उन्हाळ्यात तेलकट त्वचेची समस्या असेल, तर नक्की ट्राय करा 10 उत्कृष्ट फेस वॉश

उन्हाळ्यात तेलकट त्वचेची समस्या असेल, तर नक्की ट्राय करा 10 उत्कृष्ट फेस वॉश

प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळी असते. कोणाची त्वचा कोरडी असते तर कोणाची तेलकट. तर काही लोकांच्या त्वचेचा टाईप हा नॉर्मल अथवा कोरडा आणि तेलकट असा मिक्स असतो. सध्या उन्हाळा सुरु झाला आहे आणि त्याचा सर्वात पहिला परिणाम होत असतो तो आपल्या त्वचेवर. ज्यांची त्वचा तेलकट असते, त्यावर उष्णतेने अधिक तेल जमा होतं आणि त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स होण्याची शक्यताही निर्माण होते. अशा वेळी आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. त्यासाठी नक्की आपण काय करायला हवं आणि कोणते फेसवॉश वापरायला हवेत हे आपल्याला माहीत हवं. आपली त्वचा जर तेलकट असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला 10 उत्कृष्ट फेसवॉश सुचवत आहोत. ज्यामुळे तुमचा चेहरा नेहमी चमकदार आणि ताजातवाना राहील.  


Best Face Wash for Oily Skin  Cover
तसं तर तेलकट त्वचेसाठी बरेच घरगुती उपाय उपलब्ध आहेत, ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमची त्वचा तेलमुक्त ठेऊ शकता. पण आता या धावपळीच्या जीवनात बऱ्याचदा घरगुती उपचार करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या फेसवॉशवरच आपल्या मदार ठेवावी लागते. तेलकट त्वचेसाठी बाजारामध्ये अनेक फेसवॉश आहेत. पण त्यापैकी नक्की कोणतं चांगलं आहे याबाबत आपल्याला नेहमी मनात प्रश्न असतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला कोणते फेसवॉश उत्कृष्ट आहेत ते सांगणार आहोत.


वाचा - चेहरा क्लीन आणि चमकदार बनवण्यासाठी 10 घरगुती उपाय


तेलकट त्वचेसाठी 10 उत्कृष्ट फेसवॉश (10 Best Face Wash For Oily Skin)


बाजारात मिळणाऱ्या उत्कृष्ट 10 फेस वाॅशची यादी ज्यांच्या मदतीने तुम्ही एक योग्य फेस वॉश तुमच्या तेलकट त्वचेसाठी निवडू शकता.


1- हिमालय हर्बल्स प्युरीफाईंग नीम फेस वाॅश (Himalaya Herbals Purifying Neem Face Wash)


himalaya face wash
हिमालयची उत्पादनं ही तेलकट त्वचेसाठी खूपच विश्वसनीय मानली जातात. हिमालयच्या  के प्रोडक्ट्स ऑयली स्किन के लिए काफी विश्वसनीय माने जाते हैं। हिमालयचा हर्बल्स प्युरीफाईंग नीम फेस वाॅश हा एक साबणमुक्त असा फेसवॉश आहे. याचे हर्बल फॉर्म्युलेशन चेहऱ्यावरील घाण आणि पिंपल्स काढून टाकतात. नैसर्गिक कडूलिंब आणि हळदीच्या मिश्रणाने बनलेलं हे फेसवॉश अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणांनी युक्त आहे. हे विशेषतः तेलकट त्वचा लक्षात ठेऊनच बनवण्यात आलं आहे.


