अरबाज खानची गर्लफ्रेंड करणार वकिली

अरबाज खानची गर्लफ्रेंड करणार वकिली

बॉलीवूड अभिनेता आणि सलमानचा भाऊ असणारा अरबाज खान काही महिन्यांपूर्वी चर्चेत होता तो त्याच्या इटालियन गर्लफ्रेंडमुळे. मलायकापासून विभक्त झाल्यावर आता अरबाजच्या आयुष्यात जॉर्जिया एंड्रियानी आली आहे.अरबाजची इटालियन गर्लफ्रेंड म्हणजेच अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी लवकरच बॉलीवूडमध्ये श्रेयस तळपदेसोबत "वेलकम टु बजरंगपूर" मधून पदार्पण करणार आहे. या आधी जॉर्जियाने तामिळ वेबसीरिज "कॅरोलिना कामाक्षी" मध्ये इटालियन एजन्टची भूमिका केली होती आणि आता लवकरच ही इटालियन ब्युटी जॉर्जिया आपल्याला नव्या अंदाजात नवीन भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच जॉर्जियाचे हॉट फोटोजही व्हायरल झाले होते.

जॉर्जिया एंड्रियानी ही खरंतर एक इटालियन मॉडेल आणि डान्सर आहे. पण आता भारतात आल्यावर ती बॉलीवूड आणि अभिनयात स्वतःचं नशीब अजमावत आहे. 

बॉलीवूड आणि कोलिवूडनंतर जॉर्जिया "व्हिक्टीम" नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये एका वकिलाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिचं पात्र एका वकीलाचं असून काही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये या शॉर्ट फिल्मचा प्रीमियर करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमन के जंगवाल यांनी केलं आहे, विनिल गुप्ता निर्मित आणि कास्टिंग मनीष शुक्ला यांनी एकत्र केलं होतं.

सोशल मीडियावरही नेहमीच अरबाज आणि जॉर्जियाचे सोबतचे फोटोज व्हायरल होत असतात.

दक्षिणेतील वेबसीरिज 'करोलिन कामाक्षी' मधील इंडो-फ्रेंच एजंट म्हणून जॉर्जिया एंड्रियाने सर्वांना प्रभावित केलं होतं. तिचा बॉलिवूड डेब्यू 'वेलकम टू बजरंगपूर' गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. त्याशिवाय अरबाज खान आणि प्रिया वारियर अभिनीत बहुप्रतिक्षित "श्रीदेवी बंगलो" मध्ये आयटम नंबरमधून आपल्या नृत्याच्या जलवासुद्धा ती प्रेक्षकांना दाखवणार आहे.

ग्लॅमर आणि फिटनेस दोन्हीमध्ये जॉर्जिया कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्रीला टक्कर देऊ शकते. तिचे योगा करतानाचे फोटोजही मध्यंतरी सोशल मीडियावर झळकले होते.

View this post on Instagram

See you tomorrow sun #sunsets #me #simply 👋🏻🌞

A post shared by Giorgia Andriani (@giorgia.andriani22) on

जॉर्जिया एंड्रियानीचे इंस्टाग्रामवर तब्बल एक लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. जॉर्जियाने 2017 साली आलेल्या गेस्ट इन लंडन या चित्रपटातही भूमिका केली होती.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.