Baaghi 3: अॅक्शनचा भडिमार, दिशाहीन दिग्दर्शन…पदरी निराशा

Baaghi 3: अॅक्शनचा भडिमार, दिशाहीन दिग्दर्शन…पदरी निराशा

निर्माता - नाडियादवाला ग्रँडसन, फॉक्सस्टार स्टुडिओज

दिग्दर्शक - अहमद खान

कलाकार - टायगर श्रॉफ, रितेश देशमुख, श्रद्धा कपूर, अंकिता लोखंडे, जॅकी श्रॉफ 

स्टार - 1.5* 

बाघी सिरीजमधील हा तिसरा चित्रपट. टायगर श्रॉफ हा नक्की चांगला अभिनेता आहे की नाही असा प्रश्न आपण विचारण्याआधीच त्याचं उत्तर हा चित्रपट बघितल्यानंतर आपल्या समोर येतं. साजिद नाडियादवालाने प्रचंड प्रमाणात या चित्रपटासाठी पैसे वापरले असले तरीही हा पैसा वसूल चित्रपट आहे असं अजिबातच म्हणता येणार नाही.  अगदी जुनी पटकथा वापरून हा तिसरा चित्रपट बनवण्यात आला आहे. यामध्ये अॅक्शनचा भडिमार आहे, पण दिशाहीन दिग्दर्शनामुळे हा चित्रपट एक हास्यास्पद चित्रपट बनला आहे. दिग्दर्शक अहमद खानने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, हा चित्रपट अॅक्शनपट असून अॅक्शनच या चित्रपटाची जान आहे. पण केवळ अॅक्शन असून काय होणार त्यामध्ये कथा असणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि या चित्रपटाने तिथेच मार खाल्ला आहे असं म्हणावं लागेल. 

Review - आणि कडडड्क काशीनाथ घाणेकर

मोठ्या भावाचं रक्षण करणारा लहान भाऊ

View this post on Instagram

#baaghi3 screening... . . .

A post shared by shutterbugs images (@shutterbugsimages) on

भारतीय संस्कृतीमध्ये मोठा भाऊ हा नेहमी लहान भावाचं रक्षण करतो हे परंपरागत आपण चित्रपटांमधूनही पाहात आलो आहोत. पण या चित्रपटामध्ये उलट आहे.  मोठा भाऊ विक्रम (रितेश देशमुख) याचं संरक्षण लहान भाऊ (रॉनी) करत असतो. त्यांचे वडील (जॅकी श्रॉफ) मरताना त्याच्याकडून असं वचन घेऊन मरतात. प्रत्येक वेळी संकटाच्या वेळी लहान भाऊ मोठ्या भावाच्या मदतीसाठी पुढे येतो आणि हीच गोष्ट प्रेक्षकांच्या पचनी पडणं थोडं कठीण होतं.  एका वेळी आतापर्यंत हिरो दहा गुंडाना मारतो हे पचनी पडू शकतं. पण सिरियासारख्या देशात एकाच दिवसात विसा मिळवून जाणं आणि तिथे जाऊन जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुख जलाल याच्याशी दोन हात करणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. टायगरने त्याला देण्यात आलेले स्टंट उत्तम केले आहेत. तर रितेश देशमुखनेही त्याला देण्यात आलेलं काम अप्रतिम केलं आहे. पण सिया (श्रद्धा कपूर) आणि तिच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत असणाऱ्या अंकिता लोखंडेला काहीही काम नाही. त्यामुळे या दोघींची भूमिका उगाचच ओढून ताणून असल्यासारखे वाटते. सियाच्या तोंडी असलेल्या शिव्या नक्की का आहेत आणि असतील तर अशा ओढून ताणून का दिल्या आहेत हेदेखील कळत नाही. त्यामुळे या सर्वच गोष्टींचा उगाच भरणा केल्यासारखा वाटतो. कथेमध्ये कोणतीही जागेला खिळवून ठेवण्यासारखी गोष्ट नाही. त्यामुळे गंभीर शॉट्सच्या वेळीही प्रेक्षकांमध्ये हशा पिकतो. श्रद्धादेखील अॅक्शन करताना दाखवलं असतं तर कदाचित त्याचा परिणाम प्रेक्षकांवर चांगला झाला असता. 

Film Review : महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण पान सादर करणारी 'हिरकणी'

प्रेक्षक किती बघणार माहीत नाही

टायगर श्रॉफ काही चित्रपटांमध्ये चांगला अभिनय करतो तर काही चित्रपटांमुळे नक्की याला अभिनय येतो की नाही असा प्रश्न पडतो. रितेश देशमुखने नेहमीप्रमाणे आपलं काम उत्तम पार पाडलं आहे. त्याच्यामुळे किमान चित्रपट थोडा वेळ तरी पाहावासा वाटतो. सर्वात जास्त भाव खाऊन गेला आहे तो जॅकी श्रॉफ. या वयातही उत्तम फिजिक असणारा जॅकी चित्रपटात भाव खाऊन जातो. श्रद्धा आणि अंकिता या दोघींनाही कोणताही वाव चित्रपटात नाही. शनिवार आणि रविवार दोन दिवस हा चित्रपट कदाचित चालू शकेल पण त्यानंतर या चित्रपटाची नक्की काय अवस्था होईल हे सांगता येणं कठीण आहे. अॅक्शनपट आवडत असेल तर कदाचित काही प्रेक्षकांना हा चित्रपट आवडू शकेल. पण कथेच्या दृष्टीने मात्र सगळाच ठणठणपाळ आहे असं म्हणावं लागेल. केवळ टायगर श्रॉफच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट आहे. बाकी प्रेक्षकांनी आपल्या जबाबदारीवर हा चित्रपट पाहावा. 

Movie Review : अशक्य स्वप्न पूर्ण करण्याची कहाणी ‘मिशन मंगल’

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.