'बस बुलेटवर..' हे अचूक शब्दांची किमया, ठेका धरायला लावणार संगीत, कलाकारांची उत्तम अदाकारी, सेट्स, कोरिओग्राफी या साऱ्यांची योग्य प्रमाणात सांगड असणारं गाणं. सिंगल म्युझिक अल्बम्सच्या निर्मितीत चेतन गरुड प्रोडक्शन्सची गरुडझेप वाखाणण्याजोगी आहे. 'खंडेराया झाली माझी दैना', 'सुरमई', 'आली फुलवली' आणि आत्ता 'बस बुलेटवर' हे या प्रोडक्शन्सचं आगामी रोमॅंटीक सॉंग आहे.
View this post on Instagram
चेतन गरुड आणि एव्हरेस्ट एन्टरटेनमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने 'बस बुलेटवर...घालूया प्रेमात कल्ला' असे गमतीशीर शब्द असणाऱ्या या गाण्याची जादू तरुणाईला भुरळ पाडेल. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडच्या प्रेमातला कल्ला सांगणारे हे गीत लिहिलं आहे अक्षय कर्डक यांनी तर त्याला साजेसं संगीत लाभलंय अतुल भालचंद्र जोशी-सिद्धेश कुलकर्णी या द्वयींच. विशेष म्हणजे गायक केवल जयवंत वाळंज यांनी आपल्या मस्तीपूर्ण गायकीने या गाण्यात खासच रंग भरलेत. तर बॉयफ्रें-गर्लफ्रेंडच्या भूमिकेत झळकणारे डॅक्स मॅथ्यू आणि भाग्यश्री एनएच यांनी 'बस बुलेटवर' गाण्यात एकच कल्ला उडवून दिलाय.
या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे तेजस पाटील तर संकलन राहुल झेंडे यांनी केलं आहे. शिवाय प्रेमाचा बार उडवून लावणाऱ्या या गाण्याची दिलखेचक सिनेमॅटोग्राफी रवी उच्चे यांनी केली आहे. तर डॅक्स मॅथ्यूचं नृत्य-दिगदर्शन आहे .
View this post on Instagram
प्रेयसीला आपल्या मनातल्या इमोशन बिनधास्तपणे सांगण्यासाठी 'बस बुलेटवर' हे गाणं नक्की ऐकवा आणि करा प्रेमाचा कल्ला.
हेही वाचा -
प्रेमाचा निखळ अनुभव सांगणारं ‘अजुन अजुन’ गाणं
'सूर सपाटा'चा दिमाखात रंगला ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा
स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली माडेचं नवीन गाणं ‘माझ्या रानफुला’