मैने प्यार किया फेम भाग्यश्री पटवर्धनचा मुलगा अभिमन्यू करतोय बॉलीवूडमध्ये पदार्पण

मैने प्यार किया फेम भाग्यश्री पटवर्धनचा मुलगा अभिमन्यू करतोय बॉलीवूडमध्ये पदार्पण

बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन मैने प्यार किया या पहिल्याच चित्रपटात लोकप्रिय झाली होती. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटात चांगलं यश मिळालं होतं. सलमान खान आणि भाग्यश्रीची सुपरहिट जोडी आजही अनेकांच्या लक्षात आहे.भाग्यश्री पटवर्धनने तिच्या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर हिमालय दसानीसोबत लग्न केलं. लग्नानंतर मात्र भाग्यश्री अनेक वर्ष चित्रपटसृष्टीपासून दूर होती. काही टेलीव्हिजन मालिकांमधून तिने नंतर काम केलं होतं. मात्र तिला हवं तसं यश मिळालं नाही. भाग्यश्रीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तिचा मुलगा बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी लवकरच एका चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु करत आहे. या चित्रपटाचे नाव मर्द को दर्द नही होता असे आहे. या चित्रपटामध्ये अभिमन्यु सोबत राधिका मदान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. राधिका मदान या पूर्वी पटाखा या चित्रपटात काम केलं आहे. 21 मार्चला मर्द को दर्द नही होता हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. भाग्यश्रीला तिच्या पहिल्या चित्रपटात चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. तिच्या साधा आणि सौज्वळ रूपाचे अनेक चाहते निर्माण झाले होते. त्यामुळे आता तिच्या मुलाला अभिमन्युलादेखील तिच्याप्रमाणेच पहिल्या चित्रपटात चांगलं यश मिळणार का याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.भाग्यश्री पटवर्धन सांगलीच्या राजघराण्यातील कन्या


भाग्यश्री पटवर्धन एका राजघराण्यातील कन्या आहे. भाग्यश्रीचे वडिल विजयसिंग माधवराव पटवर्धन हे सांगलीचे राजा आहेत. राजे विजयसिंग यांना तीन मुली आहेत. त्यापैकी भाग्यश्री त्यांची मोठी मुलगी आहे. भाग्यश्री अनेकदा सांगलीला तिच्या घरातील सार्वजनिक कार्यक्रमात परिवारासह सहभागी होते. भाग्यश्रीने लग्नानंतर तीन चित्रपटामध्ये काम केलं होतं. या तीनही चित्रपटात भाग्यश्रीने तिचे पती हिमालय यांच्यासोबतच काम केलं होतं. भाग्यश्रीने लग्नानंतर ती फक्त तिच्या पतीसोबतच काम करणार अशी अट निर्मात्यासमोर ठेवली होती. मात्र हे तीनही चित्रपटांना यश मिळालं नाही. तिच्या अशा अटीमुळे तिला पुढे चित्रपटात काम मिळालं नाही. त्यामुळे तिने सिनेसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.


bhagyashree


जवळजवळ दहा वर्षांनी तिने पुन्हा चित्रपटसृष्टी नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात तिला फार यश आले नाही. भाग्यश्रीने काही तेलुगू आणि भोजपूरी चित्रपटातदेखील काम केलं आहे. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी लग्न केल्यामुळे ती तिच्या करिअरचे निर्णय योग्य पद्धतीने घेऊ नाही शकली. सहाजिकच तिला त्यामुळे सिनेक्षेत्रात फार यश मिळवता नाही आले. मात्र आता तिच्या मुलाबाबत तिने योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा विचार केला आहे.

Subscribe to POPxoTV

प्रियांका चोप्राचा फिटनेस, डाएट आणि ब्युटी मंत्रा जाणून घ्या


‘कुंकू, टिकली आणि टॅटू' फेम रमा उर्फ भाग्यश्री करणार प्रेमात कल्ला


प्रेगन्सीनंतर पुन्हा सुडौल दिसण्यासाठी करा 'हे' उपाय


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम