ADVERTISEMENT
home / मनोरंजन
रश्मी देसाईच्या खात्यातून अरहान खानने घेतले 15 लाख, चाहत्याने केली पोलखोल

रश्मी देसाईच्या खात्यातून अरहान खानने घेतले 15 लाख, चाहत्याने केली पोलखोल

बिग बॉस 13 संपले असले तरीही रश्मी देसाई आणि अरहान खानच्या मागचे शुक्लकाष्ठ काही संपण्याचे नाव घेत नाही. ट्विटरवर #FrauArhaanKhan असा ट्रेंड सुरू झाला असून रश्मी देसाई बिग बॉसमध्ये असताना अभिनेता अरहान खानने तिच्या बँक खात्यातून तिला न सांगता 15 लाख रूपये घेतल्याचा तथाकथित आरोप रश्मीच्या चाहत्यांनी केला असून त्यांनी त्याचे पुरावेही दिले आहेत. त्यामुळेच अरहान खानच्या नावाने सध्या वरील हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अरहानने केवळ पैसेच काढले नाहीत तर रश्मीला धमकावले असल्याचेही सांगण्यात येत आहे. तिच्या बँकेचे स्टेटमेंटही सध्या व्हायरल होत आहे. कोणत्या प्रकारे पैसे काढण्यात आले आहे याचे स्क्रिनशॉट्स शेअर करण्यात आल्याने सध्या पुन्हा एकदा हे दोघे ट्रेंडिंगमध्ये आहेत. 

ब्रेकअपनंतर अधिक बोल्ड आणि ब्युटीफूल झाल्या या अभिनेत्री

अरहान खानने 15 दिवसात 15 लाख काढल्याचा आरोप

अरहान खानने 5 दिवसात 15 लाख काढल्याचा आरोप ट्विटरवर एका युजरने केला आहे. तसेच हे पैसे काढून अरहानने प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्मसाठी वापरल्याचाही आरोप करण्यात आला आहे. रश्मी देसाईच्या फॅन क्लबने रश्मीदेसाईसाठी आम्हाला न्याय हवा आहे. तिने अतिशय मेहनतीने हे पैसे कमावले असून तिच्या पैशांचा अरहान खानने गैरवापर केला असल्याचे ट्विट केले आहे. तसेच याची त्याला लाज असायला हवी असेही म्हटले आहे. याशिवाय अरहान खानला रश्मीच्या चाहत्यांनी ‘गोल्ड डिगर’ असेही म्हटले आहे. तसेच बिग बॉसमध्ये काय झाले हे बाजूला ठेऊन रश्मीला न्याय मिळवून देण्यात आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवे अशा स्वरूपाचे ट्विटही सध्या व्हायरल होत आहेत. फ्रॉड अरहान खानला त्याची शिक्षा मिळायला हवी अशा स्वरूपाचेही अनेक ट्विट्स सध्या व्हायरल होत असून रश्मी देसाईचे चाहते सध्या यामध्ये हिरीरिने सहभागी होत आहेत. 

लॉकडाऊनमध्ये टायगर आणि दिशा पटानी लिव्ह-इनमध्ये रहात असल्याची चर्चा

ADVERTISEMENT

अरहान खानने फसवल्याचे बिग बॉसमध्येच कळले

रश्मी देसाई अरहान खानच्या अतिशय जवळ होती. मात्र अरहान खानने काही गोष्टी तिच्यापासून लपवून ठेवल्या. त्याचे पहिले लग्न आणि त्याच्या मुलाबद्दल तिला कोणतीही माहिती त्याने दिली नसल्याने त्याने तिचा विश्वास तोडला. तसेच तिच्या अनुपस्थितीत तिच्या घराचा ताबा त्याने घेतला आणि तिच्या पैशाचा गैरवापर केल्याचेही सलमान खानने तिच्या लक्षात आणून दिले. रश्मीला याबाबत ती बिग बॉसमध्ये असतानाच कळले. त्यानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आला. आता रश्मी तिच्या कुटुंबाबरोबर राहात असून तिने अरहान खानशी पुन्हा संवाद न साधण्याचे ठरवले आहे. हे दोघेही वेगळे झाले असले तरीही रश्मीला फसवून अरहान खानने काढलेले पैसे तिला परत मिळायला हवेत असा ट्रेंड सध्या रश्मीच्या चाहत्यांनी सुरू केला आहे.  बिग बॉसनंतर तिच्या चाहत्यांमध्ये अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र लवकरात लवकर फसवणूक केलेल्या अरहान खानला शिक्षा मिळावी असेही तिच्या चाहत्यांना वाटत आहे आणि त्यासाठीच त्यांनी सध्या सोशल मीडियावर #FrauArhaanKhan असा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. 

अभिनेता रोनित रॉयने घरीच टी-शर्टपासून तयार केला मास्क

नागिन 4 मध्ये सध्या रश्मीची वर्णी

बिग बॉस नंतर रश्मीची वर्णी नागिन 4 या एकता कपूरच्या प्रसिद्ध मालिकेत लागली आहे. रश्मीने याआधीही अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे मालिकेचे चित्रीकरण थांबले असून रश्मीही इतर कलाकारांप्रमाणे आपल्या घरातील कामांमध्ये व्यस्त असून आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे. आता लॉकडाऊन संपण्याची वाट बघत असून लॉकडाऊननंतर पुन्हा चित्रीकरणाला सुरूवात करेल. 

 

ADVERTISEMENT

 

21 Apr 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT