या एका सवयीमुळे रामाच्या भूमिकेसाठी अरुण गोविल झाले रिजेक्ट

या एका सवयीमुळे रामाच्या भूमिकेसाठी अरुण गोविल झाले रिजेक्ट

पूर्वी रविवारी सगळ्यांना सकाळी घरी बसायला लावणारी मालिका म्हणजे ‘रामायण’  या पौराणिक मालिकेने सगळ्यांना अक्षरश: वेड लावले होते. रामायण मालिका रुपात मांडणारी ही मालिका त्या काळात परदेशातही हिट झाली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच घरी आहे. घरी राहून अनेकांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ लागला आहे. लोकांना घरीच राहून पुन्हा एकदा रामायणाचे धडे देण्यासाठी ही मालिका दूरदर्शनवर सुरु झाली आणि मग या मालिकेदरम्यानच्या अनेक आठवणी समोर आल्या. या मालिकेतील पात्राची निवड, ते सध्या काय करत आहेत? असे अनेक विषय या निमित्ताने समोर आले. पण या मालिकेतील रामाचे पात्र निभावणारे अभिनेते अरुण गोविल यांना सगळ्यात आधी या रोलसाठी रिजेक्ट करण्यात आले होते. त्याच्या एका सवयीमुळे त्यांना रिजेक्ट करण्यात आले. जाणून घेऊया  अरुण गोविल आणि राम या त्यांच्या भूमिकेविषयी

दीपिका - रणवीरचे काय बिनसले, रणवीरने केलाय दीपिकावर गंभीर आरोप

म्हणून सोडली सवय

Instagram

‘रामायण’ ची टीम नुकतीच कपिल शर्माच्या सेटवर येऊन गेली. प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारणारे अरुण गोविल, दीपिका चिखलिया (सीता), सुनील लहरी ( लक्ष्मण)  हे या कार्यक्रमामध्ये आले होते. यावेळी त्यांनी या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्यावेळी अरुण गोविल म्हणाले की, रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत मला रामाचा रोल  मिळवण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागली. कारण ज्यावेळी मी या रोलसाठी ऑडिशन दिले. त्यावेळी मला या रोलसाठी रिजेक्ट करण्यात आले. यासाठी मला कारण ही सांगण्यात आले ते म्हणजे रामाचे पात्र निभावणारी व्यक्ती ही खरचं तशी असायला हवी. त्याला कोणत्याही वाईट सवयी नको. त्यामुळे तुम्हाला हा रोल देण्यात येणार नाही असे त्यांनी सांगितले. अरुण गोविल यांना सिगरेट फुंकण्याची सवय होती. रामानंद सागर यांच्या विक्रम वेताळ या मालिकेत विक्रमादित्याची भूमिका साकारताना त्यांचा सिगरेट पिण्याचा अनुभव सगळ्यांना माहीत होता. मग काय हा रोल मिळवण्यासाठी त्यांनी ही सवयही सोडून दिली. त्यानंतर आजतागायत त्यांनी सिगरेटला हात लावला नाही, असेही ते कपिल शर्मा शो दरम्यान म्हणाले. 

नव्वदीच्या काळातील 'देख भाई देख' मालिकेचं होणार पुनःप्रक्षेपण

अरुण गोविल म्हणजे साक्षात देव

Instagram

एखाद्या व्यक्तीने पडद्यावर देवाची भूमिका साकारल्यानंतर लोकांच्या मनात ती कायम बसते. याचा आणखी एक अनुभव अरुण गोविल यांनी या आधी सांगितला आहे. ते म्हणाले की, एका तामिळ चित्रपटात तिरुपती बालाजीची भूमिका ते साकारत होते. शूट दरम्यान त्यांना मध्येच तल्लफ आली. मग काय ते पडद्यामागे जाऊन सिगरेट फुंकू लागले. त्यांना सिगरेट फुंगताना पाहून एक व्यक्ती त्यांना तामिळ भाषेत काहीतरी सांगून गेला. ते त्यांना कळलं नाही. त्यांनी शेजारीच असलेल्या एका व्यक्तीला विचारले की, काय म्हणाले हे गृहस्थ. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की, ते तुम्हाला देव मानतात आणि तुम्ही सिगरेट ओढता? … बस्सं त्यानंतरच त्यांच्यासोबत रामायण मालिकेचा किस्सा घडला. त्यांनी तातडीने ती सवय सोडून दिली. 

इन्स्टावर झळकणारी 'बोल्ड' ड्रीमगर्ल नुसरत भरूचा

करीअरला मिळाली भरारी पण..

2020 मध्ये रामानंद सागर यांचे रामायण पाहताना अॅनिमेशन तुम्हाला जुने वाटतील. पण ही मालिका आजही अनेकांच्या लहानपणीच्या आठवणीशी जोडली गेली आहे. रामाची भूमिका साकारण्याआधीपासून अरुण गोविल चित्रपटांमधून काम करत होते. ‘ पहेली थी जो’ (1977) या चित्रपटातून त्यांनी डेब्यू केला. त्यानंतर ‘सावन आने दो’ मध्ये ते दिसले. रामानंद सागर यांच्या विक्रम- वेताळ या मालिकेत त्यांनी राजा विक्रमादित्याची भूमिका साकारली. आणि त्यांनतर त्यांनी प्रभू रामचंद्राची भूमिका साकारली. या मालिकेने त्यांना भरपूर ओळख दिली. पण दुर्दैवाने त्यांनी या नंतर कोणतीही चांगली भूमिका मिळाली नाही. त्यांचे अॅक्टींग करीअर संपुष्टात आले. पण त्यांना त्याचे दु:ख कधीही नाही. 


तुम्हीही आता घरी आहाता आवर्जून ‘रामायण’ पाहा.