टीव्हीवरील मोहक आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे अवनीत कौर. आपल्या चाहत्यांना कसं प्रभावित करावं हे तिला चांगलंच माहीत आहे. सोनी सबवरील मालिका 'अलाद्दिन: नाम तो सुना होगा'मध्ये यास्मीनची भूमिका साकारणारी ही लाखो हृदयांची राणी घरामध्येही सध्या अनोख्या व्यस्त शेड्यूलचा आनंद घेत आहे. लॉकडाऊनमध्ये अवनीत तिच्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करत आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित करत आहे आणि तुम्हाला माहीत आहे का, तिने तिच्या भावासाठी वाढदिवसाला खास सरप्राईजही प्लॅन केलं.
लॉकडाऊनमुळे अवनीत कौर घरांमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. त्यातच तिच्या भावाचा वाढदिवस आला. जो अवनीत छान घरच्या घरी केक बनवून आणि टेबल डेकोरेट करून साजरा केला. याबाबत बोलताना ती म्हणाली की, ''मी शूटिंगमधून मिळालेल्या या मोकळ्या वेळेचा चांगला उपयोग करत आहे आणि माझ्या कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवत आहे. मला शूटिंगच्या व्यस्त शेड्यूलमुळे असा वेळ कधीच मिळत नाही. मी अभ्यासाच्या तणावापासून देखील पूर्णपणे मोकळी असल्यामुळे नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. नुकताच आम्ही माझ्या भावाचा वाढदिवस साजरा केला आणि मी त्याच्यासाठी केक बनवला. घरीच असण्याच्या माझ्या कालावधीदरम्यानचा हा सर्वोत्तम क्षण आहे.''
एवढंच नाहीतर टीव्हीवरील मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटींपैकी एक अवनीत आहे. नुकताच तिने तिचा वर्क फ्रॉम होम लुकचा फोटो शेअर केला आणि त्यावर लाईक्सची बरसातही झाली. लॉकडाऊनच्या काळातही अवनीत तिच्या वॉर्डरोब आणि इतर गोष्टींकडे लक्ष देत आहे. याबाबत ती सांगते की, ''मी माझ्या खोलीतील प्रत्येक गोष्ट, पोशाख, मेकअप व्यवस्थित ठेवण्यासाठी देखील या वेळेचा सदुपयोग करत आहे आणि ही कामं मला बऱ्याच दिवसांपासून पूर्ण करायची होती. या काळात मी माझ्या सोशल मीडिया हँडल्ससाठी मजेशीर कन्टेन्टची निर्मिती करत आहे. या मोकळ्या वेळेमुळे मला माझ्या कुटुंबाशी अधिक जवळीक साधण्याची संधी मिळाली आहे. आम्ही एकत्र चित्रपट आणि मालिका पाहण्याचा आनंद घेत आहोत. मी माझ्या आईची लाडकी आहे आणि ती माझी जिवलग मैत्रीण आहे. म्हणून आम्ही घरकाम करत करत बराच वेळ एकत्र व्यतित करत आहोत.''
सोशल मीडियावर अवनीतचं भरपूर फॅन फॉलोइंग आहे. याबाबत तिने सांगितल की, ''आणखी एक आनंददायी क्षण म्हणजे नुकतंच मी इन्स्टाग्रामवर १० दशलक्ष लाईक्सचा टप्पा गाठला. मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाने तो आनंद साजरा केला. माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासोबत नेहमी मला पाठिंबा देणारे माझे चाहते, फॉलोअर्स आणि मालिका 'अलाद्दिन: नाम तो सुना होगा'च्या प्रेक्षकांचे मी मन:पूर्वक आभार मानते.''अवनीत म्हणजेच यास्मीनला भेटण्यासाठी नक्की पाहा अलाद्दिन : नाम तो सुना होगा.