Good News: अर्जुन रामपाल पुन्हा होणार बाबा

Good News: अर्जुन रामपाल पुन्हा होणार बाबा

 


बॉलीवूडमध्ये सध्या गुड न्यूजचे वारे वाहत आहेत. अभिनेता अर्जुन रामपालचं नावदेखील यामध्ये समाविष्ट झालं आहे. नुकतंच अर्जुनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर आपली गर्लफ्रेंड गॅब्रियेला (Gabriella Demetriade) बरोबर एक फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. या फोटोमध्ये गॅब्रियेला गरोदर असल्याचं स्पष्ट दिसत आहे. अर्जुनला याआधी मॉडेल मेहेर जेसियापासून माहिका आणि मायरा अशा दोन मुली आहेत. अर्जुन आता तिसऱ्यांदा बाबा होणार आहे. अर्जुनने आपला हा आनंद फोटो शेअर करत त्याखाली बाळासाठी विशिष्ट कॅप्शन लिहून व्यक्त केला आहे.


नव्या सुरुवातीमुळे आनंदी
 

 

 


View this post on Instagram


 

 

Blessed to have you and start all over again....thank you baby for this baby 👶🏽


A post shared by Arjun (@rampal72) on
अर्जुनचा मेहेरबरोबर घटस्फोट झाल्यानंतर लगेचच त्याने आपली गर्लफ्रेंड गॅब्रियेला हिच्याबरोबर राहण्यास सुरुवात केली. अर्जुन आणि गॅब्रियेला बऱ्याच ठिकाणी याआधी एकत्र दिसले आहेत. गॅब्रियेला एक मॉडेल असून आता तिनेही आपल्या इन्स्टावरून आपण आई होणार असल्याचं सांगितलं आहे. अर्जुनने हा आनंद व्यक्त करताना ‘तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मी पुन्हा नव्याने जगायला शिकलो. या बाळासाठी तुझे धन्यवाद’ असं म्हटलं आहे. अर्जुन आणि ग्रॅब्रियेला खूपच खुश असल्याचं या फोटोवरून दिसून येत आहे. शेअर केलेला फोटो पाहून याचं खास मॅटर्निटी शूट करण्यात आल्यासारखं वाटत आहे. मात्र अर्जुन आणि ग्रॅब्रियेला हे सध्या लिव्ह इन मध्ये असून त्यांचं लग्न झालेलं नाही.


gabriella with arjun


ग्रॅब्रियेला प्रसिद्ध मॉडेल


ग्रॅब्रियेला ही दक्षिण आफ्रिकेची असून ती एक प्रसिद्ध मॉडल आहे. एफएमएचच्या 100 सेक्सी महिलांमध्ये तिची निवड करण्यात आली होती. तिने 2009 मध्ये मिस इंडियन प्रिमीयर लीगमध्ये भाग घेतला होता. शिवाय तिला मिस IPL बॉलीवूड हा पुरस्कारही मिळालेला आहे. तिने याआधी काही चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं आहे. पण तिला बॉलीवूड आणि प्रेक्षकांंमध्ये खरी ओळख मिळवून दिली ती अर्जुन रामपालबरोबर एकत्र दिसायला लागल्यानंतरच. दोघंही सध्या लिव्ह इनमध्ये राहात आहेत.


अर्जुन आणि सुझानच्या अफेरच्या वावड्या


ग्रॅब्रियेला आणि अर्जुन बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसले असून त्यांचे अनेक फोटोही आतापर्यंत व्हायरल झाले आहेत. अर्जुनचं याआधी मॉडल मेहेर जेसियाबरोबर लग्न झालं होतं. पण वीस वर्ष संसारानंतर काही कारणांमुळे दोघांनी घटस्फोट घेतला. त्यावेळी याचं कारण सुझान खान होती असं म्हटलं जात होतं. पण अर्जुन आणि मेहेर दोघांनीही घटस्फोटाचं कारण स्पष्ट केलं नाही. त्यानंतर काही कालावधीच ग्रॅब्रियेला आणि अर्जुन एकत्र दिसायला लागले. मेहेर आणि अर्जुनच्या घटस्फोटाला अजून एक वर्षही झालेलं नाही. तर आता ही अर्जुन पुन्हा एकदा बाबा होणार असल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीनंतर अर्जुनला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे तर काहींनी त्याला ट्रोल केलं आहे. मात्र बॉलीवूडमधील मंडळींनी अर्जुनला त्याच्या या गोड बातमीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान अर्जुन आपल्या दोन्ही मुलींचीही काळजी घेताना दिसून येतो. अर्जुन आपल्या मुलींबरोबर फोटो शेअर करत असतो. कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर नुकतीच गेल्या महिन्यात अर्जुन रामपालची ‘द फायनल कॉल’ ही वेबसिरीज येऊन गेली आहे.


arjun with his daughter


फोटो सौजन्य - Instagram


तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:


Good News: ‘हेट स्टोरी’ फेम सुरवीन चावलाच्या घरी आली ‘ईवा’


Good News: बॉलीवूड अभिनेत्री आहे गरोदर, फोटो केला शेअर


Good News: बच्चन कुटुंबात पुन्हा नवी खुषखबर, ऐश्वर्या पुन्हा प्रेगनंन्ट


Major Symptoms Of Pregnancy In Marathi