अमिताभ बच्चनच्या या हिट गाण्यावर थिरकणार असीम आणि जॅकलिन

अमिताभ बच्चनच्या या हिट गाण्यावर थिरकणार असीम आणि जॅकलिन

Bigg Boss 13 मुळे घराघरात पोहोचलेला असीमला घराबाहेर पडताच कामाच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. आता थेट बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली आहे. अमिताभ बच्चनच्या एका हिट गाण्यावर ही जोडी थिरकणार असून त्या दोघांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर असीम की तो निकल पडी अशीच प्रतिक्रिया उमटत आहे. पण आता अमिताभ बच्चन यांच्या कोणत्या हिट गाण्यावर ही जोडी नाचणार असा प्रश्न पडला असेल तर मग हे वाचाच.

सिंघम-सिंबा-सूर्यवंशी आले एकत्र, 'सूर्यवंशी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अमिताभ आणि झीनतच्या गाण्यावर थिरकणार

Instagram

खरंतरं असीम Bigg Boss 13 च्या घरातून बाहेर पडल्यानंतर तो म्युजिक अल्बममध्ये दिसणार हे कळले होते पण त्यावरुन आता काही दिवसांपूर्वी पडदा उठला. तो आणि जॅकलिन यांनी एकत्र काम केल्याचेही कळले. फक्त गाणे कोणते हे मात्र कळत नव्हते. पण नुकताच या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांनीच या गाण्यावरुन पडदा उठवला आहे. अमिताभ आणि झीनत अमान यांचे प्रसिद्ध गाणं ‘मेरे अंगने मे तुम्हाला क्या काम है’ या गाण्यावर हे दोघे थिरकणार आहेत. असीम एक ब्युटी पॅजेंटचा विजेता असून त्याने या आधी आंतरराष्ट्रीय स्तरावर मॉडेलिंग केले आहे. पण त्याला अभिनयाची संधी मिळेल असे वाटले नव्हते पण त्याचे हे काम मिळवून दाखवले आहे. या अल्बमशिवाय त्याचा आणखी एक म्युजिक व्हिडिओ येणार आहे.

अबब! हेमामालिनीची संपत्ती ऐकून तुम्हीही व्हाल अवाक...

गाणं रिलीजची तारीख नाही ठरलेली

Instagram

आता या गगाण्याची उत्सुकता वाढली असली तरी हे गाणं रिलीज कधी होणार याची कल्पना मात्र दोघांनी दिलेली नाही. पण या गाण्याचे शुटींग संपले असून तो रिलीज होण्यासाठी चांगली वेळ शोधत असल्याचे कळत आहे.

रिमिक्समुळे जुन्या गाण्याची लागणार तर नाही वाट

आता सर्वसाधारणपणे रिमिक्स गाण्यांचा ट्रेंड आहे. पण 90च्या दशकातील काही गाण्यांची रिमिक्स केल्यामुळे प्रेक्षकांनी या गाण्यावर आक्षेप घेतला होता. नवीन काही तरी करण्याची क्षमता संपली आहे म्हणूनच तुम्ही अशा पद्धतीने गाणी उचलता असा आरोप अनेक नेटीझन्सनी केला आहे. त्यात आता हे जुनं गाणं रिमिक्स करण्याचा घातलेला घाट किती यशस्वी होईल ते पाहावे लागेल.

रनरअप ठरतात नेहमीच यशस्वी

Instagram

 Bigg Boss च्या इतिहासात आतापर्यंत ज्यांनी रनरअपचा किताब मिळवला आहे. ते फारच यशस्वी झाले आहेत.  Bigg Boss 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला ठरला आणि रनरअप असीम. हा सीझन जिंकून सिद्धार्थ कुठे गायब झाला माहीत नाही. पण असीमला मात्र काम मिळाले. जर तुम्ही मागच्या काही सीझनचा विचार केला तर करिअरच्यादृष्टिने रनरअप स्पर्धकच आयुष्यात यशस्वी झाले आहेत. 


आता असीमच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. त्याचे येणार दोन अल्बम नक्कीच त्याच्या करिअरला वेगळी दिशा मिळवून देतील. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shopद ला भेट द्या.