जेव्हा विराट-अनुष्काला त्या कुटुंबाने ओळखलंच नाही

जेव्हा विराट-अनुष्काला त्या कुटुंबाने ओळखलंच नाही

बॉलीवूड सेलेब्स जिथे जातात तिथे त्यांना मुंबईत कॅमेरा घेऊन फॉलो केलं जातं. अगदी ते कुठेही गेले तरी पापाराझ्झी किंवा लोकं लगेच ऑटोग्राफ आणि सेल्फीसाठी मागे येतातच. त्यामुळे सेलिब्रिटीसुद्धा कधी कधी वैतागून जातात. पण जेव्हा हेच सेलेब्स एखाद्या ठिकाणी गेल्यावर त्यांना कोणी ओळखलंच नाही आणि तरीही भरपूर प्रेम दिलं तर. असाच किस्सा घडला बॉलीवूड आणि क्रिकेट कपल विरूष्कासोबत.

Instagram

भूतानमधला आगळावेगळा अनुभव

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) सध्या भूतानमध्ये आहेत. जिथे त्यांना एका कुटुंब भेटलं आणि मिळाला अनोखा अनुभव. या कुटुंबाने दिलेला अनुभव अनुष्कासाठी ठरला हृदयस्पर्शी. याबाबतचा अनुभव अनुष्काने तिच्या सोशल मीडियावरही शेअर केला.

Instagram

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा भूतानमध्ये ट्रेकींग करत आणि निर्सगाच्या सानिध्यात वेळ घालवत आहेत. विराट कोहलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही खास ट्रीप दोघं एन्जॉय करत आहेत. या दरम्यान भेटलेल्या कुटुंबाबाबतचा फोटो आणि अनुभव अनुष्काने इन्स्टाग्रामवर शेअर केला. या कुटुंबाकडून विरूष्काला खूप प्रेम मिळालं. त्यांच्या या प्रेमाने विरूष्काला गहिवरून आलं. साहजिकच आहे बॉलीवूडच्या खोट्या दुनियेपेक्षा हा अनुभव नक्कीच वेगळा होता. 

अनुष्काचे हृदयस्पर्शी शब्द

तिने लिहीलं आहे की, आज एका छोट्या गावाजवळ आम्ही ट्रेकींग करत असताना चार महिन्यांपूर्वी जन्मलेल्या बछड्याला पाहिलं आणि त्याच्याशी खेळण्याची संधी मिळाली. आम्ही जेव्हा असं करत होतो तेव्हा त्या घराच्या मालकाने आम्हाला विचारलं की, तुम्ही थकला आहात का आणि तुम्ही चहा घ्याल का? त्यांनी असं आमंत्रण दिल्यावर आम्ही त्या सुंदर घरात गेलो आणि कुटंबाला भेटलो. ज्यांना आम्ही कोण आहोत हे माहीतच नव्हतं. तरीही त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं. आम्ही त्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवला आणि चहाचा आस्वाद घेत गप्पा मारल्या. या दरम्यान त्या कुटुंबाला फक्त हेच माहीत होतं की, आम्ही दोन ट्रेकींग करून थकलेले पर्यटक आहोत.

Instagram

अनुष्काने पुढे हेही म्हटलं की, त्यांच्या या प्रेमाने आणि अगत्याने माझ्या आणि विराटच्या मनाला स्पर्श केला. विराट आणि मला जवळून ओळखणाऱ्यांना हे माहीत आहे की, आम्ही खूप सरळ आणि खऱ्या मनाच्या लोकांमध्ये राहणं पसंत करतो. त्यामुळे आम्हाला हे जाणून आनंद झाला की, हे कुटुंब फक्त दोन परदेशी पर्यटकांबद्दल द्या आणि प्रेम दाखवू इच्छित होतं. आयुष्याचा खरा अर्थ हा नाहीतर काय आहे. अशा आठवणी नेहमी जतन करू ठेवायला हव्या.  

खरंच असं प्रेम सगळ्यांनाच मिळेल असं नाही. लकी कपल विरूष्का.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.