भाईजानला अर्पिताकडून मिळालं बेस्ट बर्थडे गिफ्ट

भाईजानला अर्पिताकडून मिळालं बेस्ट बर्थडे गिफ्ट

बॉलीवूड भाईजान सलमान खानचा 54 वा वाढदिवस आहे, म्हटल्यावर त्याचे कुटुंबिय आणि फॅन्स तर उत्सुक आहेतच. पण भाईजान सलमानला सर्वात बेस्ट गिफ्ट मिळालं आहे बहीण अर्पिताकडून. कारण आजच अर्पिताने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे भाईजानला या वर्षी वाढदिवसाला डबल सेलिब्रेशन करता येणार आहे. आजच्या वाढदिवशी भाईजानच्या घरी आली आहे गोड परी. 

अर्पिताचं सलमानला खास गिफ्ट

सलमानची लाडकी बहीण अर्पिता खानने 27 डिसेंबरला तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. तिने खास आजच्या दिवशी सी-सेक्शन सर्जरीमार्फत आपल्या मुलीला जन्म दिला. सूत्रानुसार, अर्पिताला 27 डिसेंबरलाच आपल्या बाळाचा जन्म व्हावा, असं वाटतं होतं. कारण त्यामुळे होणाऱ्या बाळाचा आणि त्याच्या मामाचा वाढदिवस एकाच दिवशी असेल. खरोखरच अर्पिताचं आपल्या भाईजानवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. म्हणूनच तिने हे खास गिफ्ट आपल्या भाईजानला देऊ केलं आहे. सूत्रानुसार, यंदा भाईजानच्या बर्थडेची पार्टी याच कारणामुळे त्यांच्या फार्महाऊसवर नसून भाऊ सोहेलच्या घरी ठेवण्यात आली होती.  

अर्पिता आणि आयुषने का घेतला हा निर्णय

सलमानला लहान मुलं फारच आवडतात. सलमानचं त्याच्या भाच्यांवर आणि पुतण्यांवर खूप प्रेम आहे. अर्पिता आणि आयुषचा पहिला मुलगा अहिलसोबत तो नेहमीच खेळताना दिसतो. सलमानचे अहिलसोबत असलेले फोटोज आणि व्हिडिओज सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यावरून सलमानचं त्याच्या भावंडांच्या मुलांवर किती प्रेम आहे सतत दिसून येतं. तो त्यांच्यासोबत खेळतो, दंगामस्ती करतो, त्यांचे वाढदिवस संपूर्ण परिवारासोबत साजरे करतो. सलमानच्या भावंडांचेही त्याच्यावर तितकेच प्रेम आहे. म्हणूनच अर्पिता आणि आयुषने हा निर्णय घेतला. अर्पिता आणि आयुषच्या होणाऱ्या बाळाविषयी जाणून घेण्यास चाहते देखील तितकेच उत्सुक आहेत.

भाईजानच्या बर्थडेचं खास सेलिब्रेशन

सलमानच्या बर्थडेचं सेलिब्रेशन अगदी मध्यरात्रीपासून सुरू झालं. भाईजानच्या बर्थडे पार्टीला अनेक बॉलीवूड स्टार्सनी हजेरी लावली.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.