#BBM2update : टास्कसाठी नाही करणार विश्वासघात, शिव होतोय भावनिक

#BBM2update : टास्कसाठी नाही करणार विश्वासघात, शिव होतोय भावनिक

#BBM2 च्या घरात सध्या टास्क आणि भावना यांचा जुगलबंदी सुरू आहे. टास्क पूर्ण करण्यासाठी कोणाला रडवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर कोणाला सांगण्यात येतंय आवडता टॉपचे दोन तुकडे करायला. पण या सगळ्यात घरातील सदस्यांची मात्र चांगलीच पंचाईत होताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात हे सुरू असताना बाहेर मात्र सदस्यांसाठी शुभेच्छांचा ओघ सुरू आहे. अभिनेता माधव देवचकेला बिग बॉस मराठी जिंकण्यासाठी क्रिकेटर सलील अंकोला आणि राखी सावंतने दिल्या आहेत शुभेच्छा.

बिग बॉसचा नवा टास्क आणि सदस्यांची खेळी

Instagram

सध्या बिगबॉस मराठीच्या घरात सुरू आहे मर्डर मिस्ट्री टास्क. गुरूवारी बिग बॉसच्या घरात हिना आणि माधवमध्ये झालं जोरदार भांडणं. एकीकडे या दोघांमध्ये भांडण झालं तर दुसरीकडे शिवानी टास्कसाठी हिना रडवण्याचा प्रयत्न करत होती. पण हिनाने काही शिवानीच्या ताकास तूर लागू दिला नाही. या टास्कमुळेच जेव्हा शिवला सांगण्यात आलं की, वीणाचा आवडता टॉपचे तुला दोन तुकडे करायचे आहेत. तेव्हा भावनिक होत शिवने त्याला नकार दिला. शिवने नकार दिल्यावर बिग बॉसने अभिजीतमार्फत हे कार्य सोपवलं शिवानीकडे. पण शिव मात्र बिग बॉसच्या घरात भावनात्मक होत असल्याचं दिसतंय आणि अजूनही त्याचा वीणाकडे असलेला ओढा कायम आहे. दुसरीकडे वीणाची सुपारी दिली होती तिची ताई किशोरी शहाणेने. या सगळ्या घडामोडींपासून वीणा अजून तरी अनभिज्ञ आहे. तर शुक्रवारच्या एपिसोडमध्ये भिडणार आहे शिवानी आणि हिना.

माधवसाठी शुभेच्छांचा वर्षाव

दुसरीकडे बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वातला स्ट्राँग कंटेस्टंट माधव देवचकेला अभिनेत्री राखी सावंत आणि क्रिकेटर सलील अंकोलाने शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉस हा रिएलिटी शो भारतात 2006 ला सुरू झाला. तेव्हा बिग बॉस हिंदीच्या 2006 च्या सर्वात पहिल्या पर्वात अभिनेत्री राखी सावंत आणि क्रिकेटर सलील अंकोला कंटेस्टंट होते. राखी तर टॉप-5 पर्यंत या शोमध्ये राहिली होती. आता बिग बॉसमध्ये तशाच पध्दतीने माधवही टिकून राहावा म्हणून राखीने शुभेच्छा दिल्या आहेत.


माधवबद्दल विचारलं असता राखी सावंत म्हणते की, “माधव खूप चांगला माणूस आहे. तो खूप चांगला कलाकार आहे. त्यामुळे त्याला भरघोस मत द्या आणि माधव तुला बिग बॉसच्या घरातून बाहेर यायचं नाहीयं. तू जिंकूनच ये. माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा. ”


माधव चांगला अभिनेता असण्याशिवाय तो उत्तम क्रिकेटर आहे. त्यामुळेच क्रिकेटर सलील अंकोला यांच्यासोबत माधवची मैत्री आहे. आपला मित्र माधवला सगळ्यांनी व्होट करावं म्हणून सलील अंकोला यांनीही प्रेक्षकांना आवाहन केलं आहे. याबाबत सलील अंकोला म्हणाले की, “माझा प्रिय मित्र माधव खूप चांगला माणूस आहे. तो खूप चांगला खेळतोय. तो एक स्ट्राँग कंटेस्टंट आहे. तो खूप इंटरटेनिंगही आहे. त्याला भरभरून मत द्या. ज्यामुळे तो बिग बॉसमध्ये टिकून राहील आणि आपले असेच मनोरंजन करत राहील.”

आता पाहूया बिग बॉस मराठीमध्ये वीकेंडच्या डावमध्ये महेश मांजरेकर शिवच्या भावनिक निर्णयाबाबत काय म्हणतात आणि माधवला मिळालेल्या या शुभेच्छांचा त्याला कितपत फायदा होतो. 

हेही वाचा -

#BBM2 ची “शिवानीच खरी विनर”

#BBM2 मध्ये पहिल्या टास्कची धमाल

#BBM2 : बिग बॉसच्या घरात भरलीयं शाळा