सलमान खानच्या वाढदिवशी अर्पिता देणार त्याला हे गिफ्ट

सलमान खानच्या वाढदिवशी अर्पिता देणार त्याला हे गिफ्ट

सलमान खान आणि त्याचं त्याच्या भावंडांवर असलेलं प्रेम जगजाहीर आहे. सलमानचं त्याची छोटी बहीण अर्पिता खानवर विशेष प्रेम आहे. अर्पिता सलमानची सख्खी बहीण नाही. तरीही तो तिला त्याच्या सख्खा बहिणीप्रमाणे जीव लावतो. 2014 मध्ये सलमानने आयुष आणि अर्पिता यांचं धुमधडाक्यात लग्न लावलं होतं. ज्या लग्नाची चर्चा अख्या बी टाऊनमध्ये झाली होती. लग्नानंतर या दोघांना अहील नावाचा गोंडस मुलगाही झाला. अर्पिता आणि आयुषकडे आता दुसऱ्यांदा गोड बातमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्पिता आणि आयुष सलमानच्या वाढदिवशी त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहेत. सलमानचा 27 डिसेंबरला वाढदिवस आहे. या दिवशी तो पुन्हा एकदा मामा होणार आहे. सलमानकडे आयुष्यात सारं काही आहेच त्याला आता आणखी काय देणार.... म्हणूनच हे मौल्यवान गिफ्ट अर्पिता आपल्या लाडक्या भावाला देणार आहे.

अर्पिता आणि आयुषने का घेतला हा निर्णय

सलमानला लहान मुलं फारच आवडतात. सलमानचं त्याच्या भाच्यांवर आणि पुतण्यांवर खूप प्रेम आहे. अर्पिता आणि आयुषचा पहिला मुलगा अहिलसोबत तो नेहमीच खेळताना दिसतो.  सलमानचे अहिलसोबत असलेले फोटोज आणि व्हिडिओज सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यावरून सलमानचं त्याच्या भावंडांच्या मुलांवर किती प्रेम आहे सतत दिसून येतं. तो त्यांच्यासोबत खेळतो, दंगामस्ती करतो, त्यांचे वाढदिवस संपूर्ण परिवारासोबत साजरे करतो. सलमानच्या भावंडांचेही त्याच्यावर तितकेच प्रेम आहे. म्हणूनच अर्पिता आणि आयुषने हा निर्णय घेतला आहे. सलमान खानच्या वाढदिवशी सी-सेक्शन डिलिव्हरीने अर्पिता तिच्या  दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. अर्पिता आणि आयुषच्या होणाऱ्या बाळाविषयी जाणून घेण्यास चाहते देखील तितकेच उत्सुक आहेत. 

सलमानच्या आयुष्यात ही मंडळी आहेत महत्त्वाची

अर्पिता आणि आयुष शर्मा यांनी 2014 मध्ये हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेसमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी अहिलला जन्म दिला. तर आता अहिल तीन वर्षांचा असून तो मोठा भाऊ होणार आहे. आयुषने गेल्याचवर्षी बॉलीवूडमध्येही आपलं नशीब आजमावायला सुरुवात केली आहे. त्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जास्त चालला नसला तरीही त्याच्या अभिनयाची मात्र चर्चा झाली. अर्पिता आपला नवरा आयुषला खूपच पाठिंबा देते. अर्पिता, आयुष  आणि अहिल यांचं सलमानच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. ज्यामुळे सलमानच्या आयुष्यातील हा आनंद या वाढदिवशी द्विगुणित होण्याची शक्यता आहे. आयुष आणि अर्पिता हे दोघंही सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असून वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. इतकंच नाही तर आपल्या व्हेकेशनचे फोटो तसंच घरातील वेगवेगळ्या पार्टीजचे फोटोही हे दोघं पोस्ट करत असतात. आयुष नेहमीच अर्पिताला जपताना दिसतो. तर आयुष सध्या त्याच्या दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. त्यामुळे तोदेखील सोशल मीडियावरून नेहमी अर्पिता आणि अहिलची आठवण येत असल्याच्या पोस्ट शेअर करत असतो. आता लवकरच त्यांच्या घरात आणखी एक छोटा पाहुणा दाखल होईल. सलमान खानच्या वाढदिवशीच ही गोड बातमी मिळणार असल्यामुळे  खान परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

फोटोसौजन्य - इन्साग्राम

हे ही वाचा  -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

सलमान खानची धमकी, लवकरच सोडणार ‘बिग बॉस’

प्रियांका चोप्रा जगभरात गुगल सर्चवर सर्वात पुढे

‘Good Newwz’च्या टायटलमध्ये का वापरलं चुकीचं स्पेलिंग, करण जोहर म्हणाला…