शिवगामी दिसणार ‘अॅडल्ट’ चित्रपटात, पाहा चित्रपटाचा ट्रेलर

शिवगामी दिसणार ‘अॅडल्ट’ चित्रपटात, पाहा चित्रपटाचा ट्रेलर

ज्या शिवगामीमुळे बाहुबली चित्रपटाची कथा बदलली. ती शिवगामीदेवी आता अॅडल्ड चित्रपटात एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. अर्थातच आम्ही बोलत आहोत साऊथ अभिनेत्री राम्या कृष्णनबद्दल...बाहुबलीने तिला एक वेगळी ओळख दिली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण आता त्या भुमिकेतून बाहेर पडत एक वेगळा प्रयोग करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. तिच्या नव्या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘सुपर डिलक्स’ असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपटाचा ट्रेलर नावाप्रमाणेच आहे.


आगामी चित्रपटासाठी दीपिकाची दुहेरी कसरत


राम्याने एका शॉटसाठी घेतले ३७ टेक्स


राम्याची बाहुबलीमुळे एका प्रेमळ, कर्तबगार आई अशी ओळखल बनली होती. तिला तिच्या या रोलमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम केले. त्यामुळे ती एक प्रेमळ महिलेची भूमिका साकारु शकते असे वाटते. पण या गोष्टीला तिने या चित्रपटात छेद दिला आहे. कारण यात तिने अॅडल्ट चित्रपटात काम करणाऱ्या लीलाचे कॅरेक्टर साकारले आहे. ट्रेलरमध्ये काहीतरी सस्पेन्स घडत आहे असे नक्कीच कळते. पण त्यासोबतच राम्याचा एक हॉट अंदाज काही क्षणासाठी पाहायला मिळतो. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात असा एक इंटिमेट सीन आहे जो करण्यासाठी राम्याला ३७ टेक्स लागले त्यानंतर तिने परफेक्ट शॉट दिला. या चित्रपटात विजय सेतुपति, समँथा आणि मास्किन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तामिळ भाषेतील आहे. थिगाराजन कुमारराज यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून  २९ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या तरी हा चित्रपट तामिळमध्ये रिलीज होणार आहे. पाहा चित्रपटाचा ट्रेलर

Subscribe to POPxoTV

राम्या आधी नाडियाला दिली होती ऑफर


राम्याचे नाव या चित्रपटासाठी  पुढे येण्यासाठी साऊथ स्टार नादिया मोईदू या चित्रपटात लीला साकारणार अशी चर्चा होती. पण शेवटी राम्याला या चित्रपटासाठी फायनल करण्यात आले. राम्या आणि नादिया या दोन्ही साऊथच्या प्रसिद्ध अशा अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमधून काम केलेले आहे. नादिया हिने मल्याळम चित्रपटातून कामे केलेली आहेत. तर राम्या कृष्णनने तामिळ, तेलगु, कन्नड, मल्याळ आणि हिंदी चित्रपटातून काम केले आहे.


nadhiya moidu


कोण आहे पॉर्न स्टार लीला?


मल्लु अनकट या अॅडल्ट मुव्हीमध्ये लीलाने काम केले आहे. तिची ही कथा आहे. या आधीही सनी लिओनी या पॉर्नस्टारच्या जीवनावर आधारीत ‘करणजीत कौर’ नावाची एक वेबसीरिज येऊन गेली आहे. पण चित्रपटाच्या ट्रेलरवरुन तरी या चित्रपटात बरेच सस्पेन्स आहे असे कळत आहे.


दिशा पटानी आदित्य ठाकरेला करत आहे डेट?


shivgami


शिवगामीवर बनणार वेबसीरिज


बाहुबलीच्या दोन्ही भागांमध्ये शिवगामीचे कॅरेक्टर अत्यंत महत्वाचे होते. आता तेच कॅरेक्टर वेबसीरिजच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द राईज ऑफ शिवगामी’ या पुस्तकावर आधारीत ही वेबसीरिज असून एस.एस. राजमौली आणि देवा भट्टा ही वेबसीरिज बनवणार आहे. या वेबसीरिजचे एकूण १० एपिसोड बनणार असून एका एपिसोडसाठी तब्बल २ मिलियन इतका खर्च येणार आहे. हा बाहुबलीच्या आधीचा प्रीक्वल आहे असे म्हणायला हवे. कारण यात राजमाता शिवगामीचा इतिहास पाहायला मिळणार आहे.


(व्हिडिओ, फोटो सौजन्य- Youtube,Instagram)