फायदा (Pros)


- हे एक हर्बल उत्पादन आहे


- या उत्पादनाला उत्कृष्ट ऑईल कंट्रोलर फेसवॉश मानलं जातं


- पिंपल्सपासून सुटका मिळवून देतं


- चेहऱ्यावरील घाण यामुळे साफ होते


नुकसान (Cons)


- याचा परिणाम काही तासांपुरताच राहातो


2- अरोमा मॅजिक नीम अँड टी ट्री फेस वाॅश (Aroma Magic Neem And Tea Tree Face Wash)


Aroma Magic Neem And Tea Tree Face Wash


कडूलिंबात त्वचेची काळजी घेणारे सर्व नैसर्गिक गुण असतात. हे फेसवॉश केवळ पिंपल्स दूर करत नाही तर त्वचेवरून अतिरिक्त तेल काढून त्वचा अधिक सौम्य आणि मऊ बनवतं. यामध्ये असणारे गुलाबाचे गुण त्वचेमधील तेल संतुलित राखण्यास मदत करतात. अरोमा मॅजिक नीम अँड टी ट्री फेस वाॅश तेलकट त्वचेसाठी एक उत्कृष्ट फेसवॉश आहे. तेलकट त्वचेतून अतिरिक्त सीबम आणि अशुद्धता यामुळे निघून जाते आणि हे त्वचेला बॅक्टेरियामुक्त करते.


फायदा (Pros)


- त्वचा मऊ बनवते


- त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकते


- चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका मिळवून देतं


- पिंपल्समुळे आलेले डागदेखील हे घालवतं


- हे 5 ते 6  तास तुमच्या त्वचेवर तेल येण्यापासून रोखतं


- हलका मेकअप काढण्यासाठीदेखील याचा वापर करता येऊ शकतो


नुकसान (Cons)


याने चेहरा साफ केल्यानंतर मॉईस्चराईजर नक्की लावा अन्यथा त्वचा अधिक कोरडी होते. तुमची त्वचा जर अधिक संवेदनशील असेल तर या फेसवॉशमुळे त्यावर जळजळ होण्याचीदेखील शक्यता असते.


वाचा - त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमची त्वचा ही राहील छान


3- लोटस हर्बल टी ट्री अँड सिनेमन अँटी- अॅक्ने ऑईल कंट्रोल फेस वाॅश (Lotus Herbals Tea Tree And Cinnamon Anti-Acne Oil Control Face Wash)


Lotus Herbals Tea Tree And Cinnamon Anti-Acne Oil Control Face Wash


लोटस हर्बल टी ट्री अँड सिनेमन अँटी- अॅक्ने ऑईल कंट्रोल फेस वाॅश हा विशेषतः तेलकट त्वचा लक्षात ठेऊन बनवण्यात आला आहे. टी ट्री ऑईलमध्ये अँटीफंगल आणि अँटीइन्फ्लेमेट्री गुण असतात. ज्यामुळे त्वचेतील सूज कमी होते. हे तुमच्या त्वचेमध्ये अतिशय आतपर्यंत जाऊन पोर्स बंद करतं आणि त्वचेला आतून चांगलं उजवळवतं. पिंपल्सचे डाग कमी करण्यासाठी आणि त्वचेमध्ये नैसर्गिक तेलाचं संतुलन राखण्यासाठी याची मदत होते. यामध्ये असणारी दालचिनी एक नैसर्गिक क्लिंझर आहे, जे त्वचेमधून डेड स्किन काढून त्वचा नैसर्गिक स्वरूपात चमकवतं. तसंच हे त्वचा अधिक चमकदार आणि तरूण दिसण्यास मदत करतं.


फायदा (Pros)


- यामुळे ओपन पोर्स बंद होतात


- त्वचेवरील तेल हे नियंत्रणात ठेवतं


- हे नैसर्गिक क्लिंझरचं काम करतं


नुकसान (Cons)


त्वचेवर पहिल्यापासून असणाऱ्या पिंपल्सवर याचा काहीही परिणाम होत नाही


4 - बायोटिक बायो पायनॅप्पल ऑईल कंट्रोल फोमिंग फेस वाॅश फाॅर ऑईली स्किन टाईप्स (Biotique Bio Pineapple Oil Control Foaming Face Wash for Oily Skin Types)


Biotique Bio Pineapple Oil Control Foaming Face Wash for Oily Skin Types


बायोटिकची उत्पादनं ही हर्बल असतात. अननस, कडूलिंबाची पानं आणि लवंग तेलापासून बनवलेले बायोटिकचे हे फेसवॉश नैसर्गिक स्वरूपात त्वचेचे संरक्षण करतं. हे त्वचा साफ ठेऊन पोर्स बंद करण्याचं आणि त्वचा निरोगी राखण्याचं काम करतं.  


