मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर करणार एप्रिलमध्ये लग्न

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर करणार एप्रिलमध्ये लग्न

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या विविध ठिकाणी एकत्र दिसत आहेत. मलायकाचा 2017 मध्ये अरबाज खानबरोबर घटस्फोट झाल्यानंतर या घटस्फोटाचं कारण अर्जुन कपूर असल्याच्या चर्चांनाही ऊत आला होता. याची सत्यता त्यांनाच माहीत. पण आता हे मलायका आणि अर्जुनने आपण एकमेकांवर प्रेम करत असल्याचं मान्य केलं आहे. नुकतचं ‘कॉफी विथ करण’ च्या सहाव्या सीझनमध्ये बऱ्याच सेलिब्रिटीजने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर खुद्द मलायकानेही आपल्याला अर्जुन आवडत असल्याचं मान्य केलं आहे. वास्तविक या दोघांच्या वयांमध्ये बराच फरक आहे. मलायका ही अर्जुनपेक्षा साधारण 12 वर्षांनी मोठी असून तिला 18 वर्षांचा मुलगाही आहे. पण तरीही हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असून या एप्रिलमध्ये दोघंही लग्नगाठ बांधतील असं म्हटलं जात आहे.


गेल्या वर्षभरात बऱ्याच घडामोडी


arjun with malaika son


अर्जुनने याआधी आपल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, गेल्या वर्षभरात त्याच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. आधी तो लग्न आणि या सगळ्या गोष्टींसाठी तयार नव्हता. पण आता त्याला स्टेबल आयुष्य जगायला नक्कीच आवडेल असंही त्याने स्पष्ट केलं आहे. अजूनही मलायका आणि अर्जुन यांनी आपल्या नात्याबद्दल कोणतंही अधिकृत स्टेटमेंट दिलं नसलं तरीही हे लव्हबर्ड्स बऱ्याच ठिकाणी एकत्र जेवायला जाताना अथवा डेटिंगला जाताना दिसतात. इतकंच नाही तर अर्जुनच्या कुटुंबाबरोबरही मलायका बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसते. अर्जुनसाठी त्याची बहीण अंशुला ही सर्वप्रथम महत्त्वाची आहे. मलायका आणि अंशुलाचे संबंधही चांगले असल्याचं म्हटलं जात आहे.


at fashion week


अर्जुनने स्वतः याबद्दल काहीही स्पष्ट केलं नसलं तरीही यावर्षी नक्कीच हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. मागच्याच वर्षी सोनम कपूरच्या लग्नातही मलायका आणि अर्जुन एकत्र दिसले होते. इतकंच नाही तर गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी पापाराझी अर्थात फोटोग्राफर्स या दोघांना बऱ्याच ठिकाणी एकत्र पाहत असून क्लिक करत आहेत आणि कोणताही आडपडदा न ठेवता अर्जुन आणि मलायकादेखील एकत्र पोझ देऊन फोटो काढून घेत आहेत. याशिवाय मागच्याच आठवड्यात मलायकाचा मुलगादेखील अर्जुनबरोबर एका लंचडेटला एकत्र दिसला होता. त्यामुळे आता दोन्ही कुटुंबांकडून सर्व काही व्यवस्थित असल्याचाही अंदाज बांधला जात आहे.


malaika-arjun
मलायका आणि अर्जुन लवकरच दिसणार एकत्र


मलायकाने घटस्फोट झाल्यानंतरही बराच काळ खान हे आडनाव काढलं नव्हतं. पण काही महिन्यांपूर्वीच तिने हे आडनाव काढून मलायका अरोरा हे आपलं नाव ठेवलं आहे. गेल्या वर्षापासून बॉलीवूडमधील बऱ्याच नावाजलेल्या व्यक्तींनी लग्न केलं आहे. आता पुढच्या महिन्यात अजून एक कपल अर्थात मलायका आणि अर्जुनचं नाव यामध्ये जोडलं जाणार का हे पाहावं लागेल. बऱ्याचदा अर्जुन मलायकाची अतिशय काळजी घेताना दिसतो. त्यामुळे आता पुन्हा एकदा मलायकाच्या आयुष्यात प्रेम फुलत असल्याचं दिसत आहे. शिवाय करीना कपूर या लग्नातमध्ये मलायकाची ब्राईडमेड असणार असंही कॉफी विथ करणमध्ये विचारण्यात आल्यावर या प्रश्नाचं उत्तर देण्यास करीनाने टाळलं होतं. लवकरच ही जोडी एकत्र झालेली प्रेक्षकांना आणि चाहत्यांना पाहायला मिळेल असं म्हणावं लागेल.


arjun malaika


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


कंगनाच्या रडारवर रणबीर कपूर,राजकारणावरुन दिला टोमणा


महाशिवरात्र - महाराष्ट्रातील कोणती आहेत खास प्राचीन शिवाची मंदिरे


सलमान खानसाठी नवज्योत सिंह सिद्धू परतणार कपिल शर्मा शोमध्ये?