भूमी पेडणेकरचा 'दुर्गामती' निघाला फुसका बार, साऊथ चित्रपटाचा रिमेक

भूमी पेडणेकरचा 'दुर्गामती' निघाला फुसका बार, साऊथ चित्रपटाचा रिमेक

साऊथच्या दमदार चित्रपटांचे रिमेक करणे हे आता फार काही नवे राहिलेले नाही. पण एखाद्या अशा चित्रपटाचा रिमेक करणे ज्या चित्रपटाने एका भाषेत कोट्यवधी रुपयांची कमाई केली आणि एक वेगळे स्थान निर्माण केले. साऊथमधील अनुष्का शेट्टी स्टारर ‘भागमथी’ या हॉरर चित्रपटाने सगळे रेकॉर्डस तोडले. हा चित्रपट हिंदीत डब करण्याऐवजी हिंदीतून नव्याने निर्माण करण्यात आला. हिंदीत याचे नाव ‘दुर्गामती’ करण्यात आले आणि मुख्य भूमिका भूमी पेडणेकरच्या वाट्याला आली. पण ट्रेलरनंतर काहींच्या अपेक्षा या खालावल्या होत्या आणि आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर भूमी पेडणेकरचा ‘दुर्गामती’ हा चित्रपट फुसका बार निघाला आहे.

नीना कुलकर्णी आता दिसणार स्वराज्यजननी जिजामाताच्या भूमिकेत!

अजिबात घाबरवत नाही ही दुर्गामती

Instagram

साऊथचा एक दमदार चित्रपट हिंदीत पाहायला मिळत असल्यामुळे अनेकांना या चित्रपटकडून खूप अपेक्षा होती. पण चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने ज्या पद्धतीने घाबरवायला हवे तसे घाबरवले नाही. उलट यामधील काही सीन्स हे वाया गेले असे पाहताना वाटते. अटकेत असलेली एक ऑफिसर ज्यावेळी दुर्गामती बंगल्यात येते त्यावेळी तिच्यासोबत अशा काही घटना होतात. त्यामुळे त्या बंगल्यात भूत असल्याचे दिसते. पण हे सीन्स करताना दिग्दर्शकाने फार मेहनत घेतलेली दिसत नाही. शिवाय भूमी पेडणेकरची तुलना अनुष्का शेट्टीशी झाल्यामुळे तिलाही तितका अभिनय हा खास जमला नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. चित्रपटाची सुरुवात त्याच संगीताने आणि त्याच उर्जेने होते खरी. पण ज्या पद्धतीने हा चित्रपट पुढे जायला हवा तसा जात नाही. त्यामुळेच हिंदीचा रिमेक अनेकांना तसा कमजोर वाटू शकतो.

दिव्यांका त्रिपाठी थंडीत त्वचेची निगा राखण्यासाठी वापरते हा घरगुती स्क्रब

भूमी पेडणेकरला मिळाला वेगळा रोल

भूमी पेडणेकरने आतापर्यंत अनेक वेगळ्या धाटणीचे रोल केलेले आहेत. आयुषमान खुरानासोबत तिने ‘दम लगाक के हैशा’ या चित्रपटात तिने एका स्थुल महिलेची भूमिका साकारली होती. भूमी पेडणेकरने शोषिक महिलेपासून ते वेबसिरीजमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे तिच्यासाठी हा नवा रोल एक चॅलेंज होता. तिच्यापद्धतीने तिने ही भूमिका योग्य साकारली असली तरी देखील अनुष्का शेट्टीचे ते रुप तिला साकारता आले नाही. त्यामुळेच अनेकांची निराशा झाली.

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझाला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

अर्शद वारसीची भूमिका एकदम बेस्ट

अर्शद वारसी या भूमिकेत इश्वरप्रसादची भूमिका साकारली आहे. हा एक दमदार रोल असून  त्याने ती फार योग्य पद्धतीने साकारली आहे. एका करप्ट राजकारण्याची भूमिका तिने योग्य पद्धतीने साकारली आहे. याशिवाय यामध्ये इनव्हेटिगेशस्टिव ऑफिसरची भूमिका माही गिल आणि जिस्सी सेनगुप्ताने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. त्यांच्या भूमिका यामध्ये फारच उठून  आलेल्या आहेत. पण तरीही हा चित्रपट कुठेतरी कमी पडला असेच दिसून आले आहे. 

ओटीटीवर रिलीज झाला चित्रपट

सध्या अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येत आहे. दुर्गामती हा चित्रपटही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल तर आताच या चित्रपटाचा आनंद घ्या आणि हो साऊथचा चित्रपट पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहू नका. कारण मग तुमची मत या चित्रपटाविषयी वेगळी होतील.