रणबीर कपूर आणि आलिया भटची जोडी पहिल्यांदाच ‘ब्रम्हास्त्र’मधून झळकणार आहे. शिवाय या चित्रपटाची त्याच्या मोठया बजेटमुळे खूप दिवसांपासून चर्चा आहे. त्यामुळे रणबीर आलियाचा हा मेगाबजेट चित्रपट पाहण्यासाठी चाहते नक्कीच आतूर झाले आहेत. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट चांगलाच रखडला आहे. त्यामुळे निर्मात्यांना चित्रपटाच्या वाढत्या बजेटने चांगलंच कोंडीत टाकलं होतं. आता चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन करणारा अयान मुखर्जीदेखील या चित्रपटाच्या निर्मित्यांच्या यादीत शामिल झाला आहे. अयान मुखर्जीने आजवर वेक अप सिद, ये जवानी है दिवानी अशा रणबीरच्या मुख्य भूमिका असलेल्या तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे या दोघांची जोडी नेहमीच हिट फॉर्मुला ठरते. आता तर ब्रम्हास्त्रपासून अयान दिग्दर्शनासोबतच निर्मिती क्षेत्रातही आपलं पाऊल रोवत आहे.
कधी होणार ब्रम्हास्त्र प्रदर्शित
ब्रम्हास्त्रमध्ये रणबीर आणि आलियासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जून, डिंपल कपाडिया, मौनी रॉय अशा मोठमोठ्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. शाहरुख खानचाही या चित्रपटात एक स्पेशल अपिअरन्स असणार आहे. त्यामुळे ब्रम्हास्त्र पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये नक्कीच उत्सुकता आहे. त्यात आता अयान मुखर्जीने दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाचा निर्माता होण्याची जबाबदारी पेलल्यामुळे चित्रपटाबाबत आणखी चर्चा सुरू झाली आहे. अयान मुखर्जी यात शामिल होण्याचं कारण की अता निर्मांत्यांना हा चित्रपट आणखी रखडावा असं वाटत नाही. ज्यामुळे सर्व जण या चित्रपटाच्या प्रमोशनल कॅम्पेनच्या तयारीला लागले आहेत.
अयान मुखर्जीचे ‘ब्रम्हास्त्र’मधून निर्मिती क्षेत्रात पदार्पण
ब्रम्हास्त्रची उत्सुकता वाढवण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटाचे दहा शार्ट टीझर आणि तेरा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्याची परवानगी सेंटर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन कडून मिळवली आहे. थोड्या थोड्या कालावधीनंतर हे प्रमोशनल व्हिडिओज आणि फोटोज प्रदर्शित केले जाणार आहेत. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी निर्मात्यांकडे चांगला कंटेट आहे जो या प्रमोशनल कॅम्पेनसाठी वापरला जाणार आहे. या टीझर आणि पोस्टरची निर्मिता हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि बंगाली सारख्या अनेक भाषांमध्ये करण्यात आलेली आहे. आता सेंटर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या वेबसाईटवर याची नोंद करण्यात आली आहे. मात्र यातून एक वेगळीच गोष्ट समोर आली कारण आतापर्यंत या चित्रपटाच्या निर्मांत्यांच्या यादीत फक्त करण जोहरची धर्मा प्रॉडक्शन आणि फोक्स स्टार स्डूडिओज हीच नावं होती. आता त्यामध्ये स्टारलाईट पिक्चर्स हे नावही शामिल झालं आहे. स्टारलाईट पिक्चर्स अयान मुखर्जीची कंपनी आहे. त्यामुळे या नावामुळे अयान मुखर्जीदेखील आता ब्रम्हास्त्रचा निर्माता असणार आहे ही गोष्ट समोर आली आहे. याचा अर्थ अयान आता ब्रम्हास्त्रचा फक्त दिग्दर्शक आणि लेखक नाही तर तो या चित्रपटाचा निर्माताही आहे. अयान मुखर्जीची स्टारलाईट पिक्चर्स कंपनी फेब्रुवारी 2021 मध्ये रजिस्टर करण्यात आलेली आहे.यातून हेच सिद्ध होते की निर्मांत्यांना लवकरात लवकर आता ‘ब्रम्हास्त्र’ प्रदर्शित करण्याची घाईल लागली आहे. कारण काही असलं तरी या निमित्ताने प्रेक्षकांना आणखी एक बिग बजेट चित्रपट या निमित्ताने पाहता येईल.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
अखेर स्वीटुने दिली प्रेमाची कबुली, आता येणार मालिकेत रंगत
अभिनेत्री पूजा सावंत पडली प्रेमात, ‘पिकबू’ लाडाचे नाव
बॅकग्राऊंड डान्सर्सच्या मदतीसाठी अक्षय कुमार आला पुढे, 3600 डान्सर्संना पूरवणार भोजन