बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काही दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसत नाही आहे. शिवाय नुकतंच तिला मुंबईतील एका फिजिओथरपी क्लिनिकच्या बाहेर स्पॉट करण्यात आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुष्का शर्मा सध्या एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. अनुष्का सध्या ‘बल्जिंग डिस्क’ या आजाराशी झुंज देत आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी ती फिजिओथेरपी घेत असल्याचं समोर आलं आहे. अनुष्काला या पूर्वीदेखील बल्जिंग डिस्क या आजारापणामुळे त्रास झाला होता. आता तिच्या या दुखण्याने दुसऱ्यांदा डोक वर काढलं आहे. शिवाय तिचं हे दुखणं दिवसेंदिवस वाढतच आहे. याच कारणांसाठी ती अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.
काय आहे बल्जिंग डिस्क
‘बल्जिंग डिस्क’ हा एक गंभीर कंबर दुखीचा आजार आहे. या आजारात कंबरेच्या हाडांमधून भयंकर वेदना जाणवतात. ज्यामुळे रूग्णाला उठणं आणि बसणं देखील कठीण जातं. बैठी जीवनशैली असलेल्या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा या आजारपणाच्या विळख्यात सापडली आहे.
आजारी असूनही पतीसाठी वर्ल्ड कपमध्ये होणार सहभागी
आजारी असूनही नवऱ्याच्या प्रेमाखातर आणि त्याला चिअरअप करण्यासाठी अनुष्का क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहे. कारण तिला तिच्या आजारपणाचा बाऊ करायचा नाही. शिवाय या कारणामुळे वर्ल्ड कपमध्ये विराटच्या परफॉर्मन्समवर कोणताही फरक पडावा असं तिला मुळीच वाटत नाही. त्यामुळे ती फिजिओथेरपी घेऊन लवकरच बरी होऊन वर्ल्ड कपच्या मॅचेस पाहण्यासाठी जाणार आहे .
अनुष्काचं बॉलीवूड करिअर
अनुष्काने तिच्या फिल्मी करियरला शाहरूख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’ या सिनेमाने 2008 साली केली होती. तर मागच्या वर्षीच आलेल्या झिरो सिनेमामध्येही ती शाहरूख खान आणि कैटरीनासोबत झळकली होती. या 10 वर्षांच्या काळात तिने अनेक चांगले चित्रपट आणि चांगल्या भूमिका केल्या. अनुष्का मागच्या वर्षी तीन चित्रपटात झळकली होती. ‘परी’ हा तिचा चित्रपट खास चालला नाही. तिच्या ‘सुई धागा’ ने प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ घातली होती. जीरो या चित्रपटाची ही खूप चर्चा झाली पण तोही खास चालला नाही. झिरो 2018 साली रिलीज झाला पण बॉक्स ऑफिसवरही त्याला झिरोच प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानंतर अनुष्काने आतापर्यंत एकाही सिनेमाची घोषणा केलेली नाही. ज्यामुळे तिने आपल्या फिल्मी करिअरला बाय बाय केल्याची चर्चा रंगतेय. यासोबतच अशीही बातमी होती की, अनुष्का प्रेग्नंट तर नाही ना… यावर अनुष्काने ती सध्या डिजीटल प्लेटफॉर्मसाठी शो बनवत आहे असं सांगितलं होतं. तसंच ती एका चित्रपटावरही काम करत आहे अशी चर्चा होती. मात्र आता ती चित्रपटांपासून दूर असण्याचं खरं कारण समोर आलं आहे. अनुष्का या आजारपणातून लवकरात लवकर बरी व्हावी अशी तिचे चाहते व्यक्त करत आहेत.
विवेक ओबेरॉयचं ट्विट हे घृणास्पद आणि वर्गहीन, सोनम कपूरचं स्पष्ट मत
Good news: कपिल शर्मा लवकरच बनणार ‘बाबा’
‘मिस्टर इंडिया 2’ येणार परत, पुन्हा मोगँम्बो खुश होणार
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम