दिल्लीच्या JNU विद्यापीठात जाणे दीपिकाला चांगलंच भोवलं आहे. तिने तिथे जाणं आणि तिच्याबद्दल उलट-सुलट चर्चा होणं यांना आता एकच उधाण आलं आहे. देशात CAA ( नागरी दुरुस्ती कायदा) पास करण्यात आला आहे. पण याला काही विद्यापीठांनी विरोध केला आहे.त्यामध्येच JNU विद्यापीठ आहे. अनेक कलाकारांनी या कायद्याविरोधात या आधी माहिती नसताना आवाज उठवला. त्यात दीपिकानेही या विद्यापीठाला भेट दिल्यानंतर तिही देशविरोधी आहे असे समजून तिला ट्रोल केले गेले. पण आता बाबा रामदेव यांनी दीपिकाला एक चांगला सल्ला दिला आहे. ANIने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एका मुलाखतीदरम्यान दीपिकाला माझ्यासारख्या सल्लागाराची गरज असल्याचे म्हटले आहे. नेमकं का म्हणाले असे बाबा रामदेव ते आधी जाणून घेऊया.
प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘चोरीचा मामला’ सिनेमाचं पोस्टर लाँच
दीपिकाला दिला मोलाचा सल्ला
2020 ची सुरुवात दीपिकाने तिच्या ‘छपाक’ या चित्रपटापासून केली. तिचा हा चित्रपट रिलीज झाला खरा. पण त्या आधी तिने प्रमोशन करण्यासाठी बरेच काही केले. बरेच काही करण्याच्या नादात ती दिल्लीत असताना तिने JNU विद्यापीठात विद्यार्थ्यांना भेटायला गेली. त्यावेळी तिने जखमी विद्यार्थिनीला भेट देली. या भेटीनंतर दीपिकाने देशविरोधात आवाज उठवल्याचे एकच चित्र लोकांपुढे उभे करण्यात आले. आता दीपिकासारख्या इतक्या नावाजलेल्या अभिनेत्रीकडून अशी अपेक्षा अजिबातच कोणाला नव्हती. म्हणून अनेकांनी ‘छपाक’ या चित्रपटावर बंदीच घातली. हा सगळा गोंधळ पाहिल्यानंतर बाबा रामदेव एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले की, CAA विरोधात आवाज उठवणाऱ्यांना त्याचा अर्थ माहीत नाही. पण तरीसुद्धा ते त्यावर आपली मतं व्यक्त करत आहेत. दीपिका अभिनय क्षेत्रात उत्तम आहे. यात काही वाद नाही. पण तिला इतर सामाजिक गोष्टींची माहिती घेण्याची गरज आहे. हे जाणून घेण्यासाठी तिला माझ्यासारख्या सल्लागाराची गरज आहे. जो तिला योग्य मार्गदर्शन करु शकेल.
पण दीपिकाने काहीच केले नाही
तसं पाहायला गेलं तर दीपिकाने काहीच केलं नाही. दीपिका JNU मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी घोषणाबाजी झाली. पण या घोषणाबाजीवेळी तिने काहीही बोलणं पसंत केलं नाही. तिने कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिला नाही. पण तरीही दीपिकाने CAAला विरोध करत JNU च्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला अशाच चर्चा जास्त रंगल्या. याचे नुकसान दीपिकाला झाले. आधीच तान्हाजी की छपाक अशा गोंधळात असलेल्या प्रेक्षकांनी अखेर तान्हाजीलाच पसंती दिली. त्यामुळे जी स्पर्धा या दोन चित्रपटात रंगली असती ती काही दिसली नाही.
अग्गंबाई सासुबाई मालिकेत साजरी होणार शुभ्राची पहिली संक्रांत
आता दीपिका देईल का स्पष्टीकरण
या सगळ्या प्रकरणानंतर दीपिकाने मात्र काहीही बोलणे टाळले आहे. तिने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे दीपिकाच्या मनात नेमकं काय चाललं आहे ते कळायला काहीच मार्ग नाही. पण कधी कधी काही न बोलणचं चांगलं असतं. त्यामुळे दीपिकाने या सगळ्यामध्ये घेतलेला समजुतदारपणाच चांगला आहे. असं म्हणायला हवा.
आता राहिला प्रश्न सल्लागाराचा तर दीपिका नक्कीच यातून काहीतरी धडा घेईल अशी अपेक्षा आहे.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/