उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी निवडा 'हे' बेस्ट सनस्क्रिन लोशन (Best Sunscreen For Oily Skin in Marathi)

उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी निवडा 'हे' बेस्ट सनस्क्रिन लोशन (Best Sunscreen For Oily Skin in Marathi)

हिवाळा संपून उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे उन्हापासून वाचण्यासाठी उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणं फार गरजेचं आहे. उन्हाळ्यात प्रखर सुर्यप्रकाशात घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रिन लोशन अवश्य लावा. मात्र जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला त्यासाठी कोणतं सनस्क्रिन निवडावं हा प्रश्न नक्कीच पडला असेल. एकतर घामामुळे उन्हाळ्यात त्वचा नेहमीपेक्षा अधिक तेलकट दिसते. शिवाय या काळात चेहऱ्यावर पिंपल्स आणि इतर त्वचा समस्यादेखील निर्माण होतात. सहाजिकच उन्हाळ्यात तेलकट त्वचेची इतर त्वचा प्रकारापेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तेलकट त्वचेच्या लोकांनी योग्य प्रकारचं सनस्क्रीन निवडणं फारच गरजेचं आहे.


Sunscreen morning beauty tips


तेलकट त्वचेसाठी बेस्ट सनस्क्रिन 


वास्तविक बाजारात अनेक प्रकारचे सनस्क्रिन लोशन उपलब्ध असतात. मात्र यातून तेलकट त्वचेसाठी योग्य सनस्क्रिन निवडणं तसं थोडं कठीणच आहे. कारण काही उत्पादनांवर नॉर्मल टू ऑईली स्कीनसाठी असं लिहीलेलं असतं. ज्याचा अर्थ नॉर्मल, संवेदनशील, कोरडी आणि तेलकट अशा सर्वच त्वचेसाठी हे लोशन वापरता येऊ शकतं. त्यामुळे तेलकट त्वचेसाठी हे लोशन चालेल का हा प्रश्न तुमच्यापैकी अनेकींना पडला असेल. उन्हाळ्यात सुर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. मात्र सनस्क्रिन तुमच्या त्वचेचं या किरणांपासून संरक्षण करतं. बाजारात सनस्क्रिन नेहमी एसपीएफ 15 ते 60 मध्ये उपलब्ध असतं. मात्र उन्हाळ्यात सनस्क्रिन निवडताना ते  एसपीएफ 30+ असलेलं घ्यावं ज्यामुळे ते परिणामकारक ठरू शकतं. आम्ही तुम्हाला तेलकट त्वचेसाठी काही उत्तम सनस्क्रिन लोशन सूचवत आहोत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार यातील तुमच्यासाठी योग्य सनस्क्रिनची निवड करू शकता.


तेलकट त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स बद्दलही वाचा


लॅक्मे सन एक्सपर्ट अल्ट्रा मॅट एसपीएफ 50


sunscreen  1


सौंदर्य उत्पादनांमध्ये लॅक्मे कंपनीचे उत्पादन लोकप्रिय  आहेत. लॅक्मेच्या चांगल्या गुणवत्तेमुळे हे प्रॉडक्टस लोकांना आवडतात. भारतात ऊन नेहमीच असल्यामुळे लॅक्मेचे सनस्क्रिन भारतात सर्वत्र प्रमाणात उपलब्ध असतात. ही सनस्क्रिन क्रिम  फारच हलकं असल्यामुळे ते लावल्यावर चिकटपणा जाणवत नाही. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेचं सनटॅन, सनबर्न, काळे डाग, सुरूकुत्या या त्वचा समस्यांपासून रक्षण होतं. हे सनस्क्रिन कोणत्याही त्वचा प्रकारासाठी योग्य ठरू शकतं.


या सनस्क्रिनची किंमत 450रू. पर्यंत असून तुम्ही या ठिकाणी ते खरेदी करू शकता.


निविया मॉश्चराईझिंग सन लोशन एसपीएफ 50


sunscreen 2


निविया च्या सनस्क्रिनमुळे तुमचे सुर्यकिरणांपासून योग्य संरक्षण होईल. युनिक फॉर्म्युल्यामुळे हे लोशन तुमच्या त्वचेमध्ये लवकर मुरते. ज्यामुळे तुमची त्वचा तेलकट दिसत नाही. चांगले परिणाम हवे असतील तर घरातून बाहेर पडताना वीस मिनीट आधीच हे लोशन तुमच्या त्वचेवर लावा.


या सनस्क्रिनची लोशन किंमत 499 रू.असून तुम्ही ते येथे खरेदी करू शकता.


Also Read Home Remedies For Oily Skin In Marathi


लॉरियल पॅरेस युव्ही परफेक्ट ट्रांसफरंट नॉन टिंटेड सनस्क्रिन विथ एसपीएफ 50


sunscreen  3


लॉरियल पॅरेसचे हे सनस्क्रिन तुमच्यासाठी अगदी योग्य ठरेल. याचं वैशिष्ठ्य म्हणजे तुम्ही हे मेकअप बेसप्रमाणे वापरू शकता. त्यामुळे तुमचा मेकअप घामामुळे निघणार नाही.


या सनस्क्रिनची किंमत 475 रू असून तुम्ही हे या ठिकाणी खरेदी खरेदी करू शकता.


बायोटीक बायो सॅंडलवूड अल्ट्रा सूदिंग फेस लोशन एसपीएफ 50 + सनस्क्रिन


sunscreen 4


चंदन, केशर, गहू, मध आणि अर्जुन वृक्षाच्या सालापासून तयार करण्यात आलेलं हे बायोटीक सनस्क्रिन लोशन एक नैसर्गिक उत्पादन आहे. यामुळे तुमच्या त्वचेचे संरक्षण तर होतेच शिवाय तुमची त्वचा मॉश्चराईझदेखील होते. पाण्यामध्ये देखील 80 मिनीट ते टिकून राहते. त्यामुळे जर तुम्ही स्विमर असाल तर हे क्रिम तुमच्यासाठी अगदी वरदान ठरू शकते.


वाचा - तेलकट त्वचेसाठी फेस वॉश


या सनस्क्रिनची किंमत 200 रू असून तुम्ही ते या ठिकाणी विकत घेऊ शकता.


न्युट्रोजिना अल्ट्राशीर ड्राय टच सनब्लॉक एसपीएफ 50 +


sunscreen 5


न्युट्रोजिनाचे हे सनस्क्रिन त्वचेमध्ये व्यवस्थित मुरतं ज्यामुळे तुमची त्वचा मऊ होते. उन्हाळ्यात त्वचा समस्यांपासून दूर राहण्यासाठी या क्रिमचा चांगला उपयोग होऊ शकतो. शिवाय हे तेलकट अथवा चिकट नसल्यामुळे तुम्हाला ते आवडू शकते.


या सनस्क्रिनची किंमत 514 रू असून तुम्ही ते या ठिकाणी खरेदी करू शकता.


त्वचा तेलकट आहे हे कसे ओळखावे


‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या


Face Sheet Mask : चेहऱ्यावर इंन्स्टंट ग्लो येण्यासाठी वापरा ‘हे’ फेस शीट मास्क


Morning Beauty Care Routine: चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी फॉलो करा हे 'मॉर्निंग ब्युटी केअर रूटीन'


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक