कोणतीही पूर्वकल्पना न देता अत्यंत अलिप्तपणे या दोघांनी लग्न केलं. विरुष्काचे हे लग्न कित्येक दिवस गॉसिपचा विषय होता. या कपलकडे कित्येकांचे लक्ष होते.त्यांच्या प्रत्येक गोष्टी त्यानंतर अगदी बारकाईने पाहिल्या जाऊ लागल्या. अनुष्काने लग्नानंतर  zero नावाचा एकच चित्रपट शाहरुख खानसोबत केला. त्या चित्रपटानंतर तिने एकही चित्रपट तिने केला नाही किंवा तिचा आगामी प्रोजेक्ट लोकांना कळू शकला नाही. त्यामुळेच अनुष्का इतका गॅप का घेत आहे हे लोकांना कळत नाहीए. आता तिचे हेच काम न करणे म्हणजे प्रेग्नंसीचा विचार करणे असावे, असा अंदाज बांधत तिच्या चाहत्यांनी तिचे काम न करणे हे Good newsचे लक्षण समजून त्यांनी प्रेग्नंसीच्या बातम्या पसरवल्या. पण आता ती या सगळ्यावर व्यक्त झाली आहे.

इनायासह काढलेल्या फोटोवर सोहा अली खानला नेटकऱ्यांनी दिल्या वाईट कमेंट्स

 

आता या सगळ्यावर काय म्हणाली अनुष्का

Instagram

ज्यावेळी अनुष्काला ही गोष्ट विचारण्यात आली. तेव्हा ती म्हणाली की, मला माझ्या आयुष्यातील महत्वाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. एखादी अभिनेत्री कोणाला डेट करते तेव्हा ती लग्न कधी करते असे विचारले जाते.. आता लग्न केल्यानंतर लोकांना good news ची घाई असते. इतरांसारखे आम्हालाही आमचे आयुष्य जगू द्या. अशा गोष्टींचे स्पष्टीकरण द्यायला अगदी नकोसे वाटते. काय सांगायचे अजून .. असे म्हणत तिने या गोष्टीचे खंडन केले आहे. त्यामुळे सध्या तरी अनुष्का कोणत्याही प्रकारे फॅमिली प्लॅनिंगसाठी तयार नाही.आणि तिने तिचा निर्णय इतरांवर अवलंबून नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

सध्या अनुष्काच्या पुढे वेगळा पेच

भारताने यंदाची वर्ल्डकपची सेमीफायनल मॅच हरल्यानंतर भारतीय संघामध्ये तणाव जाणवू लागला आहे. विशेषत: रोहित शर्मा आणि विराट कोहलीमध्ये काही नीट नसल्याचे म्हटले जात आहे. अनुष्काला ज्यावेळी विराटच्या चिडण्यावरुन विचारल्यानंतर तिने विराटची पाठराखण केली होती. खेळताना प्रत्येक खेळाडूमध्ये aggressionगरजेचे असते. त्याशिवाय त्याला खेळण्याचे स्पिरीट कसे येणार असे तिने सांगितले होते. त्यामुळे इतरांच्या कोणत्याही गॉसिपपेक्षा तिला विराटचे पॅशन महत्वाचे वाटत आहे. 

GoodNews : अजिंक्य रहाणे आणि राधिकाच्या आयुष्यात लवकरच येणार नवीन पाहुणा

अनेक अभिनेत्रींच्या प्रेग्नंसीच्या अफवा

2017 नंतर अनेक अभिनेत्रींच्या प्रेग्नंसीच्या अफवा येऊ लागल्या. कारण विराट- अनुष्का, भारती सिंह- हर्ष लिंबाचिया, दीपिका पदुकोण- रणवीर सिंह यांनी लग्न केलं. काही दिवसांपूर्वी भारतीच्या प्रेग्नंनीच्या अफवा येत होत्या. पण त्यावर भारतीने अगदी मिश्किलपणे उत्तर देत माझे पोट मोठे आहे. त्यामुळे लोकांना मी गरोदर वाटते. आता काय करावे..