शाहरूखने चाहत्याला सांगितले आपल्या 'मन्नत' बंगल्याच्या एका रूमचे भाडे, जिंकले मन

शाहरूखने चाहत्याला सांगितले आपल्या 'मन्नत' बंगल्याच्या एका रूमचे भाडे, जिंकले मन

शाहरूख खान, त्याची संपत्ती आणि खास म्हणजे त्याचा बंगला या सगळ्याची चर्चा नेहमीच असते. शाहरूख नेहमीच आपल्या चाहत्यांशी संंवाद साधत असतो. पुन्हा एकदा शाहरूखने आपल्या एका खास उत्तराने चाहत्यांचं मन जिंकून घेतलं आहे. बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खाने सोशल मीडियावरील Twitter वर #AskSRK म्हणून नेहमीप्रमाणे चाहत्यांशी संवाद साधला होता. यामध्ये त्याच्या एका चाहत्याने त्याला विचित्र प्रश्न विचारला. पण शाहरूखने नेहमीप्रमाणे आपल्या मजेदार अंदाजात त्याला उत्तर देत इतरही चाहत्यांचं मन जिंकलेले दिसून येत आहे. शाहरूख कधीही आपल्या चाहत्यांना दुखावत नाही. तसंच कोणीही कसाही प्रश्न विचारला तरीही तो व्यवस्थित हाताळायची आता शाहरूखला सवय झाली आहे. त्याचा मजेशीर अंदाज आपण नेहमीच पाहत असतो. यावेळीदेखील त्याचा मजेशीर उत्तर देण्याचा अंदाज आपल्याला दिसून आला आहे. 

दिशा पटानीचं हॉट फोटोशूट व्हायरल

चाहत्याने विचारला विचित्र प्रश्न

बॉलीवूड बादशाह नेहमीच चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत असतो. आता सोशल मीडियामुळे हे प्रमाण अजून वाढलं आहे. शाहरूखला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न ट्विटरवर विचारले. पण त्याच्या एका चाहत्याने त्याला खूपच विचित्र प्रश्न विचारला. जो प्रश्न आणि त्यावर शाहरूख खानने दिलेलं उत्तरही व्हायरल होत आहे. तुफान का देवता असं या चाहत्याचं अकाऊंट असून त्याने शाहरूखला विचारलं, ‘मन्नतमधील एक रूम भाड्याने हवी असेल तर त्याची किंमत काय असेल?’ यावर शाहरूखने जे उत्तर दिलं त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रश्नावर शाहरूखने त्याच्या चाहत्याला उत्तर दिलं, ‘30 वर्षांची मेहनत इतकं भाडं लागेल’. हे उत्तर शाहरूखने दिल्यानंतर त्यावर अनेक कमेंट्स आणि लाईक्स  त्याला मिळाल्या. शाहरूखचा मन्नत हा बंगला अगदी समुद्रकिनारी आहे. या बंगल्याच्या बाहेर शाहरूख नेहमी आपल्या चाहत्यांसाठी काही वेळ देतो. या बंगल्याची नेहमीच चर्चा असते. शाहरूखच्या या उत्तराने त्याचं घर ‘मन्नत’ हे त्याच्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्या किती जवळचं आहे हेच दिसून येतं. जर कोणालाही अशा स्वरूपाचं घर हवं असेल तर त्याला मेहनतीची जोड द्यावी लागेल हा विचारच शाहरूखला मोठं बनवतो. 

आपल्या पार्टनरसाठी या सेलेब्सनी बदलला धर्म

मन्नतची सध्याची किंमत 200 कोटी

Instagram

शाहरूख जेव्हा मुंबईत आला तेव्हा त्याच्याकडे काहीही नव्हते. मात्र त्याने 2001 मध्ये हा बंगला 13.32 कोटी रूपयांना खरेदी केला होता. आता 19 वर्षांनंतर या बंगल्याची किंमत साधीसुधी नाही तर 200 कोटी इतकी झाली आहे. सुरूवातीपासूनच शाहरूख खानला हा महाल खरेदी करायचा होता आणि त्याचं हे स्वप्नं पूर्णदेखील झालं. हे घर शाहरूखची पत्नी गौरी खानने डिझाईन केला आहे. हा बंगला अतिशय आलिशन पद्धतीने डेकोरेट करण्यात आला आहे. मन्नत हे एक थर्ड हेरिटेज स्ट्रक्चरचं घर आहे. जे 1920 मध्ये तयार करण्यात आलं आहे. याचं नाव पहिले ‘विला वियान’ असं होतं. त्यानंतर शाहरूखने हा बंगला खरेदी केला. हा बंगला 26,328.52 चौरस फूट आहे. हा बंगला वांद्रा पश्चिमेला बँडस्टँडजवळ आहे. याचा फोटो काढण्यासाठी इथे रांग लागलेली असते. या बंगल्याचं इंटिरिअर पण अतिशय भव्य तऱ्हेने करण्यात आलेलं आहे. पूर्वी तर हा बंगला शूटिंगसाठीही वापरण्यात येत होता. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.