Good News: ग्रॅबिएलाने दिला गोंडस मुलाला जन्म, अर्जुन पुन्हा झाला बाबा

Good News: ग्रॅबिएलाने दिला गोंडस मुलाला जन्म, अर्जुन पुन्हा झाला बाबा

काही महिन्यांपूर्वीच अर्जुन रामपालने आपली गर्लफ्रेंड गॅब्रिएला गरोदर असल्याचं सोशल मीडियावर फोटो शेअर करत पोस्ट केलं होतं. एप्रिलमध्ये हे फोटो पोस्ट केल्यानंतर अर्जुनवर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. दरम्यान ग्रॅबिएलाने एका गोंडस मुलाला जन्म दिला असल्याचं समोर आलं आहे. जे. पी. दत्ता यांची मुलगी निधी दत्ताने ट्विट करत या गोष्टीला पुष्टी दिली आहे. तिने ट्विट करून त्याचं अभिनंदन केलं आहे. मात्र अजूनही अर्जुन अथवा गॅब्रिएलाकडून कोणतीही ऑफिशियल पोस्ट करण्यात आलेली नाही. पण असं असलं तरीही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याआधी 1998 मध्ये सुप्रसिद्ध मॉडेल मेहेर जेसियाशी अर्जुन रामपालने लग्न केलं. पण 2018 मध्ये मेहेर आणि अर्जुनने वेगळं होण्याचा अचानक निर्णय घेतला. मायरा आणि माहिका नावाच्या दोन मुलीही आहेत. इतकंच नाही तर त्याच्या दोन्ही मुलींनी गॅब्रिएलाला स्वीकारलं आहे. दोन दिवसापूर्वीच मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये गॅब्रिएलाला अॅडमिट करण्यात आलं होतं. यावेळी अर्जुन रामपाल बरोबर त्याच्या दोन्ही मुली आणि ग्रॅबिएलाचे पालकही होते. 

घटस्फोटानंतर लगेच गॅब्रिएलाबरोबर राहण्यास सुरुवात

Instagram

अर्जुनचा मेहेरबरोबर घटस्फोट झाल्यानंतर लगेचच त्याने आपली गर्लफ्रेंड गॅब्रियेला हिच्याबरोबर राहण्यास सुरुवात केली. गॅब्रियेला एक मॉडेल असून आता तिनेही आपल्या इन्स्टावरून आपण आई होणार असल्याचं सांगितलं होतं. अर्जुनने हा आनंद व्यक्त करताना ‘तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मी पुन्हा नव्याने जगायला शिकलो. या बाळासाठी तुझे धन्यवाद’ असं म्हटलं आहे. मात्र अर्जुन आणि ग्रॅब्रियेला हे सध्या लिव्ह इन मध्ये असून त्यांचं लग्न झालेलं नाही. अर्जुन आणि गॅब्रिएला हा फोटो शेअर केल्यानंतर नेहमीच बाहेर डिनर अथवा लंचसाठी दिसून आले.

ग्रॅब्रिएला प्रसिद्ध मॉडेल

ग्रॅब्रिएला ही दक्षिण आफ्रिकेची असून ती एक प्रसिद्ध मॉडल आहे. एफएमएचच्या 100 सेक्सी महिलांमध्ये तिची निवड करण्यात आली होती. तिने 2009 मध्ये मिस इंडियन प्रिमीयर लीगमध्ये भाग घेतला होता. शिवाय तिला मिस IPL बॉलीवूड हा पुरस्कारही मिळालेला आहे. तिने याआधी काही चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं आहे. पण तिला बॉलीवूड आणि प्रेक्षकांंमध्ये खरी ओळख मिळवून दिली ती अर्जुन रामपालबरोबर एकत्र दिसायला लागल्यानंतरच. दोघंही सध्या लिव्ह इनमध्ये राहात आहेत.

अर्जुन आणि सुझानच्या अफेरच्या वावड्या

ग्रॅब्रिएला आणि अर्जुन बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसले असून त्यांचे अनेक फोटोही आतापर्यंत व्हायरल झाले आहेत. अर्जुनचं याआधी मॉडल मेहेर जेसियाबरोबर लग्न झालं होतं. पण वीस वर्ष संसारानंतर काही कारणांमुळे दोघांनी घटस्फोट घेतला. त्यावेळी याचं कारण सुझान खान होती असं म्हटलं जात होतं. पण अर्जुन आणि मेहेर दोघांनीही घटस्फोटाचं कारण स्पष्ट केलं नाही. त्यानंतर काही कालावधीच ग्रॅब्रिएला आणि अर्जुन एकत्र दिसायला लागले. मेहेर आणि अर्जुनच्या घटस्फोटाला अजून एक वर्ष झालं आहे. दरम्यान अर्जुन आपल्या दोन्ही मुलींचीही काळजी घेताना दिसून येतो. अर्जुन आपल्या मुलींबरोबर फोटो शेअर करत असतो. कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर नुकतीच गेल्या महिन्यात अर्जुन रामपालची ‘द फायनल कॉल’ ही वेबसिरीज येऊन गेली आहे.