पटियाला बेबचं शूटिंग सांभाळत अशनूर कौरने मिळवले दहावीत ‘93’ टक्के

पटियाला बेबचं शूटिंग सांभाळत अशनूर कौरने मिळवले दहावीत ‘93’ टक्के

दहावीच्या CBSE बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना यात चांगले मार्क्स  मिळाले आहेत. अनेक विद्यार्थी आजकाल मालिका आणि चित्रपटात काम करत असतात. हिंदी टेलीव्हिजन मालिका अशनूर कौरनेदेखील यावर्षी दहावीची परिक्षा दिली होती. दहावीत असतानाही ती 'पटियाला बेब' या हिंदी मालिकेत काम करत होती. मालिकेचं शूटिंग सांभाळत अशनूरने दहावीत '93' टक्के मिळवले आहेत. अभिनय क्षेत्रात काम करत असताना अभ्यासातील लक्ष कमी होण्याची शक्यता असते. मात्र या गोष्टीला अशनूरने चुकीचं ठरवलं आहे. अभिनय करत तिने तिच्या अभ्यासात देखील चांगली प्रगती केली आहे.


Ashnoor kaur 2


अशनूरच्या यशाचं रहस्य 


अशनूर कौरने तिच्या यशाचं श्रेय तिच्या कुटुंबाला दिलं आहे. अशनूरने सोशल मीडिया वर तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. “मला एवढे मार्क्स मिळाले आहेत यावर पहिल्यांदा माझा विश्वास बसला नाही. शूटिंग आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळणं फार कठीण होतं. मात्र मी स्वतःच मनात ठरवलं होतं की दहावीला मी चांगले मार्क्स मिळवणार. कारण अनेकांना असं वाटतं की चाईल्ड अॅक्टर्स अभ्यासात ढ असतात. मात्र मला हे मत खोडून टाकायचं होतं. जेव्हा सर्व दहावीची मुलं अभ्यास करत असायची तेव्हा मी दहा ते बारा तासांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असायची. मात्र मी शूटिंगवरून येता- जाताना आणि सकाळी लवकर उठून अभ्यास करायची. रात्री दिड ते अडीच वाजेपर्यंत  अभ्यास करून पुन्हा सकाळी साडेपाचला उठून अभ्यास करायची.त्यानंतर मी शूटिंगसाठी बाहेर पडत असे. शूटिंगमध्ये ब्रेकमध्येदेखील मी अभ्यास केला. या माझ्या मेहनतीचं चांगलं यश मला मिळालं आहे. याबद्दल ती तिची आई, कुटुंबिय, शाळा आणि पटियाला बेबचे सहकारी यांच्या बद्दल कृतज्ञ आहे. कारण या सर्वांमुळेच तिला हे यश खेचून आणणं शक्य झालं आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

So I scored 93% in my 10th boards!💪🏻 . Yes it was tough, managing my shoot as well as my studies, because I am equally passionate about both! I had promised myself to score above 90% and I did! People have the stereotype that child actors won’t be good at studies, and I wanted to break this stereotype!! When everyone had a full month study leave in Feb, I was shooting the entire month, when everyone had 5-7 days before one exam, I had a mere 2-3 days... Shooting for 12 hours with heavy scenes, studying while travelling the car, going back home and studying till 1:30am(sometimes even 2:30am) and getting up next morning again around 5:30am, study, get ready and leave for shoot... Also studying on sets, between shots.. And that’s how MY HARDWORK DID PAY OFF! Thank you almighty, my parents; Pa @gurmeetsingh0911 and Mom, my school for always being so supportive @Ryan.group and my production house #KathaKottage the team of #PatialaBabes and @sonytvofficial for the cooperation. ❤️ . . Article 1 in @hindustantimes , Page 06, Mumbai . Article 2 in @middayindia , Page 08, Mumbai❤️


A post shared by Ashnoor Kaur (@ashnoorkaur) on
अशनूरचं अॅक्टिक करियर


अशनूरने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ती आता पंधरा वर्षांची आहे.वयाच्या पाचव्या वर्षांपासून ती मालिकांमध्ये काम करत आहे. अशनूरने आतापर्यंत झासी की रानी, ये रिश्ता क्या कहलाता है, देवो के देव महादेव, सियासत, साथ निभाना साथिया, सीआयडी, शोभा सोमनाथ की, न बोले तुम न मैंने कुछ कहा या मालिकेत काम केलं आहे. याशिवाय तिने 'मनमर्जिया' या चित्रपटात देखील काम केलं आहे.सध्या तिच्या 'पटियाला बेब' मालिकेतील कामाचं फार कौतुक केलं जात आहे. शूटिंग सांभाळत तिने तिच्या अभ्यासातदेखील घवघवीत यश मिळवल्यामुळे सध्या तिच्यावर शूभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Ashnoor kaur 1


तैमूरच्या लोकप्रियतेमुळे होतोय शेजाऱ्यांना त्रास


आजारी असूनही अमिताभ बच्चन करतायत काम, फोटो झाला व्हायरल


अभिनेत्री मौनी रॉयचा बिकिनी अवतार होतोय व्हायरल


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम