Good News: बबिता फोगट करणार लवकरच लग्न, याचवर्षी वाजणार सनई - चौघडे

Good News: बबिता फोगट करणार लवकरच लग्न, याचवर्षी वाजणार सनई - चौघडे

भारताची धाकड पैलवान बबिता फोगट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिने स्वतः ही गोड बातमी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. बबिताने आपल्या सोशल मीडियावर मंगळवारी हे शेअर केलं. तसंच तिने ही बातमी सांगताना तिचा होणार नवरा आणि पैलवान विवेक सुहाग याचा फोटो आपल्या वडिलांबरोबर शेअर केला आहे. हरिणामधील झज्जर या गावातील विवेक सुहागदेखील पैलवान असून लवकरच हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.


विवेक सुहाग होणार बबिताचा नवराविवेक सुहाग हादेखील हरियाणामधील पैलवान असून त्याने 2018 मध्ये कुस्तीमध्ये ‘भारत केसरी’ पुरस्कार जिंकला आहे. बबिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये बबिता आपले बापू अर्थात बाबा महावीर फोगट विवेक सुहागला आशीर्वाद देत असलेला फोटो शेअर केला आहे. आपल्या वडिलांकडून परवानगी मिळाली असल्याचंही तिने सांगितलं आहे. हा फोटो शेअर करताना तिने मजेशीर कॅप्शन दिलं असून त्यातून तिला झालेला आनंद कळून येत आहे. बबिताने लिहिलं आहे की, ‘विवेक सुहाग माझ्या वडिलांकडून आशीर्वाद मिळाला म्हणजे आता हे नक्कीच अधिकृत झालं आहे. आता दिलवालेने दुल्हनिया घेऊन जाण्याची वेळ आली आहे.’ दरम्यान इन्स्टाग्रामवर ‘माय हिरो, लाईफलाईन’ असे हॅशटॅगही तिने वापरले आहेत.


gathbandhan babita vivek


बबिताच्या वडिलांनी केलं नातं पक्कं


मिळालेल्या माहितीनुसार बबिता आणि विवेकचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आता त्यांच्या घरच्यांकडूनही त्यांच्या प्रेमाला अनुमती मिळाली आहे. बबिताचे वडील आणि काकांनी विवेकबरोबर तिच्या लग्नाची बोलणी पक्की केली असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच याचवर्षी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात यांच्या घरात सनई - चौघडे वाजतील असा अंदाज आहे. इतकंच नाही तर, बबिताचे वडीलही कुस्तीपटू असून त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.


2010 च्या कॉमनवेल्थपासून मिळालं बबिताला यश


बबिता फोगटने कुस्तीमध्ये केवळ तिच्या आई-वडिलांचं नाही तर भारताचंही नाव सन्मानाने मोठं केलं आहे. 2010 मध्ये कुस्तीमध्ये सिल्व्हर मेडल जिंकून बबिताचं नाव सर्वांसमोर आलं. यानंतर बबिताला हरियाणा सरकारने पोलीस दलामध्ये तिला सब-इन्स्पेक्टरचं पदही दिलं आहे. बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर बबिता फोगटने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. आता लवकरच बबिता फोगट विवेक सुहागबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. बबिताच्या बहिणीही भारताचं नाव सन्मानित करत आहे. दरम्यान बबिताची मोठी बहीण गीता फोगटदेखील कुस्तीमध्ये आतंरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. तर विनेश फोगटही प्रसिद्ध आहे. काही महिन्यांपूर्वीच विनेश फोगटचंही लग्न झालं आहे. आता बबिताही लवकरच बोहल्यावर चढणार असून फोगट परिवारामध्ये लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.  फोगट परिवारातील सर्व मुलीही कुस्तीमध्ये असून त्यांनी देशात कुस्तीमध्ये केवळ मुलंच नाव कमावत नाहीत तर मुलीही पुढे जाऊ शकतात हे दाखवून दिले. फोगट परिवारातील मुलींनंतरच कुस्तीमध्ये बऱ्याच मुलींनी यायला सुरवात केली. इतकंच नाही तर फोगट परिवारावरील आमिर खान अभिनित ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अमाप यश मिळवलं. केवळ भारतातच नाही तर चीनमध्येही या चित्रपटाने भरघोस कमाई केली आहे.


फोटो सौजन्य - Twitter


हेदेखील वाचा - 


कसौटी जिंदगी की : सीरियलमध्ये झाली मिस्टर बजाजची एंट्री


अजय-काजोलची 'निसा' होतेय या कारणामुळे सतत ट्रोल


‘या’ कारणामुळे उतरन फेम रश्मी देसाईचा बिग बॉस 13 मध्ये भाग घेण्यास नकार