फायदा (Pros)


- हे तेलकट त्वचेसाठी परफेक्ट आहे


- ओपन सोर्स बंद करतं


- त्वचेमधील घाण काढून त्वचा साफ करतं


नुकसान (Cons)


या उत्पादनाचा दावा आहे की, हे सर्व तऱ्हेच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. पण याचा परिणाम तेलकट त्वचेवर जास्त प्रमाणात होतो. कोरड्या आणि कॉम्बिनेशन त्वचेला हे जास्त कोरडं बनवतं.


Also Read Facewash For Oily Skin In Marathi


5 - क्लीन अँड क्लिअर फोमिंग फेस वाॅश (Clean & Clear Foaming Face Wash)


Best Face Wash for Oily Skin 5


क्लीन अँड क्लिअर फोमिंगं फेस वॉश हा विशेषतः त्वचेमधील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी तयार करण्यात आला आहे. तरूण त्वचा लक्षात घेऊन हा फेसवॉश तयार करण्यात आला आहे. याचा लिक्विड फॉर्म्युला चेहरा कोरडा न करता आतपासून त्वचा साफ ठेवतो आणि त्वचा मऊ आणि चमकदार ठेवतो. यामध्ये असणारे घटक पिंपल्स येऊ देत नाहीत. शिवाय त्वचा चांगली राखण्यास मदत होते.


फायदा (Pros)


- त्वचा आतून स्वच्छ करतो


- हे वापरायला अतिशय सोपं आहे आणि प्रवासातदेखील तुम्ही सहज घेऊन जाऊ शकता


- जास्त महाग नाही


- हे काॅम्बिनेशन त्वचेपेक्षा तेलकट त्वचेसाठी जास्त चांगलं आहे


नुकसान (Cons)


हे फेसवॉश कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी योग्य नाही


वाचा - ह्या '5' स्कीन केअर प्रोडक्ट्सशिवाय अपूर्ण आहे तुमचं ब्युटी रुटीन


6- न्यूट्रोजेना ऑईल- फ्री अॅक्ने फेस वाॅश (Neutrogena Oil-Free Acne Face Wash)


Neutrogena Oil-Free Acne Face Wash


न्यूट्रोजेना ऑईल- फ्री अॅक्ने फेस वाॅश त्वचेमधून तेल पटकन काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहे. तसंच त्वचेला योग्य तऱ्हेने हायड्रेटेड ठेवतं. हे एक जेलबेस्ड फेसवॉश आहे. जे वापरण्यासाठी जास्त जाड नाही. हे फेसवॉश त्वचेच्या आतपर्यंत जाऊन त्वचा चांगली बनवतं आणि कोरडी होण्यापासून थांबवतं. याचा रोज वापर केल्यास, त्वचा अधिक चांगली होते.


फायदा (Pros)


- त्वचा आतून स्वच्छ करतो. केवळ त्वचेवरील घाण साफ करत नाही तर मेकअपदेखील यामुळे साफ करता येतो


- हा फेस वाॅश त्वचा अधिक कोरडी करत नाही आणि कोणत्याही त्वचेसाठी उपयुक्त आहे


नुकसान Cons


याची किंमत इतर फेसवॉशच्या तुलनेत अधिक आहे.


7- जोवीस टी ट्री ऑईल कंट्रोल फेस वाॅश (Jovees Tea Tree Oil Control Face Wash)


Jovees Tea Tree Oil Control Face Wash


जोवीसचं उत्पादन हे हर्बल आहे. हा फेसवॉश त्वचेवरील घाण साफ करून त्वचा अधिक कोमल बनवतो. तसंच हे उत्पादन फेशियल ऑईलदेखील नियंत्रणात आणतं. पण जास्त वेळासाठी नाही. जोवीस टी ट्री ऑईल कंट्रोल फेसवॉश काही मर्यादेपर्यंत पिंपल्ससाठी परिणामकारक आहे. हे विशेषतः तेलकट त्वचेसाठी बनवण्यात आलं आहे. कोरड्या त्वचेच्या लोकांनी याचा वापर न करणंच उत्तम.


