...आणि भावुक झालेल्या विराटला अनुष्काने सावरले

...आणि भावुक झालेल्या विराटला अनुष्काने सावरले

‘विरुष्का’ एकमेकांसाठी किती परफेक्ट आहेत ते आपण नेहमीच पाहिले आहे. एकमेकांना ते नेहमीच पाठिंबा देतात. एका इव्हेंटदरम्यान विराटला असा काही प्रसंग समोर आला की, विराटला त्याचे अश्रू अनावर झाले. मग काय त्याच्या शेजारी बसलेल्या अनुष्काने विराटला सांभाळायचे काम केले. विराट कोहलीसोबत या कार्यक्रमाला टीम इंडियाचे अन्य खेळाडूही उपस्थित होते. पण विराट आणि अनुष्काचा ‘इश्कवाला लव्ह’ पाहता सगळ्यांनीच त्यांना क्युट कमेंट अशा कमेंट दिल्या आहेत आणि इतर कपलसाठी त्यांनी आणखी एका #couplegoal सेट केला आहे.

पुन्हा एकदा ‘ड्रीमगर्ल’ची जादू, पण वेगळ्या स्वरूपात

नेमकं काय झालं?

दिल्ली येथील फिरोज शहा मेहता कोटला या स्टेडिअमचे नाव बदलून पूर्व वित्त मंत्री दिवंगत अरुण जेटली यांचे नाव या स्टेडिअमला देण्यात आले.  नामकरणविधीचा हा दिमाखदार सोहळा दिल्लीत पार पडला.या सोहळ्यासाठी सर्व खेळाडू एकत्र आले होते. या कार्यक्रमादरम्यान एक घोषणा करण्यात आली ती म्हणजे या स्टेडिअमवरील एका स्टँडला विराट कोहलीचे नाव देण्यात येणार आहे. ही घोषणा झाल्याबरोबर विराट कोहलीला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. त्याच्या डोळ्यात रडू कोसळले. त्याच्या शेजारी बसलेल्या अनुष्काने त्यावेळी विराटला सावरले. त्याचा हात हातात घेऊन तिने त्याला शांत केले.तिने अत्यंत समजूतदारपणा दाखवत विराटला शांत करत हा आनंद साजरा केला. ती सावलीप्रमाणे या कार्यक्रमात विराटसोबत वावरत होती. 

व्हिडिओ होतोय व्हायरल

अनुष्काचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.तिच्या समजूतदारपणाची सगळीकडे चर्चा आहे. अनुष्काचे फॅन तिच्या या वागण्याची तारीफ करत आहे. पुन्हा एकदा त्यांच्या या प्रेमाची ओळख सगळ्या जगाला झाली आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ हे सगळे सांगून जातात.  हा व्हिडिओ पुन्हा एकदा त्या प्रेमाची साक्ष आहे.

#Nostalgia : गौरीने शाहरूख-काजोल लुक केला होता डिझाईन

अनुष्काने घेतला आहे ब्रेक

Instagram

अनुष्का शर्माने शाहरुखसोबत झिरो या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे तिने ब्रेक घेतला आहे, असे म्हटले जात आहे. तिचा हा ब्रेक तिने फॅमिली प्लॅनिंगसाठी घेतला जात असल्याच्यादेखील चर्चा होत आहे. पण त्याबाबत अनुष्काने काही महिन्यांपूर्वी खुलासा केला. तिने लोकांना यामध्ये पडू नका असे म्हटले होते. हा विराट आणि माझा वैयक्तिक प्रश्न असल्याचे तिने म्हटले होते.

गौरी कुलकर्णीला अभिनयासोबत आहे ‘या’ गोष्टीची आवड

विरुष्का आणि त्यांचे प्रेम

Instagram

विराट आणि अनुष्का यांच्या प्रेमाची प्रचिती नेहमीच त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन येत असते. त्यांचे फोटो. व्हिडिओज याची साक्ष आहेत. व्यग्र वेळापत्रक असून देखील एकमेकांना वेळ देण्यास ते टाळत नाहीत. त्यांचे कित्येक व्हेकेशन व्हिडिओ, फोटोज कायम व्हायरल होत असतात. त्यामुळे इतरांनीही त्यांच्याकडून खूप काही शिकायला हवे. व्यग्र आयुष्यातून आपल्या माणसासाठी वेळ काढणे आणि त्याचे आयुष्य समजून घेणे किती महत्वाचे असते हे अनुष्काने जाणले आहे. म्हणूनच ती तिच्या करिअरसोबत विराटच्या करीअरलाही जास्त सिरिअस घेताना दिसते. 

तर सध्या सोशल मीडियावर केवळ रंगतेय ती फक्त या दोघांची चर्चा. तुम्ही देखील हा व्हिडिओपाहून तुम्हाला काय वाटते ते आम्हाला नक्की कळवा.