‘ड्रीम गर्ल’ नंतर आयुषमान खुराणा घेतोय चित्रपटांपासून ‘ब्रेक’

‘ड्रीम गर्ल’ नंतर आयुषमान खुराणा घेतोय चित्रपटांपासून ‘ब्रेक’

आयुषमान खुराणा आता बॉलीवूडसाठी एक ब्रँड बनला आहे. लागोपाठ हिट चित्रपट देऊन आयुषमानने सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 'बरेली की बर्फी, 'शुभ मंगल सावधान', 'बधाई हो बधाई' 'अंधाधुन' आणि 'आर्टिकल 15' नंतर आता 'ड्रीम गर्ल'ने देखील बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. इतकंच नाही तरत आयुषमानचे चित्रपट आणि अभिनय हा क्रिटिक्सनादेखील आवडतो आहे. पण आता आयुषमानने एक खुलासा केला आहे ज्यामुळे त्याच्या  चाहत्यांची नक्कीच निराशा होऊ शकते. वास्तविक आता आयुषमान चित्रपटांपासून एक मोठा ब्रेक घेणार असल्याचं त्यानं सांगितलं आहे. अर्थात तो चित्रपटांपासून दूर जाणार नाही. पुढच्या वर्षीही त्याचे चित्रपट येत आहेत पण काही काळासाठी तो ब्रेक घेणार आहे. 

अबब! हुबेहुब शाहरुख खान…सोशल मीडियावर या शाहरुखची चर्चा

आयुषमान देणार कुटुंबाला वेळ

'ड्रीम गर्ल' असो वा 'अंधाधुन' यासारख्या अनेक भिन्न चित्रपटातून अभिनयाच्या जोरावर आयुषमानने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. इतकंच नाही तर त्याने यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारदेखील जिंकला आहे. बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना ‘विकी डोनर’सारख्या वेगळ्या विषयाचा स्वीकार करत त्याने दमदार पदार्पण केलं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर आयुषमान सतत काम करत आहे. त्यामुळे आयुषमानने आता आपल्या कुटुंबाला वेळ द्यायचा ठरवलं आहे. ‘मला माहीत नाही हा ब्रेक किती मोठा असेल. कदाचित दोन तीन महिने किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो. मला जाणवलं आहे की, माझी मुलं मोठी होत आहेत आणि त्यांनाही माझ्या वेळाची गरज आहे. तसंच माझी पत्नी ताहिरा गेल्या वर्षभरात ज्या आजारातून गेली आहे तिलादेखील वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे मी मोठा ब्रेक घेण्याचं ठरवलं आहे’ असं आयुषमानने स्पष्ट केलं आहे. ‘गेल्यावर्षी लागोपाठ 4 चित्रपटांचं शूटिंग केलं आहे. त्यामुळे माझ्यासाठीदेखील हा खूपच कठीण काळ होता. आता यापुढे कुटुंब आणि काम या दोघांमध्येही व्यवस्थित संतुलन ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 15 नोव्हेंबरनंतर मी मोठा ब्रेक घेत आहे आणि परत कधी येणार हे अजूनही ठरवलेलं नाही.’

सुहाना खान या चित्रपटातून करतेय डेब्यू

काम पूर्ण करूनच घेणार ब्रेक

View this post on Instagram

Styled by @ishabhansali

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

ब्रेकवर जाण्यापूर्वी आयुषमान आपलं राहिलेलं काम पूर्ण करणार आहे. येत्या 22 नोव्हेंबरला आयुषमानचा ‘बाला’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसंच त्याचा दुसरा चित्रपट ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ हादेखील 2020 मध्ये येणार आहे. याशिवाय कॉमेडी ड्रामा ‘गुलाबो - सिताबो’मध्येही आयुषमान काम करत आहे. लवकरच आयुषमान बालाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होईल. तर इतर चित्रपटांचं शूटिंगही संपवण्याच्या मागे आयुषमान आहे. त्यानंतर काही काळ तो आपल्या कुटुंबाबरोबर राहणार आहे. बालानंतर कोणताही चित्रपट आपण साईन केलेला नाही असंही आयुषमाने सांगितलं आहे. त्यामुळे अतिशय विचारपूर्वक आपण हा निर्णय घेतला असल्याचंही आयुषमानने सांगितलं. कामातून ब्रेक घेण्याची गरज प्रत्येकाला असते. त्यामुळे आयुषमानचा हा निर्णय नक्कीच योग्य आहे. गेल्या दोन वर्षात आयुषमानने बरेच चित्रपट केले आहेत. त्यामुळे आता थोडा ब्रेक घेणं साहजिक आहे. पण त्याच्या चाहत्यांना त्याने लवकरात लवकर परत यावं असं नक्कीच वाटत असणार. सुट्टीचा आनंद घेऊन आयुषमान लवकरच पुन्हा त्याच जोषाने परत येईल हे नक्की.

Good News: कल्कीने दिली गोड बातमी, केला होणाऱ्या बाळाबद्दल खुलासा

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.