थप्पड' एक विचित्र चित्रपट,बाघी 3 चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे विधान

थप्पड' एक विचित्र चित्रपट,बाघी 3 चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे विधान

एक वेगळी संकल्पना घेऊन तापसी पन्नूचा ‘थप्पड’ हा चित्रपट आला. पुरुषाने महिलेवर हात उचलणे उचलणे हे कोणत्याही परिस्थितीत चांगले नाही. हेच दाखवणारा हा चित्रपट आहे. पण बाघी 3 च्या दिग्दर्शकाला मात्र हा चित्रपट पटलेला दिसत नाही. कारण सगळीकडे या चित्रपटाच्या संकल्पनेची तारीफ होत असताना अहमद खानने या चित्रपटाला विचित्र चित्रपट असे म्हटले आहे. हे ऐकताच तापसी पन्नूनेही त्यावर उत्तर दिले आहे. अमजद खान प्रकरणानंतर सगळ्यांनीत तापसीला पाठिंबा दिला आहे.

बोल्ड सीन्ससाठी फक्त अभिनेत्रींनाच का केलं जातं ट्रोल

नेमकं प्रकरण काय?

Instagram

अहमद खानला एका मुलाखती दरम्यान ‘थप्पड’ या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी तो म्हणाला की, या चित्रपटाला काहीच अर्थ नाही. कारण नवरा- बायकोमध्ये होणाऱ्या भांडणामध्ये  नवऱ्याने बायकोवर हात उगारला तर तिने त्याला कायमचे सोडून देणे यात काय अर्थ आहे. अशा गोष्टी चित्रपटातून दाखवण्यात काहीच अर्थ नाही. कारण नवऱ्याने बायकोवर हात उगारला असेल तर तिने त्याला सोडून न देता त्याला दोन मुस्काटात लगावून द्यायला हवी आणि आहे ती गोष्ट तिथेच सोडून द्यायला हवी. याला पुढे जोड देत तो म्हणाला की, जर माझ्यासोबत असे झाले माझ्या पत्नीच्या मी मुस्काटात मारली तर मला सोडून देण्यापेक्षा तिने मला दोन मुस्काटात द्यावा. या सगळ्यामध्ये मी तिला तुझ्यासोबत राहू शकत नाही असे सांगितले तर ती देखील मला हे बोलू शकते. पण एक कानाखाली जोडप्यांना एकमेकांपासून दूर करु शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट फारच चुकीची आहे. 

स्त्रियांचा तिरस्कार करणाऱ्या दांडेकरांना पुरून उरणार ‘प्राची’

तापसीने दिले उत्तर

Instagram

तापसीला या बाबतीत कळाल्यानंतर तिने यावर चांगलेच उत्तर दिले आहे. ती म्हणाली की, अहमद त्याला आवडतो त्या विषयावर चित्रपट करतो. शेवटी चित्रपट पाहणे न पाहणे प्रेक्षकांच्या हातात असते. कारण त्यांच्यासाठीच आपण चित्रपट होता.  त्यामुळे तापसीने कोणतेही उलट उत्तर न देता अगदी शांत आणि चांगल्या शब्दात अहमदला उत्तर .

 

बाघी 3 होता फारच टुकार

आता अहमद खान दिग्दर्शित बाघी 3 या चित्रपटाबाबत  सांगायचे झाले तर हा चित्रपट वास्वापासून कितीतरी मैल दूर आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या अॅक्शन सीनमध्येही खूप हसायला येते हे आम्ही नाही तर प्रेक्षकांनीही म्हटले आहे. फक्त अॅक्शनसाठी या चित्रपटात टायगर श्रॉफला घेतले आहे. या चित्रपटातील कथानकापासून ते त्याच्या स्क्रिनप्ले पर्यंत सगळ्या गोष्टी एकदम फेक वाटल्या. त्यामुळेच की काय या चित्रपटाच्या शेवटी सगळ्यांना हसूच येते. विश्वास न बसण्यासारखे स्टंट आणि डायलॉग, श्रद्धाचा नको तेवढा बिनधास्तपणा, न विश्वास बसण्यासारख्या कंडीशन्स या सगळ्या गोष्टींमुळे हा चित्रपट एकूणच फेक वाटतो अशा अनेकांच्या प्रतिक्रिया असताना अहमदने अशा प्रतिक्रिया देणे चांगले नव्हते. कारण त्याने या सगळ्या आधी स्वत:च्या चित्रपटांकडे लक्ष द्यायला हवे होते. अशा प्रतिक्रियाही उमटत आहे. 


एकूणच काय कोणत्याही दिग्दर्शकाने बोलताना थोडी तरी काळजी घ्यायला हवी. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.