‘प्रेम कधीच इतकं तितकं नसतं; ते एक तर असतं किंवा नसतं’

‘प्रेम कधीच इतकं तितकं नसतं; ते एक तर असतं किंवा नसतं’

एखाद्या व्यक्तीवर आपण मनापासून आणि अगदी वेड्यासारखं प्रेम करतो तेव्हा त्याला ‘आशिकी’ असं म्हणतात. आशिकी करताना मैत्री, प्रेम, रोमान्स, एक्सप्रेशन्स, भावना, कन्फ्युजन या गोष्टी प्रत्येकजण अनुभवतात. प्रेमाची नवीन व्याख्या देणारी कथा म्हणजे सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ हा मराठी सिनेमा.





पूर्वी प्रेम कनफेस करण्यासाठी फूल आणि प्रेमाचे दोन शब्द पुरेसे होते. पण आताची जनरेशन ही एक स्टेप पुढे असल्यामुळे आता कनफेशनचं कनफ्युझन आणि इमोशनचं कमोशन झालंय. प्रेम जरी कॉम्पलिकेट बनलं असलं तरी स्वयम् आणि अमरजाची आशिकी ही जरा वेगळीच आहे, याचा अंदाज प्रेक्षकांना ‘अशी ही आशिकी’च्या टीझरमधून आला होता.


तरूणाईसाठी नवीन लव्ह साँग ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’


e739b35c-0550-461f-9c21-e656eedf618c


नुकतंच या सिनेमाच्या कथेची आणखी एक झलक दाखवण्यासाठी ‘अशी ही आशिकी’ सिनेमाचा ट्रेलर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे या नवीन जोडीचा फ्रेश रोमान्स, कॉलेजमध्ये फुलणारी रोमँटिक कथा आणि त्यातील चढउतार यावरून कथेचा एकंदरीत अंदाज या ट्रेलरमध्ये येतो. तसंच या सिनेमात अभिनेता सुनिल बर्वे, अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या ही भूमिका आहेत. तर या फ्रेश जोडीच्या फ्रेण्ड्सच्या भूमिकेत करण भानुशाली, स्नेहल बोरकर, स्वामिनी वाडकर आणि सिध्देश नागवेकर हे नवे कलाकार आहेत.

Subscribe to POPxoTV

‘प्रेम कधीच इतकं तितकं नसतं... ते एक तर असतं किंवा नसतं’, ‘जे मोजून मापून केलं जात नाही त्यालाच प्रेम म्हणतात’ यांसारखे प्रेमळ डायलॉग्स, स्वयम आणि अमरजाच्या नात्यातील सुंदर आणि फ्रेण्डली क्षण, बँकग्राऊंड म्युझिक, गाणी, लोकेशन्स इत्यादी गोष्टी प्रेक्षकांची या सिनेमाप्रती असलेली उत्सुकता अजून वाढवणार यात शंकाच नाही.


सोनू निगमच्या ‘रकम्मा’ गाण्यावर अभिनय करणार हटके डान्स




 

 

 


View this post on Instagram


 

 

We promote our films Seriously!!


A post shared by Abhinay Berde (@abhinay3) on




गुलशन कुमार प्रस्तुत ‘अशी ही आशिकी’ सिनेमाची निर्मिती टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांनी केली असून मराठीतला हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. तसंच मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील या सिनेमाची निर्मिती केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हेही या सिनेमाचे निर्माते आहेत.


‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ म्हणत प्रत्येकाला ‘अशी ही आशिकी’ करायला भाग पाडण्यासाठी हा सिनेमा १ मार्च २०१९ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.