दीपिकाच्या #AllSleepMatters अभियानाला सेलिब्रिटींनी दिला असा प्रतिसाद

 दीपिकाच्या #AllSleepMatters अभियानाला सेलिब्रिटींनी दिला असा प्रतिसाद

लवकर झोपणे म्हणजे तुम्ही आळशी आहात असे अजिबात होत नाही? कारण लवकर झोपणे हे आरोग्यासाठी चांगले आहे. हे आम्ही नाही तर आता दीपिका पदुकोण सांगत आहे. दीपिकाने #AllSleepMatters मोहीमच हाती घेतली आहे. तिने या संदर्भातील एक फोटो शेअर केल्यानंतर आता बी टाऊनमधील अन्य सेलिब्रिटींनीही तिला पाठींबा दिला आहे. एकूणच काय झोप ही महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त झोपा.


निकशी प्रसिद्धीसाठी लग्न केल्याच्या वक्तव्यावर काय म्हणाली प्रियांका.. वाचा


दीपिकाने सुरु केली चळवळ


deepika movement


झोप ही आरोग्यासाठी महत्वाची असते.  त्यामुळे तुमची झोप पूर्ण करण्याचा किंवा झोपण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे.  जर तुम्हाला तुमच्या लवकर झोपण्याच्या सवयीवरुन कोणी बोलत असतील तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत त्याचे फायदे जाणून घेतले पाहिजेत. दीपिकाने याच झोपेचे महत्व जाणत ही नवी चळवळ सुरु केली आहे. तिने हा फोटो शेअर करत  मी ही चळवळ सुरु करत आहे असे म्हटले आहे.


चांगली झोप मिळण्यासाठी टिप्स देखील वाचा


बी टाऊन सेलिब्रिटींनी दिला प्रतिसाद


आता दीपिकाने फोटो शेअर केला आहे म्हटल्यावर त्यावर प्रतिक्रिया येणे अगदीच स्वाभाविक आहे. दीपिकाने फोटो शेअर केल्यानंतर त्यावर ऋतिक रोशन, अभिषेक बच्चन यांनी पाठींबा दर्शवला आहे. तर दुसरीकडे करण जोहरने दीपिकाचा धडा घेत झोपलेला #bedfie शेअर केला आहे. आता या झोपेच्या चळवळीला आणखी किती जण जोडले जातात हे पाहावे लागेल. पण जर तुम्हालाही झोप प्रिय असेल तर तुम्ही देखील नक्कीच दीपिकाच्या या मोहिमेला पाठिंबा द्यायला हवा.


Also Read : गर्भाची स्थिती


दीपिका नेहमीच करते सोशलवर्क


दीपिका चांगली अभिनेत्री आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण ती नेहमीच स्वत:ला चांगल्या कामात व्यग्र ठेवत असते. समाजसेवेची तिला आवड असून तणावग्रस्त लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी ती काम करते. त्यामुळे आता या नव्या कामाचीही लोक प्रशंसा करत आहेत. आता या मोहीमेत आणखी कोण कोण सहभागी होणार हे कळेलच.


अजय- काजोलची निसा होतेय या कारणामुळे ट्रोल


दीपिकाने केले ‘छपाक’चे शुटींग पूर्ण


chapaak pack up


दीपिका सध्या ‘छपाक’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. पण आता या चित्रपटाचे शुटींग संपले आहे. दीपिकाने स्वत: शेवटच्या दिवसाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने तिच्या करिअरमधील एक खास चित्रपट आहे, असल्याचे तिने म्हटले आहे. हा चित्रपट लवकरच फ्लोअरवर येणार  आहे.


चांगली झोप मिळण्यासाठी टिप्स देखील वाचा


रणवीर आहे शुटींगमध्ये व्यग्र


 दीपिका आणि रणवीर दोघेही शुटींगमध्ये व्यग्र होते. रणवीर सध्या 83  या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाची जोरदार तयारी सुरु असून रणवीर  त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सतत फोटो शेअर करत असतो. काहीच दिवसांपूर्वी त्याने आणखी एका चित्रपटाची घोषणा केली असून  तो ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तो गुजराती माणसाची भूमिका साकारत असून हा चित्रपट यशराज फिल्मसची निर्मिती असलेला आहे. या आधीही यशराज फिल्म्ससोबत रणवीरने काम केलेले आहे. 


हा #hot सेलिब्रिटी करतोय बॉलीवूडमध्ये पदार्पण


(फोटो सौजन्य- Instagram)