फायदा (Pros)


- हे जास्त महाग नाही. तुम्हाला परवडण्यासारखं आहे


- त्वचा कोमल बनवतं


- याचा सुगंध अतिशय मनमोहक आहे


नुकसान (Cons)


उन्हाळ्यात याचा परिणाम केवळ 2 ते 3 तासच राहतो.8- हिमालय हर्बल्स प्युरीफाईंग नीम फोमिंग फेस वाॅश (Himalaya Herbals Purifying Neem Foaming Face Wash)


Himalaya Herbals Purifying Neem Foaming Face Wash


हिमालयची बाकी उत्पादनांप्रमाणे हा फेसवॉशदेखील हर्बल गुणांनी युक्त आहे. यामध्ये असलेले कडिलिंबाचे गुण तुमच्या त्वचेतून किटाणू काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहेत. हा रोज वापरल्यामुळे तुम्ही स्वतःच स्वतःच्या चेहऱ्यावरील फरक ओळखू शकाल.


फायदा (Pros)


- कडिलिंबाच्या गुणांनी युक्त असं फेसवॉश आहे


- हे एक हर्बल उत्पादन आहे


नुकसान (Cons)


याचा परिणाम काही तासांपुरताच राहातो


9- पिअर्स ऑईल क्लिअर ग्लो फेस वाॅश (Pears Oil Clear Glow Face Wash)


Pears Oil Clear Glow Face Wash


पिअर्स ब्रँड आपल्या साबणासाठी खूपच प्रसिद्ध आहे. पण याचं फेसवॉश कलेक्शनदेखील चांगलं आहे. पिअर्स ऑईल क्लिअर ग्लो फेस वॉश तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल साफ करतो. यातील असणारे ग्लिसरीन तुमच्या त्वचेला सॉफ्ट बनवतात आणि चमकदारदेखील करतात. हे त्वचेला आतून साफ करतं आणि त्वचेवरील डेड स्किन सेल्सपासूनदेखील सुटका मिळवून देतं. चांगल्या परिणामांसाठी हे दिवसातून दोन वेळा अर्थात सकाळ आणि संध्याकाळ वापरायला हवं.


फायदा (Pros)


- हे त्वचेला कोरडं करत नाही


- हे 5 तासांपेक्षा अधिक वेळ त्वचेला तेलापासून मुक्त ठेवतं


- याचा सुगंध खूपच चांगला आहे


नुकसान (Cons)


- हे बनवण्यासाठी बऱ्याच प्रकारच्या रसायनांचा वापर करण्यात येतो


- याची जेल जाडी असल्यामुळे साफ करण्यासाठी थोडा वेळ लागतो


10- पतंजलि नीम तुलसी फेस वाॅश (Patanjali Neem Tulsi Face Wash)


Patanjali Neem Tulsi Face Wash


पतंजलिचे उत्पादन हे नैसर्गिक तत्वांनी बनलेले आहेत. याचं प्रमुख वैशिष्ट्य असं की, कोणतंही उत्पादन बनवण्यासाठी यामध्ये रसायनांचा वापर करण्यात येत नाही. पतंजलि नीम तुलसी फेस वॉशदेखील यापैकीच एक आहे. त्वचेवर जमलेली घाण साफ करून दिवसभरासाठी त्वचा फ्रेश ठेवतं आणि त्वचा यामुळे जास्त काळ चांगली राहते. कडिलिंब आणि तुळशीच्या गुणांनी भरपूर युक्त असलेलं हे फेसवॉश तेलकट त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे.


