अर्जुन कपूर मलायकाबरोबर करणार नाही लग्न कारण…

अर्जुन कपूर मलायकाबरोबर करणार नाही लग्न कारण…

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लग्न करणार अशा वावड्या खूप वेळा उठल्या आहेत. इतकंच नाही तर अगदी त्यांच्या लग्नाची तारीखही बऱ्याचदा निश्चित झाल्याचं मीडियाने सांगितलं आहे. आता पुन्हा एकदा मलायका आणि अर्जुन जूनमध्ये गोव्यात लग्न करणार असल्याची बातमी आली. त्यावर शेवटी आता अर्जुनने आपलं मौन सोडलं आहे. या सगळ्या बातम्या खोट्या असून असं काहीही नाही असं अर्जुनने सांगितलं आहे. सध्या आपला लग्न करण्याचा कोणताही मानस नसल्याचं ठामपणे अर्जुनने सांगितलं आहे. आपण आता 33 वर्षांचे असून अशी कोणतीही योजना आखलेली नाही. सध्या करिअरवर आपण लक्ष केंद्रित केल्याचंही अर्जुनने सांगितलं.


लग्नासाठी अजून लहान


Malika Arora on her wedding with arjun kapoor Cover 5097893


अर्जुनने आपल्या आणि मलायकाच्या लग्नाबद्दल पुढेही सांगितलं. लग्न हा आपला खासगी विषय असून आपण त्याबद्दल बोलायला कम्फर्टेबल नाही असंही त्याने सांगितलं आहे. जेव्हा लग्नाचा विचार करेन तेव्हा मी स्वतः सगळ्यांना याबद्दल सांगेन. ही गोष्ट लपवण्याची गोष्ट नक्कीच नाही असंही अर्जुन म्हणाला. अर्जुनने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, मीडिया ज्या बातम्या देते त्याबद्दल मी समजू शकतो. त्यांना त्यांच्या टीआरपी आणि इतर गोष्टींचा विचार करायचा असतो. पण त्याचा अर्थ असा नाही की, माझ्या खासगी आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मी सतत सांगायला हव्यात. चित्रपटाच्या गोष्टी सोडून मला खासगी गोष्टी शेअर करायला अजिबात आवडत नाहीत. जेव्हा कधी मी लग्न करणार असेन तेव्हा मी नक्कीच माझ्या चाहत्यांना सांगेन असं अर्जुनने म्हटलं आहे.


मलायका आहे ‘खास’ अर्जुनने केलं मान्य


malaika arora write strong note troller on instagram 9205039


अर्जुनने मलायका आपल्यासाठी खूप ‘खास’ आहे हे मान्य केलं. ही गोष्ट लपवण्याची काहीही गरज नाही असंही तो म्हणाला. लोकांना जे पाहायला आवडत आहे तेच ते बघत आहेत. आपल्या खासगी गोष्टी सांगणं मला आवडत नाही असंही अर्जुनने स्पष्ट केलं आहे. माझ्या आजूबाजूला सकारात्मक माणसं असावीत असं मला वाटतं आणि सध्या ती नक्कीच आहेत. आपण नशीबवान असल्याचंही अर्जुनने सांगितलं आहे. त्यामुळे आता खुद्द अर्जुनच्या तोंडून ऐकल्यानंतर तरी या बातम्या कुठेतरी थांबतील अशी शक्यता आहे. मलायकानेदेखील याआधी अर्जुनबरोबर लग्न करणार असल्याच्या बातम्यांना निराधार सांगितलं होतं. त्याशिवाय अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनीदेखील असं काहीही नसल्याचं स्पष्ट केलं आहे.


अर्जुन सध्या व्यग्र


arjun malaika


अर्जुन सध्या आशुतोष गोवारीकरच्या ‘पानिपत’ या ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तर लवकरच त्याचा ‘इंडियाज मोस्ट वाँटेड’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अर्जुनला सध्या एका हिट चित्रपटाची गरज आहे. याआधी आलेला त्याचा ‘नमस्ते इंग्लंड’ हा चित्रपट फ्लॉप झाला होता. अर्जुन सध्या आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत असून मलायकाबरोबर आपलं असलेलं नातं त्याने मान्य केलं आहे. पण सध्या मात्र इतक्यात आपण लग्नाला तयार नाही असं त्यानं सांगितलं आहे. त्यामुळे आता रोज चर्चेत असणारी ही जोडी नक्की कधी बोहल्यावर चढणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नक्कीच पडला असून त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. लवकरच याचाही उलगडा होईल अशी त्यांना आशा आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा  


अर्जुन कपूरशी ख्रिश्नन लग्नाबद्दल मलायका अरोराचा खुलासा


Wedding Bells: ‘लग्नघटिका आली समीप’, मलायका - अर्जुन चढणार बोहल्यावर


मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर करणार एप्रिलमध्ये लग्न