अभिनेत्री आशा नेगीने 'या' अभिनेत्याच्या मारली कानाखाली, झाले व्हायरल

अभिनेत्री आशा नेगीने 'या' अभिनेत्याच्या मारली कानाखाली, झाले व्हायरल

आशा नेगी हे नाव घराघरात पोहचलं ते ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे. आशा नेगी नेहमीच चर्चेत असते. विशेषतः ऋत्विक धनजानीबरोबर ब्रेक अप झाल्यानंतर तर आशा नेगी अधिक चर्चेत आली आहे. पण आता ती वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. ते म्हणजे सेटवर अभिनेता अंश बागरी यांच्या कानाखाली मारल्यामुळे. तुम्ही आता विचार करणार कशाला मारली? असं काय झालं? तर असं काहीही नाही. एका सीनदरम्यान आशाला अंशच्या कानाखाली मारायची होती. पण ती भूमिकेत इतकी शिरली होती की चुकून तिच्या हातून अत्यंत जोरात अंशच्या कानाखाली मारली गेली. हंगामा प्ले च्या ‘लव का पंगा’ या शो साठी दोघांचे चित्रीकरण चालू असताना हा किस्सा घडला आहे.

आठवड्याभरात बिग बॉस 14 गाजवणारी मराठमोळी निक्की तांबोळी नक्की आहे कोण

अंशने सांगितला हा मजेशीर किस्सा

Instagram

आशा नेगी आणि अंश बागरी हे ‘लव का पंगा’ मध्ये एकत्र काम करत आहे. यामध्ये आशा नेगी एका शहरी मुलीची भूमिका साकारत असून अंश यामध्ये सुमीत नावाच्या हरयाणवी मुलाची भूमिका साकारत आहे. आशाचे नाव या शोमध्ये नेहा असून ती दिल्लीमध्ये राहात असल्याचे दाखविण्यात आले आहे. मनालीमध्ये हे दोघे एकत्र येतात आणि त्यांच्याबरोबर कोणीही कल्पना करणार नाही अशा गोष्टी घडू लागतात. सेटवर झालेल्या अनेक गोष्टी कलाकारांच्या कायम लक्षात राहतात. पण अंशच्या सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात राहिली ती म्हणजे आशाने मारलेली कानाखाली. या शो मध्ये एक सीन होता ज्यामध्ये दोघेही प्यायलेले असतात आणि चुकून अंश आशाच्या अंगावर पडतो आणि आशा त्याला कानाखाली मारते. पण या सीनमध्ये आशा इतकी भूमिकेत शिरली होती की, तिने चुकून अंशच्या खूपच जोरात कानाखाली मारली. पण क्षणातच तिच्या हे लक्षात आलं आणि तीने चूक झाल्याचे मान्य करून माफीही मागितली. पण हे इतकं मजेशीर होतं की कायम लक्षात राहील आणि त्यावर आजही सगळे आम्ही हसतो असंही अंशने या प्रसंगाबाबत सांगितलं आहे. 

या मालिकांमधून आला टिकल्यांचा प्रसिद्ध ट्रेंड, अभिनेत्रींमुळे गाजला ट्रेंड

आशा आणि अंशने केले पहिल्यांदाच एकत्र काम

आशा सध्या अनेक वेबसिरीजमधून दिसत आहे. विशेषतः लॉकडाऊनच्या काळात आशाची ही आता तिसरी वेबसिरीज रिलीज होणार असून 15 ऑक्टोबरला तुम्ही ही सिरीज पाहू शकाल. आशा आणि अंशने पहिल्यांदाच काम केले असून त्यांची केमिस्ट्री अप्रतिम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आशा सध्या व्यावसायिकदृष्ट्या बरीच कामं करत आहे. नुकतीच ती कुणाल खेमू आणि राम कपूर यांच्यासह ‘अभय 2’ मध्येही दिसली होती. तर खासगी आयुष्यात 6 वर्षाच्या नात्यानंतर आता आशा सिंगल असून आयुष्यात पुढे गेली आहे. ऋत्विक आणि आशाचं ब्रेकअप झालं असलं तरीही दोघे चांगले मित्र असून आपल्या नात्याबद्दल लोकांनी आदर राखावा आणि अजूनही आपण ऋत्विकचाही तितकाच आदर करतो असं आशाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. पण ब्रेकअपनंतर खचून न जाता पुन्हा एकदा आशाने आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत अधिकाधिक काम करायचे ठरवले असून तीने त्यादिशेने पाऊल उचलायला सुरूवात केली आहे असं दिसून येत आहे.

मराठीतील ज्येष्ठ अभिनेता अविनाश खर्शीकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक