लॉकडाऊनमध्ये टायगर आणि दिशा लिव्ह-इनमध्ये रहात असल्याची चर्चा

लॉकडाऊनमध्ये टायगर आणि दिशा लिव्ह-इनमध्ये रहात असल्याची चर्चा

बॉलीवूडमधल्या सर्वात जास्त चर्चित आणि सो कॉल्ड कपलमध्ये नाव आहे ते टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीचं. ज्यांचं भरपूर प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे. या दोघांनी कधीच आपल्या नात्यांबद्दल कुठेही वाच्यता केलेली नाही. पण त्यांचे एकत्र आऊटिंग, मूव्ही डेट्स आणि डिनर डेट्सचे फोटो मात्र नक्कीच व्हायरल होत असतात. ज्यामुळे या दोघांमध्ये नक्कीच नातं असल्याचा पुरावा मिळतो. एकीकडे देशात कोविड-19 मुळे लॉकडाऊन आणि सर्वजण होम क्वारंटाईन असताना दिशा आणि टायगरच्या बहिणीचा क्युट डान्स व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच चर्चांना सुरूवात झाली की, दिशा आता टायगरच्या फॅमिलीसोबत तर राहत नाही ना.

दिशा आणि टायगरचं लिव्ह-इन गौडबंगाल

या चर्चांना सुरूवात होताच दिशा आणि टायगरनी मात्र मौनचं बाळगलं. पण टायगरची बहिणी क्रिश्ना श्रॉफने याबाबत खुलासा केला आहे. क्रिश्नाने दिशा आणि टायगरच्या लिव्ह-इनबाबत काही सांगत नसलं तरी दिशा ही आमच्या घराजवळच राहते आणि त्या दोघी घरासाठी लागणारं सामान आणायला एकत्र जातात. हेही सांगितलं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत क्रिश्नाने म्हणाली की, तिचं आणि दिशाचं चांगलं जमतं आणि त्यामुळे त्या दोघी बरेचदा एकत्र बाहेर जातात.

इन्स्टा पोस्टमध्ये मिळालं दिशाला क्रेडिट

View this post on Instagram

Makeup by @dishapatani.

A post shared by Krishna Shroff (@kishushroff) on

टायगरच्या घरच्यांशी आणि मुख्यतः क्रिश्ना श्रॉफशी दिशाची जवळीक असल्याचा अजून एक पुरावा मिळाला तो क्रिश्नाच्या इन्स्टा पोस्टमुळे. क्रिश्नाने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टापोस्टमध्ये मेकअपचं क्रेडिट दिलं ते दिशाला. फक्त एवढंच नाहीतर या दोघींचं फिटनेसच्या बाबतही चांगलंच जुळतं. आता साहजिक आहे ना, बॉयफ्रेंडशी जुळल्यावर मग हळूहळू प्रयत्न सुरू होतात ते त्याच्या घरच्यांशी मैत्री करण्याचे नाही का....

टायगर आणि दिशाची मैत्री

एकीकडे क्रिश्नाने असंही म्हटलं की, टायगर नेहमीच एकटा फिरत असे. पण दिशाची त्याला कंपनी मिळाली. तेव्हापासून मला पटलं की, दिशा कूल गर्ल आहे. तिने सांगितलं की, तो (टायगर) आणि दिशा हे तरी बऱ्याच काळापासून मित्र आहेत. आमचं फिटनेसमुळे जुळलं. तुमच्या माहितीसाठी टायगरप्रमाणेच क्रिश्नाही फिटनेसबाबत जागरूक असून तिचं स्वतःचं जिमही आहे. 

दिशा आणि टिकटॉक

दुसरीकडे दिशा पटानी लॉकडाऊनमधला वेळ टीकटॉक व्हिडिओज करून सत्कारणी लावत आहे. तिच्या व्हिडिओजमध्येही बरेचदा क्रिश्ना श्रॉफ असते. तसंच हे तिघं घरात अनेक गेम्स एकत्र खेळतात आणि डिनरसुद्धा एकत्र करतात.

कसं जुळलं दिशा आणि टायगरचं

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांना सर्वात आधी बेफ्रिरे या मुझ्यिक अल्बममध्ये पाहण्यात आलं होतं. तेव्हापासून फॅन्सना त्यांची केमिस्ट्री आवडते. याबाबतचा व्हिडिओ दिशाने इन्स्टावर शेअर केला होता. नंतर या दोघांचा 'बागी 2' हा चित्रपट एकत्र आला आणि तो हिट ठरला. चला आता दिशाने टायगरच्या बहिणीचं मन जिंकलं आहेच. इतर श्रॉफ कुटुंबियांचं मनही ती नक्कीच जिंकेल यात शंका नाही.