Wedding Bells: ‘लग्नघटिका आली समीप’, मलायका - अर्जुन चढणार बोहल्यावर

Wedding Bells: ‘लग्नघटिका आली समीप’, मलायका - अर्जुन चढणार बोहल्यावर

गेल्या कित्येक महिन्यापासून मलायका आणि अर्जुन कधी लग्न करणार याची चर्चा रंगली आहे. बरेच महिने हे दोघंही विविध ठिकाणी डेटवर एकत्र दिसत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच मलायकाने करिना कपूर खानच्या शो मध्ये आपल्या घटस्फोट आणि पुन्हा एकदा आयुष्यात प्रेमात असल्यावर काय वाटतं यावर खुलासा केला. तेव्हापासूनच मलायका लवकरच अर्जुनबरोबर विवाहबद्ध होणार हे सर्वांनाच कळलं आहे. फक्त आता नक्की तारीख कोणती हा प्रश्न होता. तर मलायका आणि अर्जुन यांच्या चाहत्यांसाठी आता ही खूशखबर आहे ती म्हणजे येत्या 19 एप्रिलला ही जोडी चर्च वेडिंग करत आहे. याआधीदेखील मीडियामध्ये या संबंधी बातम्या आल्या तेव्हा मलायकाने ‘मीडिया मेड’ गोष्टी असल्याचं सांगितलं होतं. पण शेवटी हीच गोष्ट खरी ठरली आहे. जवळचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंब या लग्नाला हजर असणार असून अर्जुनचा बेस्ट फ्रेंड रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणदेखील या लग्नाला हजर असल्याचं सध्या म्हटलं जात आहे.


arjun malaika %281%29


करिनाने दिली होती हिंट


काही दिवसांपूर्वीच करिना कपूर खान करण जोहरच्या शो मध्ये आली असता तिने या लग्नाबद्दल एक प्रकारे हिंट दिली होती. प्रियांका चोप्रा जोनस आणि करिना कपूर खान यांच्याशी गप्पा मारत असताना मलायका आणि अर्जुनच्या लग्नाचा विषय निघाला होता. त्यावेळी करिनाला करणने विचारलं होतं की, तू या लग्नात ब्राईड्स मेड होणार आहेस का? त्यावर करिनाने हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला असला तरीही तिच्या चेहऱ्यावरचं हसू सर्व काही सांगून जात होतं. वास्तविक करिना, मलायकाची बहीण अमृता, मलायका आणि करिष्मा कपूर या चौघीही एकमेकांच्या खूप जवळ आहेत. त्यामुळे या लग्नामध्ये करिनाचा खास सहभाग असणार याची सर्वांनाच माहिती आहे. शिवाय करण जोहरदेखील मलायकाच्या फ्रेंड्स सर्कलपैकी एक आहे. त्यामुळे त्यालाही या सर्व गोष्टींची कल्पना आहे.


वाचा : लग्नाच्या नवसांचे महत्त्व


आपल्या जवळच्या लोकांना वेळ ठेवण्यास सांगितलं


arjun malaika1


मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन आणि मलायकाने आपल्या जवळच्या लोकांना 19 एप्रिलदरम्यान वेळ ठेवण्यास सांगितलं आहे. सध्या यांच्या लग्नाची तयारी खूपच जोरात सुरू असल्याचं समजत आहे. मात्र अर्जुन आणि मलायका या दोघांनीही या सर्व गोष्टी अजूनही स्पष्ट केल्या नसून यावर न बोलणंच पसंत केलं आहे. पण मलायकाने आपण अर्जुनवर प्रेम करत असल्याचंही मान्य केलं आहे. आयुष्यात प्रत्येकाला दुसरी संधी मिळण्याची गरज असून प्रत्येकाला आनंदी राहण्याचा हक्क असल्याचं तिनं यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.


सराफा बाजार विषयी देखील वाचा


अर्जुन आणि मलायकामध्ये 12 वर्षांचं अंतर


arjun malaika


अर्जुन कपूर आणि मलायकाच्या वयामध्ये बरंच अंतर आहे. त्यामुळे पहिल्यांदा यांचं नातं कळलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. पण म्हणतात ना प्रेमात कोणतंही बंधन नसतं. त्याचप्रमाणे दोघांनीही आपलं नातं आता पुढे नेण्याचं ठरवलं आहे. मलायका आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाल्यानंतर आता दोन वर्षांनी मलायका लग्न करत आहे. मलायकाला अरहान नावाचा 18 वर्षांचा मुलगा आहे. मलायका आणि अर्जुनने गेल्यावर्षी आपलं नातं एकत्र फिरायला जाऊन दाखवून दिलं होतं. ते दोघंही कधी याबद्दल बोलले नाहीत. पण त्यांच्या वागण्यातून आणि व्हायरल झालेल्या फोटोमधून हे नेहमीच दिसून आलं आहे.


नवीनतम विवाहाच्या कपड्यांविषयी देखील वाचा


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा 


मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर करणार एप्रिलमध्ये लग्न


अर्जुन कपूरशी ख्रिश्नन लग्नाबद्दल मलायका अरोराचा खुलासा


दबंग 3 मध्ये पुन्हा करिनाच्या 'आयटम सॉंग' चा जलवा