टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधूच्या माध्यमातून घरोघरी पोहचलेली अभिनेत्री ‘अविका गौर’ प्रेमात पडली आहे. तिने तिच्या इन्स्टा अकाउंटवर असं जाहीर केलं आहे की, तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे. अविकाने तिच्या प्रियकरासोबतचे काही रोमॅंटिक फोटो आणि क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. शिवाय तिने तिचं प्रेम व्यक्त करण्यासाठी एक लांबसडक पोस्टदेखील सोशल मीडियावर लिहिली आहे. यात तीने तिची लव्हस्टोरी उघड केली आहे. यासाठीच जाणून घ्या कोण आहे तिच्या स्वप्नातला राजकुमार आणि कधी करणार ते दोघं लग्न
कोण आहे अविकाचा बॉयफ्रेंड
अविकाचा बॉयफ्रेंड रोडीज कंटेस्टंट मिलिंद चांदवानी आहे. ज्याला ती सध्या डेट करत असून दोघांनी जाहीर पद्धतीने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. अविकाने तिच्या या इंन्स्टा पोस्टची सुरूवात एका आयकॉनिक फ्रेंच गाण्याने केली आहे La Vie En Rose असं या गाण्याचं टायटल आहे. ज्याचा अर्थ होतो की प्रेमाची गुलाबी हवा किंवा जीवन हे गुलाबी आहे अर्थात जीवन अतिशय सुंदर आहे असं तिला यातून सांगायचं आहे.अविका पुढे लिहीते की, “माझ्या प्रार्थना फळाला आली. मला माझ्या जीवनातील प्रेम मिळालं, हा नम्र माणूस माझा आहे आणि आयुष्यभर मी फक्त त्याचीच असेन. प्रत्येकाला आयुष्यात एका जोडीदाराची गरज असते. जो तुम्हाला समजुन घेईल, विश्वास ठेवेल, प्रेरणा देईल, पुढे जाण्यासाठी मदत करेल आणि तुमची खऱ्या अर्थाने काळजी घेईल. मात्र अनेकांना असं वाटतं की असा जोडीदार मिळणं अशक्य आहे.. त्यामुळे हे नक्कीच एखाद्या स्वप्नाप्रमाणे आहे. पण हे खरं आहे. मी तुमच्या सर्वांसाठी अशी प्रार्थना करते की, तुम्हा सर्वांनादेखील त्या भावना मिळाव्यात ज्या मी सध्या अनुभवत आहे. ही आनंदाची पराकाष्ठा असणारी उत्कट भावना आहे. ज्यामुळे माझं मन सद्गगदित झालं आहे. ही भावना खरंच अमुल्य आहे. परमेश्वरा मला हा अनुभव दिल्याबद्दल मी तुझी खरंच कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या अध्यायाला सुरूवात झाली आहे”
अविकाची ही पोस्ट वाचून आणि तिचे रोमॅंटिक फोटो पाहुन चाहते नक्कीच खुष झाले आहेत आणि अविका कधी लग्न करणार असं विचारत आहेत. मात्र अविकाने या पोस्टमधून स्पष्ट केलं आहे की, “नाही नाही मी एवढ्यात लग्नाचा विचार करत नाही आहे आणि लोक काय विचार करतील हा विचार आता माझ्या मनातून कधीच निघून गेला आहे. यासाठीच मी उघडपणे माझं प्रेम कबुल केलं आहे”
पुढे अविका मिलिंदची मस्करी करण्यासाठी म्हणते की, “उफ्फ…चला एवढ्या पैशात इतकंच मिळू शकतं. मी जर आता मिस्टर चांदवानीचे जास्त कौतुक केलं तर तो चंद्रावरही उडत जाऊ शकतो. हा एक घाणेरडा विनोद होता जो मी संगतीमुळे केला आहे. चला आता सर्वांनी खुष व्हा…. मिलिंदवर माझं मनापासून प्रेम आहे… मला पुर्ण केल्याबद्दल तुझे खूप आभार”
फिझिकल ट्रान्सफार्मेशनबाबत अविका का झाली होती भावूक –
काही दिवसांपूर्वीच अविकाने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने तिचा संघर्ष स्पष्ट केला होता. तिने लिहीलं होतं की, “मागच्या वर्षी जेव्हा मी एका रात्री आरशात पाहिलं तेव्हा मला मुळीच चांगलं वाटलं नाही. मोठे हात-पाय आणि थुलथुलीत पोट. ज्यामुळे मला बरंच काही सोडावं लागलं. जर हे सर्व थायरॉईड अथवा पीसीओडीमुळे झालं असतं तर एकवेळ ठीक होतं. कारण मग ते माझ्या नियंत्रणात नक्कीच नव्हतं. पण असं झालं होतं कारण मी काहीही खात होती, कधीही खात होती आणि वर्कआऊट मुळीच करत नव्हती. शरीराचा आदर राखण्याची गरज असते पण मी माझ्या शरीराचा मानच राखला नव्हता. त्यानंतर अविकाने निश्चयाने स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला”
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
Bigg Boss 14 : राहुल वैद्यने केले या अभिनेत्रीला प्रपोझ, लग्नाची घातली मागणी
केएल राहुलने केला आथियाबरोबर फोटो पोस्ट, लवकरच स्वीकारणार का नाते याबाबत चाहते उत्साही
आश्रम’ सीरिज रिलीज झाल्यानंतर या अभिनेत्रीने शेअर केला लैगिंक शोषणाचा किस्सा