आराध्या बच्चनचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आराध्या बच्चनचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बॉलीवूड सेलिब्रेटी ऐश्वर्या आणि अभिषेक यांची मुलगी आराध्याचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या ऐश्वर्या आणि आराध्या कान्स चित्रपट महोत्सवासाठी  गेल्या आहेत. मात्र तिथे जाण्यापूर्वी आराध्याने हा डान्स परफॉमन्स सादर केला होता. कोरिओग्राफर शामक दावरने त्याच्या अॅकेडमीचा पंचविसावा समर फंक आयोजित केला होता. आराध्याने पहिल्यांच तिच्या शाळेव्यतिरिक्त एक पब्लिक डान्स परफॉर्मन्स दिला. ‘शामक दावर समर फंक’ शोमध्ये भाग घेत तिने तिच्या नृत्याचे कौशल्य दाखवले. या व्हिडीओमध्ये आराध्याने गुलाबी रंगाची ड्रेस आणि त्यावर डेनिम जॅकेट घातलं होतं. आराध्याचा डान्स परफॉमन्स पाहण्यासाठी तिची आई ऐश्वर्या राय बच्चन, वडील अभिषेक बच्चन, आजी जया बच्चन आणि वृंदा राय आणि आत्या श्वेता बच्चन आराध्याला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. आजोबा अमिताभ बच्चन मात्र त्यांच्या चित्रपटांच्या शूटिंगमुळे आराध्याचा डान्स पाहण्यासाठी आले नाहीत. यावेळी आराध्याने रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या गली बॉयमधील 'मेरे गली में' या गाण्यावर ठेका धरला होता. आराध्याचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर जवळजवळ अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.   
 

 

 


View this post on Instagram


 

 

#aradhyabachchan cool entry today for @shiamakofficial #summerfunk25years @viralbhayani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
आराध्याच्या व्हिडीओला अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज


आराध्याचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांची मने जिंकत आहे. मात्र असे असलं तरी काहीजणांचं मत मात्र याबाबत थोडं वेगळ असल्याचं दिसत आहे. कारण या व्हिडीओत एका ठिकाणी आराध्याचा ड्रेस अडकला आणि ती धडपडली मात्र तिने पुन्हा तिचा डान्स सुरू केला. त्यामुळे काहीजणांच्या मते ऐश्वर्या तिच्या मुलीची अती काळजी घेत असल्यामुळे असं झाल्याचं म्हणणं आहे. तर काहीजण आराध्या पुन्हा धीटपणे डान्स करत राहिली यावर तिचं कौतुक करत आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#jayabachchan #abhishekbachchan and #shwetabachchannanda at #summerfunk25years @viralbhayani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
कान्समध्ये ऐश्वर्या आणि आराध्याचा हटके लुक


ऐश्वर्या आणि आराध्या सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या आहेत. मागील वर्षांपासून ऐश्वर्या कान्समध्ये आराध्यासोबतच जाते. ती अनेक ठिकाणी तिच्या मुलीला बरोबर घेऊन जाते. त्यामुळेच लोक तिला एक ओव्हरप्रोटेक्टिव्ह आई असंही म्हणतात. यंदाच्या कान्समध्ये ऐश्वर्या फिश कट मर्मेड सोनेरी रंगाच्या गाऊन लुकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. शिवाय तिच्यासोबत आराध्याने सोनेरी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे कान्समधील या मायलेकींचा लुक देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


प्राचीन भेटवस्तूंबद्दल देखील वाचा
 

 

 


View this post on Instagram


 

 

#aishwaryarai with daughter #aaradhyabachchan arrive at #cannes2019


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
लवकरच मराठी पडद्यावर येतोय 'सत्यशोधक' चित्रपट


Bad News:अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बाॅम्ब'मुळे 'सूर्यवंशी' अडचणीत


डार्लिंग हबीने दिल्या दीपिकाच्या फोटोवर अशा रोमँटीक कमेंट्स


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम