Bigg Boss 14 सुरु होऊन आता तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. घरात अनेकांच्या गरमागरमीचे किस्से झाले आहेत. आरोप-प्रत्योरोपामध्ये राहुल वैद्य सगळ्यांच्या नजरेत आला आहे. घरातल्यांनी राहुलला दुषण लावत त्याला नॉमिनेटदेखील केले आहे. पण सीझन चौदाच्या टॅग लाईनप्रमाणे अब सीन पलटेग म्हणत या खेळात राहुलचे पारडे जड होताना दिसत आहे. सुरुवातीच्या दिवसात शांत शांत दिसणारा राहुल या शोमध्ये वरचेवर दिसत होता खरा पण आता तो या शोमध्ये सगळीकडेच दिसू लागला आहे. टास्क आणि नेपोटिझममुळे तो वादात आला असला तरी त्याचा मुद्दा हा योग्य असल्याचे त्याच्या घराबाहेरील चाहत्यांनी म्हटले आहे.
प्रेमाला वयाचं नाही बंधन, सेलिब्रिटी ज्या आहेत आपल्यापेक्षा लहान मुलांच्या प्रेमात
जास्मिनने काढला राग
घरात नुकत्याच पडलेल्या टास्कमध्य राहुलने स्पर्धक जास्मिनकडून यशस्वीरित्या बॅग काढून घेत डाव जिंकला. पण जास्मिनने रागाच्या भरात राहुलवर अनेक आरोप केले.त्याच्या अंगावर जाऊन पाणीही फेकले. पण तरीही हा खेळ झाल्यानंतर एखाद्या प्लेअरप्रमाणे त्याने तो डाव आणि अवतार तिथेच सोडला. पण जास्मिनने टास्क झाल्यानंतरही राहुलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. स्त्री- पुरुष असा भेदभाव खेळात केला जाऊ नये असे सांगूनही अनेकदा या घरात असे केले जाते. त्यामुळे जास्मिन ही बाहेरील प्रेक्षकांना लहान मुलांसारखी वागताना दिसली.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘मिर्झापूर 2’ ची चर्चा
संपूर्ण घराने केले नॉमिनेट
Bigg Boss 14 च्या घरातील नॉमिनेशची प्रक्रिया नुकतीच पार पडली. या नॉमिनेशनमध्ये सगळ्यांनीच राहुलला वेगवेगळी दुषण लावत नॉमिनेट केले. राहुल हा काड्या करतो आणि भांडणं लावून घरातील उगचाच फुटेज खातो असे आरोप त्याच्यावर करण्यात आले. जान सानूला नॉमिनेट करत त्याने नेपोटिझमचा मुद्दा मांडला आणि नवा वाद सुरु केला. त्यामुळे जान सानू विरुद्ध राहुल अशी भांडणं अनेकदा दिसली. आता सध्य स्थितीत घरात राहुल विरुद्ध संपूर्ण घर असे चित्र दिसत आहे.
सोशल मीडियावर मिळवतोय दाद
सोशल मीडियावर राहुल वैद्यची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. राहुल वैद्यचे अनेक फॅन क्लब सध्या बनू लागले आहेत. नेपोटिझमच्या मुद्दयावर अनेकांनी राहुलला पाठिंबा दिला आहे. शिवाय राहुल घरात शांत राहून टास्क आणि नियमांचे पालन उत्तमरित्या करतो असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे घरात जरी कोणीही त्याच्या पाठिशी नसले तरी घराबाहेर खूप चांगल्या पद्धतीने त्याला प्रसिद्धी मिळत आहे. या आठवड्यात तो नॉमिनेट झाल्यामुळे तो घराच्या बाहेर जाणार की, आणखी कोणाची विकेट जाणार? हे पाहावे लागणार आहे.
Bigg Boss 14: राहुल वैद्यने जान सानूवर केले नेपोटिझमचे आरोप
मैत्रीमुळे बिघडले गणित
राहुल- निकी-जान- निशांत अशी चौकट काही काळासाठी घरामध्ये दिसली होती. पण ही मैत्री पहिल्याच कॅप्टन टास्कमध्ये तुटली. राहुलचा काहीही दोष नसताना त्याची प्रतिमा मलीन करत निशांतने कॅप्टन पद मिळवले. पण हे पद आणि विश्वास दोन्ही तो टिकवू शकला नाही आणि त्याला कॅप्टन पदावरुन काढून टाकण्यात आले
आता या सोमवारी या खेळातून कोणं बाहेर जाणार हे येणारा वीकेंड का वारत सांगेल. तुर्तास राहुल घरात हिट आहे हे नक्की!