अर्जुन कपूरनंच गर्लफ्रेंड मलायका अरोराला केलं ट्रोल, म्हणाला...

अर्जुन कपूरनंच गर्लफ्रेंड मलायका अरोराला केलं ट्रोल, म्हणाला...

बॉलिवूडमधील चर्चेत असणारे कपल म्हणजे अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora). अर्जुन-मलायकानं आपल्या नात्याची जाहिररित्या कबुली दिल्यापासून दोघंही सोशल मीडियावरील एकमेकांच्या फोटोवर काही-न्-काही कमेंट करत असतात. नुकतंच अर्जुन कपूरनं मलायकाच्या इन्स्टाग्रामवरील फोटोवर व्यक्त केलेली प्रतिक्रिया पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. फोटोवर केलेल्या कमेंटच्या माध्यमातून अर्जुन मस्करी-मस्करीमध्येच मलायकाला ट्रोल केलं आहे. मलायकानंही अर्जुनच्या कमेंटला कुल स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. 

(वाचा : ‘बह्मास्त्र’च्या सेटवरील आलिया-रणबीरचा ‘हा’ फोटो व्हायरल)

मलायका अरोरानं नुकतंच 'Irish band U2च्या जोशुआ ट्री टूर कॉन्सर्ट'ला हजेरी लावली. डी.वाय. पाटील स्टेडिअमवर रविवारी संध्याकाळी या शोचं आयोजन करण्यात आलं होतं.  या शोमध्ये ऋतिक रोशन, अनुराग कश्यप, मीरा राजपूत, इलियाना डीक्रूझ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली यांसह अनेक दिग्गज सहभागी झाले होते.   

मलायकानं चाहत्यांसाठी शेअर केला फोटो

मलायका अरोरा या शोसाठी अतिशय उत्सुक होती.  बहीण अमृतासह तिनं शोमधील बँडच्या कलाकारांची भेट देखील घेतली. तर दुसरीकडे आपल्या चाहत्यांसाठी तिनं सिंगर बोनोचे काही फोटे इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. ‘Thank u for the music ......... @u2 .. doesn’t get better n closer than this ♥️♥️🙏🙏’ (मला याहून अधिक जवळून आणि चांगला फोटो मिळू शकला नाही). पण मलायकानं सिंगर बोनोची खासगीमध्ये भेट घेतल्याची माहिती अर्जुन कपूरला होती. मग अर्जुननं यावरूनच मलायकाला ट्रोल करत विचारलं, 'तुम्ही त्यांच्यासोबत स्टेजवर होतात का?' आता बॉयफ्रेंडनंच ट्रोल केल्यावर आपण काय म्हणणार, अशीच काहीशी अवस्था मलायकाची  झाल्याचं पाहायला मिळालं. अर्जुनच्या कमेंटवर तिनं केवळ हसतानाचे इमोजीचा शेअर केले.  

(वाचा : रणवीर सिंह मोठ्या पडद्यावर दिसणार या 'सुपरहिरो'च्या भूमिकेत)

चर्चा तर होणारच! अर्जुनसंदर्भात सर्वांसमोर मलायकानं केलं मोठं विधान

दरम्यान, मलायका अरोरा आपल्या हॉट स्टाइल स्टेटमेंट आणि फिटनेसव्यतिरिक्त अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपवरूनही नेहमीच चर्चेत किंवा ट्रोल होत असते. बॉलिवूडमधलं हे एक असं कपल आहे, ज्यांच्या कोणत्या-ना-कोणत्या कारणावरून बातम्या झळकत असतातच. नुकतंच मलायकानं ‘फिल्मफेअर ग्लॅमर आणि स्टाइल अवॉर्ड’ सोहळ्यात असं काही विधान केलं ज्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली. बॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावलेल्या या सोहळ्यात ‘Diva Of The Year’ पुरस्कारानं मलायकाचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी मलायकानं शिमरी ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणे अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसत होती. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मलायका आभार व्यक्त करण्यासाठी भाषण करत असताना सोफी चौधरीनं तिला मस्करीत म्हटलं की, ‘मलायकाच्या स्पर्शामुळे कोणीही कधीही दिवा होऊ शकतो आणि याचदरम्यान स्टेजवरील स्क्रीनवर अभिनेता अर्जुन कपूरचे फोटो झळकले. ‘छय्या-छय्या’ स्टार मलायकानं सोफीला तातडीनं उत्तर देत म्हटलं, ‘हे तर माझे सर्वात मोठे दिवा आहेत.’ जाहिररित्या मलायकानं केलेल्या या विधानामुळे पुन्हा त्यांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

(वाचा : शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ सिनेमानं नोंदवला ‘हा’ नवा रेकॉर्ड)

हे देखील वाचा 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.