भारतीय संस्कृतीमध्ये कोणताही उत्सव गाण्यांशिवाय पूर्ण होत नाही. मग ती दिवाळी असो होळी असो वा श्रीकृष्णजन्माष्टमी. मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलीवूडमध्ये प्रत्येक सणसमारंभावर गाणी रचलेलली आहेत. एवढंच नाही तर ही सर्व गाणी त्या त्या काळी सुपरहिट ठरली आहे. आजही ही गाणी ऐकताना श्रीकृष्ण, राधा, गोपगोपिका आपल्या आजुबाजूला फेर धरत आहेत असं वाटतं. यंदा कोरोनामुळे दहीहंडीचा उत्सव रद्द झाला असला तरी या गाण्यांच्या माध्यमातून आपण तो साजरा करू शकतो. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत बॉलीवूडची काही सुपरहिट गाणी शेअर करत आहोत.
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या लगान या सुपरहिट चित्रपटातील हे गाणं आहे. राधा कैसे ना जले मधून राधाच्या मनात असलेल्या कृष्णप्रेमाच्या तरल भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहे. हे गाणं आशा भोसले, उदीत नारायण आणि वैशाली सावंत यांनी गायलं होतं. तर जावेद अख्तरने गीतरचना आणि ए आर रहमान यांनी ते संगीतबद्ध केलेलं आहे.
सलमान खान, अरबाझ खान आणि राणी मुखर्जीचा हॅलो ब्रदर तुमच्या नक्कीच लक्षात असेल. या चित्रपटातील चांदी की डाल पर सोने का मोर हे गाणं त्या काळी खूपच गाजलं होतं. यात दहीहंडीचा उत्सव दाखवण्यात आलेला आहे. हे गाणं अलका याज्ञिक आणि स्वतः सलमान खान यांनी गायलं होतं. तर समीरने याची गीतरचना केली होती. हिमेश रेशमियाने या गाण्याला संगीत दिलं होतं.
2004 साली किसना हा चित्रपट खूपच गाजला होता. या चित्रपटात विवेक ओबेरॉय, इशा शरवानी आणि अॅंटोनिया बरनाथ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचं टायटल सॉंग होतं वो किसना है. गाण्यातून कृ्ष्ण आणि राधाच्या प्रेमाची कहाणी व्यक्त करण्यात आलेली आहे. गाणं सुखविंदर सिंह, एस.शैलजा, इस्माइल दरबार आणि आयशा दरबार यांनी गायलेलं आहे. तर ही जावेद आख्तर यांची गीतरचना आहे. या गाण्याला इस्माइल दरबार यांनी संगीतबद्ध केलेलं आहे.
नव्या जमान्यातील राधा-कृष्णाच्या गाण्यांचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा प्रत्येक तरूणमनात हेच गाणं गुणगुणू लागतं. स्टुडंड ऑफ दी एअर मधलं राधा तेरी चुनरी है गाणं डान्स फॉर्ममधलं असून ते दहीहंडी उत्सवात आवर्जून गायलं जातं. हे गाणं श्रेया घोषाल, विशाल-शेखर आणि उदीत नारायण यांनी गायलेलं आहे. या गाण्याला विशाल - शेखर यांनी म्युझिक दिलं आहे तर गाण्याचे बोल लिहीले आहेत अन्विता दत्त गुप्ता यांनी. हे गाण नेहमीच सुपरहिट लिस्टमध्ये राहू शकतं.
ओह माय गॉड हा दैववादावर आधारित चित्रपट अक्षयकुमार, परेश रावल यांच्या जोडीने गाजवला होता. मात्र या चित्रपटातील दहीहंडीचे तुझे अब छोडेंगे ना हम हे गाणंही सुपरहिट झालं होतं. हे गाणं मीका सिंह, श्रेया घोषाल यांनी गायलं होतं. तर संगीत रेशमियाने या गाण्याला संगीतबद्ध केलं होतं. या गाण्याचे बोल शब्बीर अहमदने लिहीलेले आहेत.
आयुषमान खुरानाची प्रमुख भूमिका असलेला ड्रिम गर्ल चित्रपट मागच्या वर्षी सुपरहिट ठरला होता. या आयुषमान सोबत नुसरत भरूचाची मुख्य भूमिका होती. यातील 'राधे राधे राधे तेरे बिना क्रिष्ना तो लगे आधे आधे' गाण्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. हे गाणं अमित गुप्ता याने गायलेलं आहे.
या व्यक्तिरिक्त हम साथ साथ है मधील 'मैय्या यशोदा' जुन्या काळातील ब्लफ मास्टर या चित्रपटातील 'गोविंदा आला रे आला' सत्यम शिवम सुंदरम चित्रपटातील 'यशोमती मैय्या' अमर प्रेम चित्रपटातील 'बडा नटखट है रे' अशी अनेक गाणी आहेत जी तेवढ्याच उत्साहाने जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या उत्सवात ऐकली जातात.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक
अधिक वाचा -
टीव्हीवर या कलाकारांनी निभावली आहे श्रीकृष्णाची भूमिका
संगीतप्रेमींसाठी मेजवानी, लता मंगेशकर मराठी गाणी (Lata Mangeshkar Marathi Songs)