अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा ही जोडी आता खुलेआम प्रेमाचं प्रदर्शन करताना दिसते. दोघं एकत्र राहतात, फिरतात आणि मुलाखतीत एकमेकांसोबत असलेलं नातंही मोकळेपणाने स्वीकारतात. एवढं असूनही अजुनही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतेलेला नाही. लग्न केलं नसलं तरी मलायका अर्जूनच्या जीवनात खास आहे हे आता सर्वांना समजून चुकलं आहे. मात्र असं असताना अर्जुनने मात्र एका वेगळ्याच व्यक्तीच्या नावाचा टॅटू हातावर गोंदवला आहे. अर्जूनने त्याच्या हातावर ह्रदय आणि त्याच्या जवळ ए आद्याक्षर गोंदवले आहे. हा टॅटू पाहुन चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे कारण अर्जुनच्या आयुष्याच त्याच्या ह्रदयाच्या जवळ असणारी अ आद्याक्षर असलेली ही कोण व्यक्ती आहे.
अर्जुनने शेअर केला व्हिडिओ
अर्जुनने नुकताच त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.ज्यात त्याने त्याच्या आयुष्यातील खास महिलेचे नाव जी त्याच्या ह्रदयाच्या जवळ आहे तिचे ए असं आद्याक्षर गोंदवले आहे. वास्तविक अर्जुनने स्वतःच्या नावाचा हा टॅटू काढला आहे असं तुम्हाला वाटू शकतं. मात्र तसं नसुन हा टॅटू त्याने त्याची लाडकी बहीण अंशुलाच्या नावाचा काढला आहे. अर्जुनच्या मते त्याच्या आईच्या निधनानंततर जर तो जास्त कोणाच्या जवळ असेल तर ती व्यक्ती आहे त्याची बहीण अंशुला कपूर, कारण अंशुलाला अर्जुनने फक्त भावाप्रमाणे नाही तर वडिलांप्रमाणे सांभाळलं आहे. अर्जुनचं अंशुलावर सर्वात जास्त प्रेम आहे आणि प्रेम व्यक्त करण्यासाठीच त्याने तिच्या नावाने सुरु होणारा टॅटू आणि ह्रदयाचे चिन्ह हातावर गोंदवले आहे. हा व्हिडि शेअर करताना अर्जुनने चाहत्यांना या नावाचा अंदाज घेण्यास सांगितलं होतं. पण चाहत्यांनी अर्जुनचे नाव शेअर केलं त्यावर उत्तर देताना मग अर्जुनने कंमेट केलं की, ही व्यक्ती माझ्या जीवनातील हुकमाचा इक्का अंशुला आहे, मला आयुष्यभर तिच्या आद्याक्षराशी स्वतःला जोडून ठेवायचं आहे.
अंशुलाने असं व्यक्त केलं भावाबद्दल प्रेम
बहिणीवरील प्रेम व्यक्त करण्याचा अर्जुनचा अंदाज चाहत्यांना खुपच भावला आणि अर्जुनचा हा व्हिडिओ काही तासात व्हायरल झाला. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटीजनी अर्जुनच्या व्हिडिओवर लाईक आणि कंमेट देण्यास सुरुवात केली. अभिनेता आयुषमान खुराना, टायगर श्रॉफ ने इमोजी द्वारा त्यांच्या भावना व्यक्त केल्या अर्जुनची बहीण अंशुलानेही भावाने सर्वांसमोर व्यक्त केलेलं प्रेम आनंदाने स्वीकारत त्याला ‘लव्ह यू’ अशी प्रेमळ कंमेट दिली. काही दिवसांपुर्वी अंशुलाची तब्येत बिघडली होती. ज्यामुळे तिला अचानक हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करावं लागलं होतं. मात्र बरं वाटू लागल्यामुळे तिला लगेच हॉस्पिटलमधून घरी पाठवलं होतं. मात्र अचानक अशी तब्येत बिघडण्यामुळे घरातील सर्व खूप काळजीत होते. अर्जुन तर अंशुलासाठी खूपच चिंतेत होता आणि तो स्वतः तिला घरी नेण्यासाठी आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंशुलाला ब्लड प्रेशर आणि शुगर लेवलमुळे त्रास झाला होता. आता अंशुलाची तब्येत ठीक आहे पण अर्जुनला आता अंशुलाची जास्त काळजी घ्यायची आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
तापसी पन्नूच्या मते या तीन अभिनेत्री आहेत बॉलीवूडच्या खऱ्या स्टार्स
अखेर प्रतीक्षा संपली, ‘समांतर’ चा तुफान टीझर प्रदर्शित
कंगना राणावतचे संपूर्ण कुटुंब झालंय योगामय, शेअर केले अनुभव