अर्पिता खानने जॉर्जियाला का दिला ओढणी सावरण्याचा सल्ला

अर्पिता खानने जॉर्जियाला का दिला ओढणी सावरण्याचा सल्ला

सलमानची बहीण अर्पिता खान शर्मा आणि अरबाजची गर्लफ्रेन्ड जार्जिया अॅंड्रियानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरवर्षी प्रमाणे बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीला सलमान खानचं कुटुंब एकत्र आलं होतं. या पार्टीत सलीम खान, सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान, अर्पिता खान शर्मा असे सगळे पोहचले होते. या पार्टीत सलमान कतरिनासोबत आणि अरबाज त्याची गर्लफ्रेन्ड जॉर्जिया सोबत गेला होता. या पार्टीमध्ये बॉलीवूडचे अनेक सेलिब्रेटी देखील सहभागी झाले होते. मात्र या पार्टीत असं काही घडलं ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं.


arpita-khan-sharma-giorgia-andriani-and-arbaaz-khan 1


अर्पिता आणि जॉर्जियाला का दिला असा सल्ला...


ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी खान परिवार इफ्तार पार्टीत एकत्र जमलं होते. मात्र या पार्टीत घडलं असं की, जॉर्जियाने अरबाजसोबत पार्टीत एन्ट्री केल्याबरोबर अर्पिता खान शर्माच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. अरबाज खानने या पार्टीत नेव्ही ब्लू कलरचा पठाणी ड्रेस परिधान केला होता तर जॉर्जियाने Beige रंगाचा बोल्ड लेंहगा घातला होता. मात्र जॉर्जियाच्या लेंहग्यावरचा टॉप डीप नेक लाईनचा होता. सहाजिकच इफ्तार पार्टीसाठी हा लुक फारच बोल्ड वाटत होता. अर्पिताने जॉर्जियाला पाहताच तिच्या ही गोष्ट लक्षात आली. म्हणून अर्पिताने जॉर्जियाला जवळ बोलावून घेतलं आणि ती तिच्या कानात काहीतरी कुजबूजली. अर्पिताने जॉर्जियाच्या कानात तिची ओढणी सावरण्याचा सल्ला दिला असावा. कारण जॉर्जिया उठल्याबरोबर लगेच स्वतःची ओढणी सावरताना दिसली. मात्र ओढणी व्यवस्थित नीट न झाल्याने अर्पिताने स्वतः जॉर्जियाची ओढणी नीट केली. त्यानंतर अरबाझने जॉर्जियाला कव्हर केलं आणि जॉर्जियाने लगेच तिची ओढणी पिन अप केली.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Watch Video: Arbaaz Khan with gf Georgia at Baba Siddiqui's Iftaar party. . . #arbaazkhan #babasiddique


A post shared by Instant Bollywood (@instantbollywood) on
अरबाज खान आणि जॉर्जिया एकमेकांच्या प्रेमात


सहाजिकच अर्पिताने तिच्या होणाऱ्या वहिनीला ओढणी नीट करण्यासाठी सांगितल्यामुळे या दोघींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मागच्या वर्षी अरबाजच्या 51 व्या वाढदिवसाला जॉर्जियासोबत त्याचं नातं जगजाहिर केलं होतं. एक्स वाईफ मलायका अरोराशी नातं तोडल्यानंतर अरबाजचं जॉर्जियासोबत सूत जुळलं होतं. अरबाज आणि जॉर्जिया सतत एकमेकांसोबत दिसत असतात. आता हळूहळू खान कुटुंबाने देखील अरबाज आणि जॉर्जियाच्या नात्याला मान्यता दिली आहे. लवकरच  अरबाज आणि जॉर्जिया यांच्या लग्नाची बातमी देखील जाहिर केली जाण्याची शक्यता आहे.


arpita-khan-sharma-with-brother-arbaaz-khan 2


अर्पिता खान आहे भावंडाची लाडकी


अर्पिता खान तिच्या भावांची लाडकी बहीण आहे. अर्पिता खानने 2014 साली उद्योगपती आयुष शर्माशी लग्न केलं. अर्पिता आणि आयुषला 'आहिल' नावाचा गोंडस मुलगा आहे. आहिल आणि अर्पितावर सलमान, अरबाज  आणि सोहेल खानचं विशेष प्रेम आहे. रक्ताचं नातं नसूनही अर्पिता त्यांची लाडकी बहीण आहे. अर्पिता देखील तिच्या कुटुंबावर आणि भावंडावर खूप प्रेम करते. आपल्या कुटुंबाच्या मानसन्मानाची ती नेहमी काळजी घेत असते. या काळजीपोटीच कदाचित अर्पिताने तिच्या होणाऱ्या वहिनीला पार्टीत ओढणी सावरण्याचा सल्ला दिला असावा.


Good News: बबिता फोगट करणार लवकरच लग्न, याचवर्षी वाजणार सनई - चौघडे


अजय-काजोलची 'निसा' होतेय या कारणामुळे सतत ट्रोल


निकशी प्रसिद्धीसाठी लग्न केल्याच्या आरोपावर प्रियांकाचं सडेतोड उत्तर


 फोटोसौजन्य - इन्साग्राम