फायदा (Pros)


- हे स्वस्त आहे


- हे आयुर्वेदिक आहे


- तुळस आणि कडिलिंबाच्या गुणांनी युक्त आहे


नुकसान (Cons)


याचं पॅकेजिंग अधिक चांगलं होऊ शकलं असतं. त्यामुळे ग्राहक याकडे आकर्षित होत नाहीत


वाचा - त्वचा आणि सौंदर्यजतनासाठी बाबा रामदेव यांचे पतंजलि प्रोडक्ट्स 


तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी (How To Take Care Of Oily Skin)


अन्य त्वचेच्या तुलनेत तेलकट त्वचेची काळजी जास्त प्रमाणात घ्यावी लागते. उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसात अधिक प्रमाणात त्वचेवर तेल निघून येतं. या दोन्ही ऋतूत तेलकट त्वचेची काळजी घेणं खूपच कठीण असतं. या दोन्ही ऋतूंमध्ये तुम्ही तुमचा चेहरा नीट साफ करा. दिवसातून कमीत कमी दोन वेळा चेहरा नक्की धुवा. त्याशिवाय आपल्या बॅगध्ये ब्लोटिंग पेपरदेखील ठेवा. तुमच्या चेहऱ्यावर घाम आल्यानंतर ब्लोटिंग पेपरच्या साहाय्याने घाम पुसून टाका.


Best Face Wash for Oily Skin 12


चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे तेलकट त्वचेवर किटाणू आणि पिंपल्स येत असतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यावर योग्य लक्ष द्या. तुम्ही कोणत्या तऱ्हेचं जेवण खात आहात, त्याचा तुमच्या चेहऱ्यावर परिणाम होत असतो आणि याचमुळे तुमच्या चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. उदाहरणार्थ जास्त साखरयुक्त आणि चरबीयुक्त पदार्थ खाणं टाळायला हवं. जास्त कॉफी पिणंदेखील तेलकट त्वचेला नुकसान पोहचवू शकतं.  


प्रश्न - उत्तर (FAQ’s)


प्रश्न 1 - तेलकट त्वचेवर पोर्स अधिक होण्याची शक्यता असते का?


उत्तर- ज्या लोकांची त्वचा तेलकट असते, त्यांना पहिल्यापासूनच पोर्स असतात. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही कोणत्या तरी चांगल्या फेसवॉशचा वापर करायला हवा.


प्रश्न 2- कोणत्या तऱ्हेचं खाणं त्वचा अधिक तेलकट बनवतं?


उत्तर- गहू, तांदूळ, रव्यामध्ये ग्लूटेन असतं आणि जेव्हा आपण आपल्या खाण्यात या गोष्टींचा जास्त समावेश करतो तेव्हा चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्सची समस्या उद्भवू लागते. अनप्रोसेस्ड मांस, तळलेले पदार्थ आणि जंक फूड, हायफॅट आणि डेअरी उत्पादन हे सगळं खाणं टाळा.


प्रश्न 3- त्वचा अचानक ऑयली कशी होते?


उत्तर - त्वचा ऑयली होण्याची अनेक कारणं आहेत. ऋतू जसे बदलतात तसं, अधिक तणाव घेणे, चेहरा साफ न ठेवणे इत्यादी कारणं आहेत. या सगळ्यांपासून सुटका हवी असल्यास, दिवसातून कमीत कमी दोन वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायला हवा.


प्रश्न 4- महाग फेसवॉश तेलकट त्वचेसाठी सर्वोत्कृष्ट असतं का?


उत्तर- असं काहीच नाही. कोणतंही उत्पादन हे त्यातील वापरलेल्या घटकांपासून चांगलं की वाईट आहे ते ठरतं. त्याच्या किमतीवरून काहीच ठरत नाही. प्रयत्न करा की, जो फेसवॉश तुम्ही वापराल, त्यामध्ये कमीत कमी रसायनयुक्त पदार्थ वापरण्यात आलेले असतील.प्रश्न 5- कोणताही फेसवॉश तेलकट त्वचेवर किती काळ परिणामकारक ठरतो?


उत्तर- उष्णतेच्या दिवसात त्वचा अधिक तेलकट होते. त्यामुळे चांगल्यात चांगला फेसवॉशदेखील तुम्हाला केवळ 5-6 तास साथ देऊ शकतो.


फोटो सौजन्य - Shutterstock